एक्स्प्लोर

Pune Rain Update: पुन्हा मुसळधार! पुण्यात पावसाचा आणखी दोन दिवस मुक्काम; अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाचा अंदाज

Pune Weather Update: पुणे शहरातही पुढील दोन दिवस जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन करण्यात आलं आहे.

Pune Weather Update: राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली आहे. अनेक भागांमध्ये पुरस्थिती निर्माण झाली आहे. तर पुणे शहर परिसरात पुन्हा मुसळधार पाऊस  (Heavy Rain) बरसत आहे. गेली सलग तीन दिवस संध्याकाळच्या सुमारास मुसळधार पावसाची हजेरी लागली असून, पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस असणार आहेत, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. पुणे शहरातही पुढील दोन दिवस जोरदार पाऊस (Pune Heavy Rain) होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन करण्यात आलं आहे.

राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय झाल्याचं दिसून येत आहे, पुणे शहरासह ग्रामीण भागात देखील गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस धुमाकूळ (Heavy Rain) घालतानाच चित्र आहे. पुणे शहर व जिल्ह्यामध्ये ढगांची निर्मिती होत असून, परिणामी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

राज्याच्या अनेक भागात पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. काही जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवस पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने सोमवारी राज्यभरात काही ठिकाणी जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलेला होता, तर विदर्भ, मराठवाडा, खानदेश, मध्य महाराष्ट्र, कोकणातील सर्वच जिल्ह्यांना काही ठिकाणी जोरदार यलो अलर्ट जारी केला आहे.

विदर्भातील जिल्ह्यांमध्ये बुधवारी (दि. 21) काही ठिकाणी जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. सोलापूर, जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यांतही काही ठिकाणी यलो अलर्ट दिला, तर पुणे, सातारा, सांगली, नगर, नाशिक जिल्ह्यांतही जोरदार पावसाचा (Heavy Rain) अंदाज आहे.

विदर्भात शुक्रवारपर्यंत यलो अलर्ट

गेल्या 24 तासांपासून उकाडा वाढल्यामुळे राज्यातील काही भागात मुसळधार, तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू झाला आहे. मात्र या पावसाचा जोर विदर्भात वाढला असून त्या भागात 23 ऑगस्टपर्यंत मुसळधारेचा 'यलो अलर्ट' तर; कोकण, मध्य महाराष्ट्रात 22 पर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यातील 'या' जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट

हवामान विभागाकडून आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, पुणे, सातारा आणि सांगली या जिल्ह्याला यलो अलर्ट जारी केला आहे. तर  मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, धाराशिव जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्काAssembly Election Result 2024 : निकालाआधी सत्तेची जुळवाजुळव सुरु? अपक्षाची भूमिका महत्वाची?Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा परिणाम काय? मुख्यमंत्री कोण होणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक, राजकीय विश्लेषकांचं मत काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
Embed widget