एक्स्प्लोर
किडनी रॅकेटचा पर्दाफाश करणाऱ्याचा पुण्यात गूढ मृत्यू
गेल्या 4 वर्षांपासून या प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्या सुलेमानचा आज अचानक गूढ मृत्यू झाल्यानं पुण्यात खळबळ माजली आहे.
पुणे : पुण्यातल्या रुबी हॉल क्लिनिकमधील किडनी रॅकेट उजेडात आणणाऱ्या 36 वर्षीय सुलेमान नरसिंघानीचा आज गूढ मृत्यू झाला. वडगाव शेरी भागात राहणारा सुलेमान आज चहा पिण्यासाठी बाहेर पडला. पण घरी परतल्यानंतर बाथरुममध्ये तो मृतावस्थेत सापडला.
काय आहे नेमकं प्रकरण?
2013 साली एका रुग्णाला सुलेमानची किडनी बसवण्यात आल्याचं रुबी हॉलच्या रजिस्टरमध्ये नोंद करण्यात आली. पण प्रत्यक्षात सुलेमान याच्या दोन्ही किडन्या शाबूत होत्या. त्यामुळे या रुग्णालयात काही तरी काळंबेरं सुरु असल्याचा संशय व्यक्त करत सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने सुलेमाननं पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर एका चौकशी समितीनं या रुग्णालयात किडनी रॅकेट चालत असल्याचा अहवाल दिला. याचबरोबर सुलेमानची वैद्यकीय तपासणी केली असता त्याच्या दोन्ही किडन्या शरीरातच असल्याचं स्पष्ट झालं. या अहवालानंतर दोन डॉक्टरांना निलंबितही करण्यात आलं. पण त्यानंतर या रुग्णालयावर कोणतीही कारवाई झाली नाही.
दरम्यान, गेल्या 4 वर्षांपासून या प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्या सुलेमानचा आज अचानक गूढ मृत्यू झाल्यानं पुण्यात खळबळ माजली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement