एक्स्प्लोर

Sharad Pawar : आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे, गोविंद बागेत आवाज घुमला, कार्यकर्त्यांची थेट शरद पवारांसमोर मागणी; विधानसभेला खणाखणी सुरु!

बारामतीमध्ये उमेदवार कोण असणार याचा अंतिम निर्णय हा शरद पवार यांचाच असणार आहे. मात्र, युगेंद्र पवार यांच्या समर्थकांकडून आतापासूनच रान उठवण्यास सुरुवात झाली आहे.

बारामती : बारामती लोकसभा (Baramati Loksabha) निवडणुकीमध्ये शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांचा दणदणीत विजय झाल्यानंतर अजित पवार गट बॅकफूटवर आहे. त्यामुळे बारामतीमध्ये आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा अजित पवारांविरोधात आवाज उठण्यास सुरुवात झाली आहे. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आज (11 जून) बारामती दौऱ्यावर आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुप्रिया सुळे यांच्यासाठी युगेंद्र पवार आणि आमदार रोहित पवार यांनी काका अजित पवारांविरोधात शड्डू ठोकला आहे.  

युगेंद्र पवारांसाठी कार्यकर्त्यांनी गोविंद बागेत शरद पवारांची भेट घेतली

युगेंद्र पवार यांच्यासाठी कार्यकर्त्यांनी गोविंद बागेत शरद पवारांची भेट घेतली. बारामतीमध्ये शरद पवारांचे निवासस्थान असलेल्या गोविंद बागेत युगेंद्र पवार यांना उमेदवारी जाहीर करावी, अशी मागणी केली. यावेळी आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे, अशी थेट साद शरद पवारांना युगेंद्र पवारांच्या कार्यकर्त्यांनी घातली. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार असा सामना होणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे. 

अजित पवार यांना आव्हान निर्माण झालं आहे का?

बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गटाकडून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार लोकसभेच्या रिंगणात होत्या. मात्र, सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवारांना धोबीपछाड देत विजय खेचून आणला. त्यामुळे अजित पवार गट बारामतीमध्ये बॅकफूटवर आहे. बारामती लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्य बारामती विधानसभेमधूनच सुप्रिया सुळे यांना मिळाले होते. त्यामुळे अजित पवार यांना आव्हान निर्माण झालं आहे का? अशीही चर्चा रंगली होती. 

बारामतीमध्ये उमेदवार कोण असणार याचा अंतिम निर्णय हा शरद पवार यांचाच असणार आहे. मात्र, युगेंद्र पवार यांच्या समर्थकांकडून आतापासूनच रान उठवण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे येत्या दोन महिन्यांमध्ये बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार सामना निश्चित रंगणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pimpri-Chinchwad Crime News: आरपीआयच्या बड्या नेत्याला निर्घृणपणे संपवलं; हॉटेलमध्ये धारदार शस्त्राने केले वार, कारण अद्याप अस्पष्ट
आरपीआयच्या बड्या नेत्याला निर्घृणपणे संपवलं; हॉटेलमध्ये धारदार शस्त्राने केले वार, कारण अद्याप अस्पष्ट
NEET Paper Leak 2026: NEET पेपरफुटी प्रकरणात नवा ट्विस्ट; सीबीआयच्या तपासात चक्रावून टाकणारी माहिती, नेमकं काय काय घडलेलं?
NEET पेपरफुटी प्रकरणात नवा ट्विस्ट; सीबीआयच्या तपासात चक्रावून टाकणारी माहिती, नेमकं काय काय घडलेलं?
NEET Paper Leak: मोठी बातमी: NEET पेपरफुटी प्रकरणात आणखी एक कारवाई; धनंजय लोखंडेच्या 'खास' मित्रालाच आता पोलिसांनी उचललं
NEET पेपरफुटी प्रकरणात आणखी एक कारवाई; धनंजय लोखंडेच्या 'खास' मित्रालाच आता पोलिसांनी उचललं
Rohit Pawar: अजित पवारांच्या विमान दुर्घटनेबाबत रोहित पवारांचं सुनेत्रा पवारांना थेट आव्हान; म्हणाले, 'माझं सुनेत्राकाकींना आवाहन म्हणा, आव्हान म्हणा किंवा विनंती म्हणा, मित्रपक्षाला…'
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेबाबत रोहित पवारांचं सुनेत्रा पवारांना थेट आव्हान; म्हणाले, 'माझं सुनेत्राकाकींना आवाहन म्हणा, आव्हान म्हणा किंवा विनंती म्हणा, मित्रपक्षाला…'

व्हिडीओ

Pune Baramati Plane Crash: बारामतीत पुन्हा एकदा विमान कोसळलं, अजितदादांच्या अपघात झालेल्या गावातच मोठी दुर्घटना
Parth Pawar Vs Sunil Tatkare-Parful Patel: पार्थ पवार विरुद्धतटकरे-पटेल कोल्ड वॉर? | Special Report
Shahzad Bhatti Special Report : पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी प्रकरणी ATS ची मोठी कारवाई
Rohit Pawar Comments On Baramati : रोहित पवार बारामतीत जास्त लक्ष घालतायत? | Special Report
Raj Thackeray 2008 Railway Case : गुन्हा कबूल नाही; राज ठाकरेंची स्पष्टोक्ती, कोर्टात काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kerala New CM: व्हीडी सतीशन केरळचे नवे मुख्यमंत्री; त्रिमूर्तीच्या लढाईत अखेर बाजी मारली, निकालानंतर 10 दिवसांनी काँग्रेसकडून घोषणा
व्हीडी सतीशन केरळचे नवे मुख्यमंत्री; त्रिमूर्तीच्या लढाईत अखेर बाजी मारली, निकालानंतर 10 दिवसांनी काँग्रेसकडून घोषणा
सुनेत्रा पवारांनी तटकरे अन् पटेलांना मेसेज दिल्याची चर्चा असतानाच तटकरे साहेबांच्या भेटीला, रोहित पवारांचाही मोठा दावा; राष्ट्रवादीतील घडामोडींवर शरद पवार आज काय काय बोलणार?
सुनेत्रा पवारांनी तटकरे अन् पटेलांना मेसेज दिल्याची चर्चा असतानाच तटकरे साहेबांच्या भेटीला, रोहित पवारांचाही मोठा दावा; राष्ट्रवादीतील घडामोडींवर शरद पवार आज काय काय बोलणार?
Nagpur News: गाजावाजा करून भूमिपूजन, पण कामाचा पत्ता नाही; आमदार समीर मेघेंच्या उपस्थितीत झालं होतं भूमिपूजन, सहा महिन्यानंतरही रस्ता अपूर्णच, नागरिक हैराण
गाजावाजा करून भूमिपूजन, पण कामाचा पत्ता नाही; आमदार समीर मेघेंच्या उपस्थितीत झालं होतं भूमिपूजन, सहा महिन्यानंतरही रस्ता अपूर्णच, नागरिक हैराण
'22 वर्षांपासून राजकारणात, 54 दौऱ्यांवर 60 कोटींचा खर्च, यांना निधी कोण पुरवतंय?' राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यांवर संबित पात्रांकडून प्रश्नांची सरबत्ती
'22 वर्षांपासून राजकारणात, 54 दौऱ्यांवर 60 कोटींचा खर्च, यांना निधी कोण पुरवतंय?' राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यांवर संबित पात्रांकडून प्रश्नांची सरबत्ती
Xi Jinping Meets Donald Trump: चीनमध्ये ट्रम्प-शी जिनपिंग भेट; तैवानवरुन गर्भित इशारा, टॅरिफवरून खडे बोल, प्रतिस्पर्धी नाही, तर.. चीनी राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे कान टोचले
चीनमध्ये ट्रम्प-शी जिनपिंग भेट; तैवानवरुन गर्भित इशारा, टॅरिफवरून खडे बोल, प्रतिस्पर्धी नाही, तर.. चीनी राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे कान टोचले
Trisha Krishnan Offer From Opposition Party: तामिळनाडूत पुन्हा एकदा ट्विस्ट? थलपती विजय यांचे कट्टर विरोधक स्टॅलिन यांची तृषा कृष्णनला 12 कोटींची ऑफर
तामिळनाडूत पुन्हा एकदा ट्वीस्ट? थलपती विजय यांचे कट्टर विरोधक स्टॅलिन यांची तृषा कृष्णनला 12 कोटींची ऑफर
NEET Paper Leak 2026: NEET पेपरफुटी प्रकरणात नवा ट्विस्ट; सीबीआयच्या तपासात चक्रावून टाकणारी माहिती, नेमकं काय काय घडलेलं?
NEET पेपरफुटी प्रकरणात नवा ट्विस्ट; सीबीआयच्या तपासात चक्रावून टाकणारी माहिती, नेमकं काय काय घडलेलं?
उत्तर प्रदेशात वादळाचा अक्षरशः हाहाकार; प्रयागराज आणि अयोध्येसह 30 जिल्ह्यांमध्ये तब्बल 94 जणांचा बळी; तरुण पत्र्याच्या शेडसकट हवेत उडाला; तिकडं राजस्थान, एमपीत भीषण गर्मीचा कहर
उत्तर प्रदेशात वादळाचा अक्षरशः हाहाकार; प्रयागराज आणि अयोध्येसह 30 जिल्ह्यांमध्ये तब्बल 94 जणांचा बळी; तरुण पत्र्याच्या शेडसकट हवेत उडाला; तिकडं राजस्थान, एमपीत भीषण गर्मीचा कहर
Embed widget