एक्स्प्लोर
Pune Wall Collapse : पुण्यातील दुर्घटनेचा संपूर्ण घटनाक्रम पाहा
पुण्यातील कोंढवा भागात सोसायटीची भिंत कोसळून 15 मजुरांचा मृत्यू झाला आहे. एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरु असून तिघांना जिवंत बाहेर काढण्यात यश मिळाले आहे.

पुणे : पुण्यातील कोंढवा भागात सोसायटीची भिंत कोसळून 15 मजुरांचा मृत्यू झाला आहे. एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरु असून तिघांना जिवंत बाहेर काढण्यात यश मिळाले आहे. अद्यापही ढिगाऱ्याखाली काही लोक असण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
पुण्यातील बडा तालाब मस्जिद परिसरात आल्कन स्टायलस या सोसायटीच्या कंपाऊंड वॉलला लागून मजुरांनी झोपड्या उभारल्या होत्या. काल (शुक्रवार) दिवसभर पुण्यात जोरदार पाऊस सुरु आहे. पावसामुळे सोसायटीची कंपाऊंड वॉल खचून मजुरांच्या कच्च्या घरांवर कोसळली. त्यामध्ये 15 मजुरांचा मृत्यू झाला आहे.
घटनेचा व्हिडीओ पाहा
दुर्घटनेचा संपूर्ण घटनाक्रम
1. रात्री 1.30 वाजता मजुरांच्या झोपड्यांवर भिंत कोसळली
2. रात्री 1.40 वाजता घटना ऊघडकीस आली, त्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली
3. रात्री 2.00 वाजता पोलीस घटनास्थळी दाखल ( रात्रभर कोंढवा पोलीस घटनास्थळी )
4. रात्री 2.15 वाजता अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले (स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या सहाय्याने मदतकार्याला सुरुवात)
5. रात्री 2.30 वाजता पुणे महानगरपालिकेची डिझास्टर मॅनेजमेंट टीम घटनास्थळी दाखल
पावसामुळे मदतकार्यात अडथळे येत होते, तसेच ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले असल्याची शक्यता असल्यामुळे एनडीआरएफला मदतीसाठी बोलावण्यात आले.
6. पहाटे 5.00 वाजता एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली
7. सकाळी 7.30 वाजता जिल्हाधिकारी नवलकिशोर राम घटनास्थळी पोहोचले
8. सकाळी 8.00 वाजता स्थानिक नगरसेवक साईनाथ बाबर घटनास्थळी दाखल झाले.
9. सकाळी 8.30 पोलीस आयुक्त घटनास्थळी पोहोचले
10. सकाळी 9 वाजता महापौर मुक्ता टिळक घटनास्थळी दाखल (महानगरपालिकेकडून बिल्डरला काम थांबवण्याचे आदेश देण्यात आले.)
पुण्यातील भिंत कोसळून मृत पावलेल्या मजुरांच्या नावांची यादी
व्हिडीओ पाहा : पुण्यात मृत्यूचं तांडव
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नवी मुंबई
व्यापार-उद्योग
यवतमाळ
क्रिकेट
Advertisement
Advertisement
























