एक्स्प्लोर

Food and Drug Administration : अन्न व औषध प्रशासनाच्या तीन दिवस धडक कारवाया; 8 लाखांचा गुटखा, पानमसाला जप्त

अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने पुणे जिल्ह्यात गेल्या तीन दिवसात9 ठिकाणी विविध छापे टाकून 8 लाख 57 हजार 355 रुपये किंमतीचा गुटखा, पानमसाला जप्त करण्यात आला आहे.

Food and Drug Administration : अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने पुणे जिल्ह्यात गेल्या तीन (Food and Drug Administration) दिवसात 9 ठिकाणी विविध छापे टाकून 8 लाख 57 हजार 355 रुपये किंमतीचा प्रतिबंधित असलेला तंबाखूजन्य गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू, सुगंधित सुपारीचा साठा जप्त करण्यात आला असून पदार्थ साठवणूक करणाऱ्या आस्थापना सील व वाहतूक करणारे एक वाहन जप्त करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाने दिली आहे.

गेल्या तीन दिवसात पुणे विभागात 38 ठिकाणी विविध छापे टाकून 9 लाख 32 हजार 382 रुपये किमतीचा प्रतिबंधित पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात 8 आस्थापना सिल करण्यात आल्या असून 9 गुन्हे दाखल केले आहेत. पुणे विभागात 36 आस्थापना सिल करण्यात आल्या असून 24 गुन्हे दाखल केले आहेत. नागरिकांचे जनहित व जनआरोग्याच्या दृष्टिकोनातून 18 जुलै 2023 च्या आदेशानुसार राज्यात गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखु, सुगंधित सुपारी इत्यादी तंबाखु जन्य पदार्थावर उत्पादक, साठा, वितरण व विक्री यावर 1 वर्षाकरिता बंदी घातलेली आहे.

FDA च्या धडाधड कारवाया...

काही दिवसांपूर्वी तुपाचे उत्पादन आणि वितरण करणाऱ्या गुप्त कारखान्याचा पर्दाफाश केला आहे. त्यांच्या कारवाईत बनावट उत्पादनाचं 650 किलोग्रॅम तूप जप्त करण्यात आलं होतं. त्यासोबतच त्याच्या मिश्रणात वापरण्यात येणारा कच्चा मालही जप्त करण्यात आला होता. पुणे शहरातील पाषाण गावातील भगवतीनगर येथे टिन शेडमध्ये लपलेल्या भूमिगत कारखान्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यातील पोलिसांनी कारखान्यावर निर्णायक छापा टाकला होता. छाप्यादरम्यान बुधवार पेठेतील रहिवासी असलेल्या संग्रामसिंग तेजसिंग राजपूत (38) बनावट तूप तयार करत होता. खाण्यायोग्य सोयाबीन तेल आणि डालडा यांच्या संशयास्पद मिश्रणाचा वापर करून बनावट तूप तयार करताना राजपूतला रंगेहात पकडण्यात आलं होतं.

अशी करा तक्रार ...

याबाबत प्रशासनाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत असल्याने प्रशासनामार्फत लवकरच विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. याप्रकरणी गैरप्रकार आढळून येणाऱ्या गुऱ्हाळ घरावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. सणासुदीच्या काळात ग्राहकांची फसवणूक करुन कमी दर्जाचे अन्न पदार्थ विक्री करणाऱ्याविरुद्ध 1800-222-365 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी असे आवाहन प्रशासनानं केलं आहे.

इतर महत्वाची बातमी-

चार राज्ये, दोन हजार किलोमीटरचा प्रवास; चंद्रपूरच्या सिंदेवाही तालुक्यातील 'ब्रह्मपुरी 21' वाघाचं महाराष्ट्रातून ओडिशामध्ये स्थलांतर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Local :मुंबईकरांसाठी मोठी बातमी, सलग पाच दिवस पश्चिम रेल्वेवरील 150 लोकल रद्द होणार, जाणून घ्या नेमकं कारण...
मोठी बातमी, पश्चिम रेल्वेवरील 150 लोकल 4 ऑक्टोबरपर्यंत रद्द, जाणून घ्या कारण...
CM Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांचाही आनंद दिघेंप्रमाणे घात करण्याचा डाव होता, शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा
एकनाथ शिंदे यांचाही आनंद दिघेंप्रमाणे घात करण्याचा डाव होता, शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
Khatron Ke Khiladi 14: करण वीर मेहरा ठरला खतरों के खिलाडी 14 चा विजेता; नव्याकोऱ्या कारसह, लाखोंच्या प्राईज मनीचा ठरला मानकरी
करण वीर मेहरा ठरला खतरों के खिलाडी 14 चा विजेता; नव्याकोऱ्या कारसह, लाखोंच्या प्राईज मनीचा ठरला मानकरी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 30 सप्टेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 30 सप्टेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 6 AM : 30  सप्टेंबर 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM : 30 सप्टेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Local :मुंबईकरांसाठी मोठी बातमी, सलग पाच दिवस पश्चिम रेल्वेवरील 150 लोकल रद्द होणार, जाणून घ्या नेमकं कारण...
मोठी बातमी, पश्चिम रेल्वेवरील 150 लोकल 4 ऑक्टोबरपर्यंत रद्द, जाणून घ्या कारण...
CM Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांचाही आनंद दिघेंप्रमाणे घात करण्याचा डाव होता, शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा
एकनाथ शिंदे यांचाही आनंद दिघेंप्रमाणे घात करण्याचा डाव होता, शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
Khatron Ke Khiladi 14: करण वीर मेहरा ठरला खतरों के खिलाडी 14 चा विजेता; नव्याकोऱ्या कारसह, लाखोंच्या प्राईज मनीचा ठरला मानकरी
करण वीर मेहरा ठरला खतरों के खिलाडी 14 चा विजेता; नव्याकोऱ्या कारसह, लाखोंच्या प्राईज मनीचा ठरला मानकरी
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Embed widget