एक्स्प्लोर

Pune Crime Ayush Komkar: 'मी माझ्याच नातवाला का संपवू? मला प्रकरणात गोवलंय, मी तर...'; बंडू आंदेकरचा कोर्टात युक्तीवाद, नेमकं काय घडलं? वाचा A टू Z युक्तिवाद

Pune Crime Ayush Komkar: कोर्टाने आरोपी बंडू आंदेकर, वृंदावनी वाडेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर, अमन पठाण, सुजल मेरगु या 6 आरोपींना 15 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

पुणे : पुणे शहरातील नाना पेठ परिसरात गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला १९ वर्षांच्या आयुष कोमकरची हत्या करण्यात आली, या प्रकरणात पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली आहे. या सहाही आरोपींना काल (मंगळवारी) कोर्टात हजर करण्यात आलं होतं. यावेळी दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद करण्यात आला. तपास अधिकारी आणि सरकारी वकिलांनी आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली. तर बंडू आंदेकरच्या वकिलांनी पोलीस कोठडीला विरोध करत हा गुन्हा झाला तेव्हा तो इथे नव्हता असा युक्तीवाद देखील केला. आपल्याला या प्रकरणात गोवण्यात आल्याचा दावा बंडू आंदेकरने कोर्टामध्ये केला. बंडू आंदेकरच्या वकिलांनी देखील जोरदार युक्तिवाद केला. त्याचबरोबर इतर माहिती, तपास करायचा असल्यामुळे त्यांना पोलिस कोठडी देण्यात यावी अशी मागणी केली, अखेर दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने सहाही आरोपींना पोलीस कोठडी सुनावली. कोर्टाने आरोपी बंडू आंदेकर, वृंदावनी वाडेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर, अमन पठाण, सुजल मेरगु या 6 आरोपींना 15 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

बंडू आंदेकर कोर्टात काय म्हणाला?

बंडू आंदेकरने कोर्टात आपली भूमिका स्पष्ट केली. "आम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवलं जात आहे. आम्ही केरळला होतो. आमची पोलिसांच्या विरोधात काही तक्रार नाही. पण आम्हाला अडकवलं गेलं आहे", असं बंडू आंदेकरने कोर्टात सांगितलं. यावेळी तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात याप्रकरणी महत्त्वाची माहिती दिली.

आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद काय?

"आम्ही गेल्या 10 तासांपासून अटकेत आहोत. जी FIR झाली ती चुकीची आहे. कल्याणी माझी मुलगी आहे, जिने याबाबतची फिर्याद दिली. जो मयत झाला तो नातू आहे. आमची नावे का आली? गेल्या वर्षी माझ्या मुलाचा खून झाला होता. त्यात मी फिर्यादी आहे. मी त्यावेळी सांगितलं होतं की कल्याणीने देखील कट रचला होता. तिच्या घरचे अटक झाले आहेत, अशी बंडू आंदेकरची बाजू वकिलांनी 
कोर्टात मांडली.

"मी माझ्या नातवाचा खून का करू? मला काय मिळणार? आयुष माझा वैरी आहे का? मला मारायचं असतं तर प्रतिस्पर्धीला मारेन. वनराचे खूप फॉलोअर्स आहेत. तो लोकप्रिय होता. त्यापैकी कुणी मारलं असेल. त्याचे खूप फॅन आहेत", असा युक्तीवाद बंडू आंदेकरने केला आहे.

"मी फिर्यादीच्या पतीचे, साऱ्याचे आणि नवऱ्याचे नाव घेतले आहे म्हणून माझं नाव यात गोवलं गेलं आहे. माझं संपूर्ण कुटुंब जेलमध्ये गेलं पाहिजे हेच यामागचा उद्देश आहे. कारण माझ्या मुलाच्या खून प्रकरणी मी तिच्या घरच्यांना जेलमध्ये पाठवलं आहे", असंही बंडू आंदेकरने कोर्टात म्हटलं आहे.

"दत्ता काळे याने माझ नाव घेतलं नाही. आम्हाला खोटा फिर्यादी बनवून या प्रकरणात अडकवले जात आहे. आमचे घरगुती वाद आहेत म्हणून देखील नाव घेतलं गेलं. आमच्याकडून काय रिकव्हर करायचं आहे? आम्ही राज्यात नव्हतो. आम्ही केरळमध्ये होतो. आम्ही कट रचण्याचा प्रश्नच येत नाही. पिस्तूल माझ्याकडून कशी जप्त करायची आहे?", असा सवाल बंडू आंदेकरने केली. तसेच "वृंदावनी आंदेकर यांना सूर्यास्तानंतर अटक केली आहे, लेडीज ऑफिसर नव्हते तरीही अटक केली आहे", अशी तक्रारदेखील आरोपींच्या वकिलांनी यावेळी कोर्टात केली आहे.

तपास अधिकाऱ्यांनी काय दिली माहिती?

आयुष कोमकर हत्या प्रकरणात एकूण १३ जणांनी कट रचला होता. त्यापैकी दोघांनी भवानी पेठमधील पार्किंगमध्ये जात पिस्तूलने फायरिंग करून खून केला. बाकीच्या आरोपींच्या सांगण्यावरून हा खून करण्यात आला. पिस्तूल आम्हाला जप्त करायचं आहे, पिस्तूल आणि गोळ्या कुठून आणल्या याचा तपास करायचा आहे. इतर पाच आरोपी फरार आहे, त्यांचा पत्ता याच आरोपींना माहिती आहे त्यांना शोधायचं आहे याबाबत सखोल तपास करायचा आहे. दाखल गुन्ह्यातील आरोपींनी सोमनाथ गायकवाड यांच्या घराची देखील रेकी केली होती, यांच्यावर भारती विद्यापीठ पोलिसात गुन्हा दाखल आहे. आंदेकर टोळीने हा खून केला आहे. आंदेकर टोळीने याआधी आंबेगावमध्ये सोमनाथ गायकवाड यांच्या घरी हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. यांची ओळख परेड घ्यायची आहे. या प्रकरणातील अनेक आरोपी हे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत, यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. एका एका आरोपीवर ३-३ किंवा २-२ गंभीर गुन्हे दाखल आहेत. ज्यांनी हत्या केली त्यांचे कपडे जप्त करायचे आहे. हे टोळी युद्ध आहे कट रचत खून केला असल्याचं तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात सांगितलं आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gaja Marne: कुख्यात गुंड गजा मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर; जेलमधून सुटताच थेट पुणे पोलिस आयुक्तालयात
कुख्यात गुंड गजा मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर; जेलमधून सुटताच थेट पुणे पोलिस आयुक्तालयात
आता घरबसल्या क्षणात आधार मोबाईल नंबर बदला! कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही; अशी आहेस स्टेप बाय स्टेप प्रोसेस
आता घरबसल्या क्षणात आधार मोबाईल नंबर बदला! कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही; अशी आहेस स्टेप बाय स्टेप प्रोसेस
Jain Muni Nilesh Chandra Maha Katta: 'पण तुम्ही चापट मारणार असाल, तर आम्ही मारवाडी...' जैन मुनी निलेश चंद्र राज ठाकरेंना मराठीच्या वादावर काय काय म्हणाले?
Video: 'पण तुम्ही चापट मारणार असाल, तर आम्ही मारवाडी...' जैन मुनी निलेश चंद्र राज ठाकरेंना मराठीच्या वादावर काय काय म्हणाले?
Video : हातात पेट्रोल घेऊन आला, बाॅयफ्रेंडनं नर्स गर्लफ्रेंडसमोर स्वतःला पेटवलं, जळत्या अवस्थेत रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारल्यानंतही जिवंत जळत राहिला

व्हिडीओ

Anup Jalota Majha Katta : अनुप जलोटा-पंकज उदास यांची गाण्यातून सेवा, कॅन्सर पेशंटला मदत
Anup Jalota Majha Maha Katta : 5 वर्ष थांबायला हवं होतं..अनुप जलोटांनी खंत बोलून दाखवली
Anup Jalota Majha Maha Katta : बिग बॉसमध्ये प्रतिमा मलिन झाली? अनुप जलोटा स्पष्ट बोलले
Nilesh Chandra Maha Katta : कबुतरांमुळे मराठी-मारवाडी वाद का? जैन मुनी निलेश चंद्र यांचा सवाल
Nilesh Chandra Maha Katta : ...तर आम्ही मराठी बोलणार नाही, जैन मुनी नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gaja Marne: कुख्यात गुंड गजा मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर; जेलमधून सुटताच थेट पुणे पोलिस आयुक्तालयात
कुख्यात गुंड गजा मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर; जेलमधून सुटताच थेट पुणे पोलिस आयुक्तालयात
आता घरबसल्या क्षणात आधार मोबाईल नंबर बदला! कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही; अशी आहेस स्टेप बाय स्टेप प्रोसेस
आता घरबसल्या क्षणात आधार मोबाईल नंबर बदला! कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही; अशी आहेस स्टेप बाय स्टेप प्रोसेस
Jain Muni Nilesh Chandra Maha Katta: 'पण तुम्ही चापट मारणार असाल, तर आम्ही मारवाडी...' जैन मुनी निलेश चंद्र राज ठाकरेंना मराठीच्या वादावर काय काय म्हणाले?
Video: 'पण तुम्ही चापट मारणार असाल, तर आम्ही मारवाडी...' जैन मुनी निलेश चंद्र राज ठाकरेंना मराठीच्या वादावर काय काय म्हणाले?
Video : हातात पेट्रोल घेऊन आला, बाॅयफ्रेंडनं नर्स गर्लफ्रेंडसमोर स्वतःला पेटवलं, जळत्या अवस्थेत रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारल्यानंतही जिवंत जळत राहिला
Video : हातात पेट्रोल घेऊन आला, बाॅयफ्रेंडनं नर्स गर्लफ्रेंडसमोर स्वतःला पेटवलं, जळत्या अवस्थेत रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारल्यानंतही जिवंत जळत राहिला
SMAT : अभिषेक शर्माला दोनदा बाद केलं, अंशुल कंबोजनं करुन दाखवलं, सुपर ओव्हरमध्ये हरियाणाचा पंजाबवर रोमांचक विजय
अभिषेक शर्माला दोनदा बाद केलं, अंशुल कंबोजनं करुन दाखवलं, सुपर ओव्हरमध्ये हरियाणाचा पंजाबवर विजय
Ramraje Naik Nimbalkar :  प्रोटोकॉल बाजूला ठेवून आलो,  मी कोणत्या पार्टीत यावर मुंबईत चर्चा होईल, त्यांना एकच सांगेन... : रामराजे नाईक निंबाळकर
मी कोणत्या पार्टीत यावर मुंबईत चर्चा होईल, त्यांना एकच सांगेन... : रामराजे नाईक निंबाळकर
Imran Khan: इम्रान खान जिवंत आहे की नाही? पहिल्यांदा पुरावे द्या! मुलाचा पाकिस्तानात आक्रोश, पोलिसांनी समर्थक मुख्यमंत्र्याला रस्त्यात चोपलं
Video: इम्रान खान जिवंत आहे की नाही? पहिल्यांदा पुरावे द्या! मुलाचा पाकिस्तानात आक्रोश, पोलिसांनी समर्थक मुख्यमंत्र्याला रस्त्यात चोपलं
India Q2 GDP : भारताचा दुसऱ्या तिमाहीचा GDP दर RBI चा अंदाज मागं टाकत 8.2 टक्क्यांवर, केंद्राकडून आकडेवारी जाहीर
भारताचा दुसऱ्या तिमाहीचा GDP दर RBI चा अंदाज मागं टाकत 8.2 टक्क्यांवर, केंद्राकडून आकडेवारी जाहीर
Embed widget