(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पुण्यात पाणीच पाणी, झाडे पडली, प्रशासन कामाला; पालकमंत्री अजित पवारांसह खासदारांचंही पुणेकरांना आवाहन
पुणे शहरातील अनेक भागांत मुसळधार पाऊस पडला, त्यामुळे संबंधित परिसरात जिकडे तिकडे पाणीच पाणी अशी पूरस्थिती दिसून आली.
पुणे : शैक्षणिक पंढरी असलेल्या आणि औद्योगिक नगरी म्हणून वाढत असलेल्या पुणे (Pune) शहरात यंदाच्या वर्षातील सर्वात मोठा पाऊस पडला आहे. राज्यातील आजच्या दिवसातील रेकॉर्डब्रेक पाऊस पुणे शहरात पडल्याने शहरातील अनेक भागात पाणी साचले आहे. या पावसाननंतर नेतेमंडळी व प्रशासन अलर्ट झाले असून पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (ajit Pawar) यांनीही पावसाच्या घटनेची जिल्हा प्रशासनाकडून माहिती घेतली असून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलंय. शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांना नदीचं स्वरूप आलं असून शिवाजी नगर, अलका टाकीज चौक, कोथरुड, कात्रज, सिंहगड रोड यासह अनेक परिसरात रस्ते तुंबल्याचं दिसून आलं. पुणे शहरातील मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोडींत पुणेकर 2 तास अडकून पडल्याने संतात व्यक्त करत आहेत.
पुणे शहरातील अनेक भागांत मुसळधार पाऊस पडला, त्यामुळे संबंधित परिसरात जिकडे तिकडे पाणीच पाणी अशी पूरस्थिती दिसून आली. येथील रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून पुणेकरांना मार्ग काढवा लागला. तर, काहींनी पाण्यात उड्या मारुन पहिल्या पावसाचा आनंद घेतला. मात्र, आजचा पुण्यातील पाऊस ढगफुटीसदृश्य असल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. तर, जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनीही पुणेकरांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. तसेच, पुण्याचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांनीही ट्विट करुन पाणी ओसरेपर्यंत पुणेकरांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे.
पुणे शहर आणि परिसरात आज सायंकाळी मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. पुणे शहरातील शिवाजीनगर, पाषाण भागात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. पुणे महानगरपालिकेचे आयुक्त आणि पुणे जिल्हाधिकाऱ्यांशी मी दूरध्वनीवरुन उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी याविषयीची सविस्तर माहिती घेतली आहे. कमी वेळेत जास्त पाऊस पडल्यामुळे काही ठिकाणी पाणी साचलं आहे, त्याचा जनजीवनावर परिणाम झाला आहे. तरी प्रशासनाच्या वतीनं तातडीनं उपाययोजना करण्याच्या तसंच पावसात अडकलेल्या नागरिकांना मदत करण्याच्या सूचनाही अजित पवार यांनी संबंधितांना दिल्या आहेत. या काळात नागरिकांनी शक्यतो घराच्या बाहेर पडू नये, अशा सूचना प्रशासनानं दिल्या आहेत. नागरिकांनी काळजी घ्यावी. त्याचप्रमाणे येत्या पाच दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस जोरदार हजेरी लावणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. त्या अनुषंगानं राज्यातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला सतर्क राहण्याच्या सूचनाही अजित पवार यांनी दिल्या आहेत. अजित पवार यांनी ट्विट करुन ही माहिती दिली.
पुणे शहर आणि परिसरात आज सायंकाळी मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. पुणे शहरातील शिवाजीनगर, पाषाण भागात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. पुणे महानगरपालिकेचे आयुक्त आणि पुणे जिल्हाधिकाऱ्यांशी मी दूरध्वनीवरुन या विषयीची सविस्तर माहिती घेतली आहे. कमी वेळेत जास्त पाऊस…
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) June 8, 2024
पुणे पावसाचे अपडेट (सायंकाळी 7:15 वाजेपर्यंत)
शिवाजीनगर: 103 मिमी
सदाशिव पेठ : 93 मिमी
कोथरूड : 91 मिमी
सिंहगड रस्ता : 74 मिमी
पाषाण: 65 मिमी
बावधन: 48 मिमी
बिबवेवाडी: 56 मिमी
खराडी: 31 मिमी
एनडीए: 41 मिमी
वाघोली : 44मिमी
शहरात 32 ठिकाणी झाडपडीच्या घटना
येरवडा, नागपुर चाळ
कोथरुड बस स्टैंड
सिहंगड रोड, दामोदर नगर
शिवाजीनगर, सावरकर भवन
सहकार नगर, तावरे कॉलनी
सेनापती बापट रोड
गणेश खिंड रोड, ई स्क्वेअर
कोंढवा खुर्द, भैरवनाथ मंदिर
मार्केटयार्ड, संदेश नगर
कल्याणीनगर, गुरूनानक डेअरी
येरवडा, सैनिक नगर
नवी पेठ
सुखसागर नगर, आई माता मंदिर
पर्वती दर्शन
शुक्रवार पेठ, मामलेदार कचेरी
विमाननगर
रास्ता पेठ, दारुवाला पुल
एरंडवणा, महादेव मंदिर
पद्मावती, ट्रेझर पार्क
खडकी, रेंजहिल चौक
भवानी पेठ, रामोशी गेट
एरंडवणा, खिलारेवाडी
जंगली महाराज रोड
वाकडेवाडी, पीएमसी कॉलनी
कोथरुड, करिश्मा सोसायटी
कोथरुड, मयुर कॉलनी
येरवडा क्षेञिय कार्यालय
विमानतळाजवळ
लोहगाव, पवार वस्ती
धानोरी
गोखलेनगर
अतिप्रमाणात पाणी साचलेले परिसर
पाषाण, बी यु भंडारी शोरूम जवळ
सिहंगड रोड दोन ठिकाणी
सेंट्रल मॉल समोर
नारायण पेठ, अष्ठभुजा मंदिर जवळ
खडकी, गुरुव्दाराजवळ
एरंडवणा, गणेशनगर
राजेन्द्र नगर
कसबा पेठ, कुभांर वाडा
चंद्रकांत पाटील यांचं आवाहन
पुण्यातील पहिलाच पाऊस ढगफुटीसारखा झाला असून पुण्यातील अनेक भागात पावसामुळे पाणी साचलं आहे. अनेक ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या आहेत, महापालिकेची सगळी यंत्रणा कामाला लागली आहे. या ढगफुटी सदृश्य परिस्थितीत प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, आपण काळजी करू नका. या सगळ्या नुकसानाची नुकसानभरपाई केली जाणार असल्याचे मंत्री आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. पुण्यात ज्या ठिकाणी नुकसान झाल्याची माहिती मिळताच, ही माहिती प्रशासनाला द्यायची असेल तर त्यांनी हेल्पलाईन नंबरवर संपर्क करावा, असे आवाहनही चंद्रकांत पाटली यांनी पुणेकरांना केलं आहे.
पाणी ओसरेपर्यंत घराबाहेर पडू नका - मोहोळ
पुण्यावर उंच ढगांची निर्मिती सुरु असून कमी वेळात अधिक पाऊस झाल्याने काही ठिकाणी फ्लॅशफ्लड सारखी स्थिती आहे. तसेच झाडे पडणे, भिंती पडणे, घरांमध्ये पाणी शिरणे आदी घटना शक्य असून पाणी ओसरेपर्यंत घराबाहेर पडू नये, असे आवाहन पुण्याचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांनी केलंय. पुण्यातील पावसाच्या स्थितीसंदर्भात आपण महापालिका अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून आवश्यक तेथे आपत्कालीन यंत्रणा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी दिलेल्या