एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

TET परीक्षा घोटाळा: आणखी बडे मासे गळाला लागणार? पुणे पोलिसांचे संकेत, घोटाळ्याचा आकडा ५ कोटींपर्यंत

TET Exam Paper Leak Scam : टीईटी परीक्षा घोटाळ्या प्रकरणी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली असून भविष्यातही आणखी आरोपींना अटक करण्यात येणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले.

TET Paper Leak Scam : शिक्षक पात्रता परीक्षेतही घोटाळा झाल्याचे समोर आल्यानंतर पुणे पोलिसांनी आज आणखी दोन बड्या माशांना अटक केली आहे.  महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष सुखदेव डेरे आणि बंगळुरूमधून जीए टेक्नॉलॉजीच्या प्रमुख अश्विनकुमार यांना अटक करण्यात आली आहे. सुखदेव डेरे हे टीईटी परीक्षेच्या वेळी नियंत्रक होते. तर, जीए टेक्नॉलॉजीकडे या परीक्षेचे कंत्राट होते. या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून आणखी काहीजणांना टप्प्याटप्प्याने अटक करण्यात येणार असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले की,  म्हाडा भरती पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात इतर परीक्षांमध्येही घोटाळे झाले असल्याचे समोर आल्यानंतर पुणे पोलिसांनी याचा तपास सुरू केला. 2018 मध्ये झालेल्या टीईटी परीक्षा घोटाळ्यात डेरे हा सूत्रधार असल्याची माहिती मिळाली. टीईटीची 15 जुलै 2018 रोजी परीक्षा पार पडली होती. या परीक्षेचा निकाल 12 ऑक्टोबर 2018 रोजी जाहीर झाला. त्यावेळी परीक्षा नियंत्रक डेरे होते. तर, परीक्षेचे कंत्राट जीए टेक्नॉलॉजीकडे होते. या परीक्षेतही घोटाळ्याचा पॅटर्न सारखा असल्याचे समोर आले. पैसे घेतलेल्या उमेदवारांना उत्तरपत्रिकेतील ओएमआर रिकामे सोडण्यास सांगितले जायचे. उत्तरपक्षिका स्कॅन करताना या उमेदवारांच्या उत्तरपत्रिका भरल्या जायच्या अथवा त्यांना गुण दिले जायचे. या आरोपींनी निकालात घोटाळा करताना खोटी प्रमाणपत्रे दिली असल्याचे समोर आले असल्याची माहिती पोलीस आयुक्त गुप्ता यांनी दिली. 

या प्रकरणातील आणखी काही आरोपींना टप्प्याटप्प्याने अटक करण्यात येणार आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडे पुरावेदेखील मिळाले असल्याची माहिती पोलीस आयुक्त गुप्ता यांनी दिली. आरोपींची गुन्ह्यातील भूमिका नेमकी काय होती, याबाबत सविस्तरपणे कोर्टात माहिती देण्यात येणार आहे. या घोटाळ्यात सहभागी असणाऱ्या सर्वांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

पेपरफुटी प्रकरणातील दलाल होता संजय सानप

भाजप कार्यकर्ता संजय सानप हा आरोग्य भरतीचा पेपर फोडण्यात सहभागी होता.  एवढंच नाही तर त्याने वडझीरे गावातील मंगल कार्यालयात आरोग्य  पैसै देणाऱ्या उमेदवारांना बोलाऊन त्यांच्याकडून फोडलेला हा पेपर लिहून घेतला होता. सानप हा प्रशांत बडगीरेच्या अतिशय जवळचा होता.  त्यातूनच त्याला 31 ऑक्टोबरला झालेला आरोग्य भरतीचा पेपर आधीच मिळाला होता आणि परिक्षेच्या काही दिवस आधीच त्याने हा पेपर वडझीरे गावातील मंगल कार्यालयांमध्ये हा पेपर लिहून घेतला होता, अशी माहिती तपासात समोर आली आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
Raj Thackeray & Uddhav Thackeray: राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत खरंच एकत्र येणार का?
राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी खरंच एकत्र येणार का?
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 27 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaBJP Vidhan Sabha Winning plan Sanjay Bhende: बुथ टू बुथ मार्किंग;भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यशABP Majha Headlines :  9 AM : 27 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde Maharashtra : शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद किंवा केंद्रात कॅबिनेट मंत्रिपदाची ऑफर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
Raj Thackeray & Uddhav Thackeray: राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत खरंच एकत्र येणार का?
राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी खरंच एकत्र येणार का?
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
Eknath Shinde: मुख्यमंत्रीपद मिळण्याची आशा मावळताच एकनाथ शिंदेंनी गुगली टाकली, म्हणाले, श्रीकांतला उपमुख्यमंत्री करा
श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्री करा, मला केंद्रात मंत्रिपद नको, एकनाथ शिंदेंच्या मागणीने महायुतीत पेच?
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
Bollywood Actor Life: जन्म होताच आईला गमावलं, ड्रग्सच्या नशेनं बालपण हिरावलं, 'या' अभिनेत्याला ओळखलंत का?
जन्म होताच आईला गमावलं, ड्रग्सच्या नशेनं बालपण हिरावलं, 'या' अभिनेत्याला ओळखलंत का?
Embed widget