Pune Crime News: 1 कोटीचे 197 आयफोन चोरणारे दोघे अटकेत; पुणे पोलिसांची कारवाई
पुणे शहर पोलिसांनी फोन चोरी करणाऱ्या चोरांवर मोठी कारवाई केली आहे. त्यांच्याकडून तब्बल 1 कोटी 53 हजार रुपयांचे 197 आयफोन हँडसेट, 7 आयपॅड, 3 लॅपटॉप आणि 12 अॅक्सेसरीज जप्त केल्या आहेत.
Pune Crime News: पुणे (Pune) शहर पोलिसांनी फोन चोरी करणाऱ्या चोरांवर मोठी कारवाई केली आहे. त्यांच्याकडून तब्बल 1 कोटी 53 हजार रुपयांचे 197 आयफोन हँडसेट, 7 आयपॅड, 3 लॅपटॉप आणि 12 अॅक्सेसरीज जप्त केल्या आहेत. लोणीकंद पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत दोघांना अटक केली आहे. त्यांंच्या साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.
आरोपी हे फळ विक्रेते आहेत आणि ते टार्गेट केलेल्या ठिकाणांची पाहणी करायचे आणि नंतर झारखंड (मूळ ठिकाण) येथून मित्रांना घरफोडीसाठी बोलावायचे. त्यांनी आतापर्यंत अनेकदा चोरी केली आहे. सापळा रचून माहिती काढून ही टोळी चोरी करायची अशी माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली आहे.
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत तपास शाखेने वीस वर्षीय अब्दुल है अबुजर शेख आणि 34 वर्षीय़ अबेदूर अफजल शेख यांना ताब्यात घेतले. दोघेही झारखंडच्या साहिबगंज जिल्ह्यातील राधानगर येथील रहिवासी आहेत. 25 जुलै रोजी रात्री वाघोली-केसनंद रोडवरील भारत पेट्रोलियम पेट्रोल पंपाजवळ दरोडा (robbery) टाकण्याच्या तयारीत होते. याची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांना पडकले. टोळीतील दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले मात्र अंधाराचा फायदा घेत त्यांच्या तीन साथीदारांनी त्या ठिकाणाहून पळ काढला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
आरोपींनी 24 जुलै रोजी वाघोली येथील केसनंद रस्त्यावरील काळे ओढा मधील प्रो कनेक्ट सप्लाय चेन सोल्युशन्स लिमिटेडच्या सीमा वेअरहाऊसच्या गोदामातून मौल्यवान वस्तू चोरल्या होत्या. आरोपीने गोदाम बंद केले होते. आत प्रवेश केला आणि मौल्यवान वस्तू घेऊन निघून गेला, अशी महिती पोलिसांना तपासावेळी कळली आहे.
चुहा गॅंगच्या आवळल्या मुसक्या
पुण्यात मोठा दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चुहा गँगचा (Chuha gang) म्होरक्या तौसिफ ऊर्फ चुहा आणि त्याच्या साथीदारांच्या पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीसांनी मुसक्या आवळल्या होत्या. ही गँग मोठा दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून या गँगच्या वेळेत मुसक्या आवळल्या होत्या.