काँग्रेसच्या गोटात खळबळ; संजय निरुपम आणि अशोक चव्हाणांची गुप्त भेट, नेमकं शिजतंय काय?
Maharashtra Politics : संजय निरुपमांनी माजी मुख्यमंत्री आणि नुकतीच काँग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये गेलेल्या अशोक चव्हाणांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
![काँग्रेसच्या गोटात खळबळ; संजय निरुपम आणि अशोक चव्हाणांची गुप्त भेट, नेमकं शिजतंय काय? Congress Leader Sanjay Nirupam meets Ashok Chavan Lok Sabha Election 2024 Amol Kirtikar Maharashtra Politics काँग्रेसच्या गोटात खळबळ; संजय निरुपम आणि अशोक चव्हाणांची गुप्त भेट, नेमकं शिजतंय काय?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/13/7c7c98b99e7deeabb707a587ec52bbb5171031663693888_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sanjay Nirupam meets Ashok Chavan : मुंबई : लोकसभेच्या (Lok Sabha Election 2024) रणधुमाळीत सर्वच पक्षांमध्ये चुरस रंगल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच काही दिवसांपूर्वी ठाकरे गटानं उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघांसाठी अमोल किर्तीकर (Amol Kirtikar) यांना उमेदवारी जाहीर केली. पण, असं करणं महाविकास आघाडीसाठी (Maha Vikas Aghadi) डोकेदुखी ठरणार आहे, हे नक्की. इकडे अमोल किर्तीकर यांना जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारीवरुन काँग्रेस नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी टीका केली आणि तिकडे संजय निरूपण नाराज असल्याच्या चर्चांनी जोर धरला. त्यातच आता संजय निरुपमांनी माजी मुख्यमंत्री आणि नुकतीच काँग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये गेलेल्या अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या गुप्त भेटची बातमी समोर आली आणि काँग्रेसह महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ माजली. काँग्रेस नेते संजय निरूपम आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आलं. अशातच या भेटीबाबत दोन्ही नेत्यांना विचारलं असता, मैत्रीपूर्ण भेट असल्याचं उत्तर दोन्ही नेत्यांनी दिलं.
अशोक चव्हाणांसोबतच्या भेटीबाबत संजय निरुपमांना विचारलं असता ते म्हणाले की, "अशोक चव्हाण हे माझे जुने मित्र आहेत. मी एका कार्यक्रमाच्या निमित्तानं तिकडे गेलो होतो, त्यावेळी मी त्यांची भेट घेतली. या भेटीचा कुठलाही राजकीय अर्थ काढू नये. आमच्या भेटी होत राहतात." तसेच, अशोक चव्हाणांनाही या भेटीबाबत विचारण्यात आलं. त्यावेळी ते म्हणाले की, "माझे काँग्रेसचे सबंध जुने आहेत. त्यामुळे भेट होतच असते." दोन्ही नेत्यांनी उत्तर दिल्यानंतरही अद्याप चर्चा काही थांबलेल्या नाहीत. याचं कारणंही तसंच आहे आणि ते म्हणजे, संजय निरुपमांनी गेल्या काही दिवसांपासून उघडपणे व्यक्त केलेली नाराजी.
संजय निरुपमांच्या नाराजीच्या चर्चा का?
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील शाखा भेटीमध्ये ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तीकर (Amol Kirtikar) यांची या लोकसभा मतदारसंघासाठीची उमेदवारी जाहीर केली. संजय निरुपमांच्या नाराजीसाठी हीच बाब कारणीभूत ठरली. याबाबत निरुपमांनी ट्वीटही केलं होतं, त्यात ते म्हणाले होते की, "अमोल कीर्तीकर यांची खिचडी घोटाळ्या प्रकरणांमध्ये ईडी कडून चौकशी सुरू असताना, अशा चौकशी सुरू असणाऱ्या उमेदवाराचा काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते प्रचार करणार का?"
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)