एक्स्प्लोर

Bhimashankar Temple Nishikant Dubey: महाराष्ट्रातील भाविकांना महाशिवरात्रीलाही शंकराचं दर्शन घेऊ दिलं नाही पण भाजपच्या खासदारासाठी नियम डावलून भीमाशंकर मंदिराचे दरवाजे उघडले, भाविकांमध्ये संतप्त भावना

Pune Bhimashankar Temple : भाजपचे खासदार डॉ. निशिकांत दुबे (BJP MP Nishikant Dubey) यांच्यासाठी मंदिर खुले करून थेट व्हीआयपी दर्शन देण्यात आल्याचा आरोप होत आहे.

Pune Bhimashankar Darshan : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर मंदिरात (Bhimashankar) व्हीआयपी दर्शनावरून वाद निर्माण झाला आहे. मंदिर दुरुस्तीच्या कामामुळे सर्वसामान्य भाविकांसाठी गेल्या अडीच महिन्यांपासून मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. परिणामी नियमाप्रमाणे कुठल्याही भाविकाला मंदिरात प्रवेश आणि दर्शन घेता येत नाहीये. असे असताना मात्र भाजपचे खासदार डॉ. निशिकांत दुबे (BJP MP Nishikant Dubey) यांच्यासाठी हे मंदिर खुले करून थेट व्हीआयपी दर्शन देण्यात आल्याचा आरोप होत आहे. डॉ. निशिकांत दुबे हे झारखंड च्या गोड्डा मतदार संघातून चार वेळा भापकडून निवडून आलेले खासदार आहेत. या व्हीआयपी दर्शनावरून (VIP Darshan) भीमाशंकर मंदिर प्रशासन वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. (Bhimashankar Temple Opened for BJP MP Nishikant Dubey)

Bhimashankar Temple : महादेवाच्या मंदिरात दुजाभाव का? प्रशासनावर भाविकांचा संताप 

भीमाशंकर मंदिरातील सभामंडप आणि पायरी मार्गाच्या बांधकामासह भाविकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव जिल्हाधिकाऱ्यांनी 9 जानेवारी 2026 पासून तीन महिन्यांसाठी भीमाशंकर मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे हजारो किलोमीटर पायी व सायकल वारी करून येणाऱ्या भाविकांनाही दर्शन न घेता परत जावे लागत आहे. अशातच हेलिकॉप्टरने आलेल्या खासदार डॉ. निशिकांत दुबे यांना विशेष परवानगी देऊन मंदिरात दर्शन घडवण्यात आल्याने भाविकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. राजकीय नेत्यांसाठी मंदिर खुले आणि सर्वसामान्यांसाठी बंद का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.महादेवाच्या मंदिरात दुजाभाव का? प्रशासनावर भाविकांचा संताप व्यक्त होत आहे.

Bhimashankar Temple Rituals : नित्य पूजा सुरूच, मात्र थेट दर्शन बंद

मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद असले तरी श्री भीमाशंकराची नित्य पूजा, अभिषेक आणि धार्मिक विधी परंपरेनुसार नियमितपणे सुरू राहणार आहेत. मात्र या कालावधीत भाविकांना थेट दर्शन (Direct Darshan) किंवा मंदिर परिसरात प्रवेश दिला जाणार नाही.

Bhimashankar Temple Restrictions : प्रवेशावर कडक निर्बंध

बांधकाम यंत्रणा, अधिकृत अधिकारी-कर्मचारी आणि भीमाशंकर ग्रामस्थ वगळता अन्य कोणालाही मंदिर परिसरात प्रवेश दिला जाणार नाही. भाविकांनी या निर्णयाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात पुण्याजवळ खेड तालुक्यात भीमाशंकर

महाराष्ट्रातील पुण्याजवळ सह्याद्री पर्वतावर असलेले भीमाशंकर मंदिर बाराव्या ज्योतिर्लिंगात सहाव्या क्रमांकावर आहे. या शिवधाममध्ये स्थापित शिवलिंगाचा आकार खूप मोठा आणि जाड आहे म्हणून त्याला मोतेश्वर महादेव असेही म्हणतात. धार्मिक मान्यतेनुसार, त्रेतायुगात शिव आणि दैत्य त्रिपुरासूर यांच्यातील युद्धात इतकी उष्णता निर्माण झाली की, भीमा नदी कोरडी पडली नंतर शंकरजींच्या घामाने ही नदी पुन्हा भरली, असं म्हटलं जातं. महाराष्ट्रात पुण्याजवळ खेड तालुक्यात आहे. सह्याद्री पर्वताच्या घाट भागात असून शिवाजीनगरपासून 127 कि.मी. अंतरावर आहे. 

सहावे ज्योतिर्लिंग भीमाशंकर आसाममध्ये असल्याचा आसाम सरकारचा दावा, महाराष्ट्रातल्या नेत्यांचं जाहिरातबाजीवर जोरदार टीकास्त्र

महत्त्वाच्या बातम्या

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर गाव दत्तक अभियान, मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतलं अंतरवली सराटी गाव दत्तक 
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर गाव दत्तक अभियान, मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतलं अंतरवली सराटी गाव दत्तक 
राज्यात दुष्काळी परिस्थिती, बळीराजासाठी IAS आणि  IPS अधिकाऱ्यांचा पुढाकार, एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला
राज्यात दुष्काळी परिस्थिती, बळीराजासाठी IAS आणि  IPS अधिकाऱ्यांचा पुढाकार, एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला
'जशी आम्ही अंगणवाडी सेविकांना भाऊबीज द्यायचो, तशीच ही दुष्काळी मदत दिवाळीसाठी; पंकजा मुंडे टीकाकारांना म्हणाल्या..
'जशी आम्ही अंगणवाडी सेविकांना भाऊबीज द्यायचो, तशीच ही दुष्काळी मदत दिवाळीसाठी; पंकजा मुंडे टीकाकारांना म्हणाल्या..
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pratapgad Fort : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
Raigad Crime Controversy : रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
Team India Squad: बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
YCM Hospital : कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन; विभागीय चौकशीचे आदेश
कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
Embed widget