Vasant More On Jitendra Awhad : मी मुरलीची मुरली वाजवतो की आव्हाड यांची पुंगी वाजवतो लवकरच कळेल; वसंत मोरेंचा जितेंद्र आव्हाडांना सणसणीत टोला!
मी मुरलीची मुरली वाजवतो की आव्हाड यांची पुंगी वाजवतो हे भविष्यात कळेल, अशा शब्दांत वसंत मोरे यांनी जितेंद्र आव्हाडांना टोला लगावला आहे.
पुणे : वसंत मोरे (Vasant More) आणि 'वंचित' हे काही गणितच मला कळत नाही, वसंत मोरे हे काय कलाकार आहेत, यांची कलाकारी मला नाही समजली, मी पण कलाकार आहे पण मला ते मोठे कलाकार वाटतात, 'मुरली'ची मुरली वाजावी असं तर मनात नाही ना? असा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी वसंत मोरेंवर हल्लाबोल केला होता. त्यावर वसंत मोरे यांनी जितेंद्र आव्हाडांना सणसणीत टोला लगावला आहे. मी मुरलीची मुरली वाजवतो की आव्हाड यांची पुंगी वाजवतो हे भविष्यात कळेल, अशा शब्दांत वसंत मोरे यांनी टोला लगावला आहे.
वसंत मोरे काय म्हणाले?
वसंत मोरेंना लोक चेहऱ्याने ओळखत नाही तक वसंत मोरेंचे विकास कामं प्रकाश आंबेडकरांना माहिती आहे. त्यामुळे विकासाचा चेहरा म्हणून मला उमेदवारी दिली आहे. जितेंद्र आव्हाड हे कलाकार आहे, हे त्यांनी मान्य केलं आहे. आव्हाड नेमके कसे कलाकार आहेत, हे सगळ्या राज्याला माहित आहे. निष्ठावान होतो आणि आहे. मी मुरलीची मुरली वाजवतो की आव्हाड यांची पुंगी वाजवतो हे भविष्यात कळेल, असं वसंत मोरे म्हणाले.
प्रचार दणक्यात सुरु...
वसंत मोरे म्हणाले की, चांगल्या प्रतीचा माझा प्रचार चालू आहे आणि प्रतिसाद चांगला मिळत आहे. मी आज नाही गेली चार वर्षे सातत्याने कोरोना कालावधीनंतर शहरांमध्ये मी काम करतोय. मी आजपर्यंत चार वर्षांमध्ये विकासासाठी भरपूर काम केले. पुणे शहरातील प्रश्नांवर सातत्याने पुढे महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये असेल किंवा रस्त्यावरती असेल मी प्रश्न आवाज उठवलेला आहे. त्यामुळे पुणेकरांना मी माहिती आहे. ते मलाच निवडणून देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
'आव्हाड धंगेकरचा प्रचार करायला आले होते. त्यांचं डिमोशन करुन गेले का?'
मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकरांना उमेदवारी जाहीर झाली नव्हती. त्याच्या आधीपासून माझे पुण्यात बॅनर्स लागले होते. ते दोघेही उमेदवारी जाहीर झाल्यापासून कामाला लागले आहेत. मात्र मी मागील चार वर्षांपासून पुण्याच्या विकासासाठी झटत आहे. मला उमेदवारी दिल्याने मी धंगेकरचे मत खाणार असं नाही. आव्हाड धंगेकरचा प्रचार करायला आले होते. त्यांचं डिमोशन करुन गेले का?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
इतर महत्वाची बातमी-
Sharad Pawar : महाविकास आघाडीतील मित्रपक्षात जागावाटपावरून कोणतेही मतभेद नाही : शरद पवार
पाहा संपूर्ण व्हिडीओ-