Vijay Shivtare : 'एकनाथ शिंदेंनी माघार घ्यायला सांगितलं, तर...'; नेमकं काय म्हणाले विजय शिवतारे?
Baramati Lok Sabha Constituency : विजय शिवतारे बारामती लोकसभेची निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. ही न्यायाची लढाई आहे. लोकांनी मला काय सांगितले त्यावर मी लढतो आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
Vijay Shivtare : बारामती लोकसभेला (Baramati Lok Sabha Election 2024) अजित पवार यांनी प्रतिष्ठेचा मुद्दा केला आहे. एकीकडे सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) अशी प्रतिष्ठेची लढत चर्चेत आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाचे माजी आमदार विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी बारामतीतून लोकसभेची निवडणूक लढवणारच असे म्हटले आहे.
माजी आमदार विजय शिवतारे यांनी आज सासवडमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती. या बैठकीत शिवतारे यांच्या उमेदवारीचा ठराव एक मताने मंजूर करण्यात आला. त्यामुळे विजय शिवतारे बारामती लोकसभेची निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे चित्र आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे सांगितल्याने बारामतीत महायुतीच्या अडचणी वाढल्याचे दिसून येते.
बारामती लोकसभेवर कुणाचा सातबारा नाही
विजय शिवतारे म्हणाले की, एकमताने ठराव पास करण्यात आला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ (Baramati Lok Sabha Constituency) हा काय कोणाचा सातबारा नाही. मी देशातील 543 मतदारसंघापैकी एक लोकसभेच्या मतदारसंघ आणि मालकी कोणाची नाही. सहा विधानसभेचे मतदारसंघ आहे. आपला स्वाभिमान जागृत होऊन आपण लढलं पाहिजे. विशेषतः अजित पवार 2019 च्या निवडणुकीमध्ये मी जरी त्यांच्या मुलाविरुद्ध प्रचार केला होता तो राजकारणाचा एक भाग होता आणि माझं कर्तव्य म्हणून केला होता. वैयक्तिक काही नव्हतं.
अजित पवारांनी सभ्यतेची सगळी पातळी ओलांडली
परंतु, अजित पवारांनी (Ajit Pawar) सभ्यतेची सगळी पातळी ओलांडली आहे. अजित पवार यांनी नीच पातळी ओलांडूनही मी त्यांना माफ केलं आहे. त्यांचा सत्कार देखील केला आहे. तरीही त्यांची गुर्मी तशीच होती. ही निवडणूक आता जनतेनं हातात घेतली असून हुकूमशाही, सरंजामशाही येथे चालणार नाही. जनता मावळ तसेच बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदार संघातील आम्ही 41 वर्षे तुम्हाला मत देतो, पुरंदरला काय एक प्रोजेक्ट दिला तो दाखवा? ठराविक काही असतील, पण शेतकऱ्यांना काय दिलं? जे बारामती बागायत आहे ते ब्रिटिश काळापासून असल्याची टीका त्यांनी यावेळी केली आहे.
एक जण आपल्याकडे आलाय तो ब्रह्मराक्षस
ते पुढे म्हणाले की, लोक हुशार आहेत. जनता सुज्ञ आहे. जनता मला आशीर्वाद देईल. मी महायुतीच्या विरोधात नाही. मोदी, शिंदे आणि फडणवीस यांना मी मानणारा माणूस आहे. पण येथील लढाई वेगळी आहे. एक जण आपल्याकडे आला आहे तो ब्रह्मराक्षस आहे. नमो विचार मंच या नावाने ही लढाई होईल. हे बाजारू राजकारण आलं आहे. हे काल चक्र आहे. बंडखोरी शब्द इथे लागू होत नाही
लोकांनी मला काय सांगितले त्यावर मी लढतोय
पवार विरुद्ध पवार अशी लढाई होत आहे. त्यांच्या विरोधात कोण नाही का? ही न्यायाची लढाई आहे. कोणत्याही नेत्यांशी चर्चा झालेली नाही. लोकांनी मला काय सांगितले त्यावर मी लढतो आहे. अजित पवारांची मिसेस म्हणून आम्ही मतदान करायचं. मोदींवर अनेक लोकांची श्रद्धा आहे. शिंदे, फडणवीस यांच्यावर श्रद्धा आहे. काँगसने सुभेदार नेमले मोदींनी सर्व सामान्य माणसाला न्याय दिला आहे. 2024 ची विधानसभा सगळे वेगळे लढतील.
एकनाथ शिंदेंनी माघार घ्यायला सांगितलं, तर...
अजित पवार जिंकू शकत नाहीत या लोकांच्या प्रतिक्रिया आहेत. अजित पवारांचा उर्मटपणा आहे. अजित पवारांनी मला दुर्लक्ष केलं आहे. मला लोकांनी सांगितले याला धडा शिकवला पाहिजे. अजित पवार रेसमध्ये नाहीत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी माघार घ्या, असे सांगितले तरी देखील मी लोकांचे ऐकेल, असे यावेळी विजय शिवतारे म्हणाले आहेत.
आणखी वाचा
काँग्रेसच्या गोटात खळबळ; संजय निरुपम आणि अशोक चव्हाणांची गुप्त भेट, नेमकं शिजतंय काय?