TET Exam Scam Case : महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष सुखदेव डेरे, जीए टेक्नॉलॉजीच्या प्रमुखाला अटक
TET Exam Scam Case : टीईटी पेपरफुटी प्रकरणी पुणे पोलिसांची आणखी दोेघांना अटक करण्यात आलीय. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे माजी विभागीय अध्यक्ष सुखदेव डेरे यांना अटक करण्यात आलीय.
TET Exam Scam Case : सध्या राज्यात टीईटी पेपरफुटी प्रकरणात अटकेचं सत्र सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. टीईटी पेपरफुटी प्रकरणी पुणे पोलिसांची आणखी एक कारवाई करण्यात आली आहे. टीईटी पेपरफुटी प्रकरणी पुणे पोलिसांकडून आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष सुखदेव डेरे यांना अटक करण्यात आली आहे. तसेच बंगळुरूमधून जीए टेक्नॉलॉजीच्या प्रमुखालाही अटक करण्यात आली आहे.
टीईटीच्या परिक्षेतील गैरप्रकार हे जेव्हापासून जीए टेक्नॉलॉजीला परीक्षा विभागाचे कंत्राट मिळाले तेव्हापासून म्हणजे, 2017 पासुन सुरु होते, असं आता स्पष्ट झालंय. याच अनुषंगाने पुणे पोलिसांनी आणखी दोन महत्वाच्या व्यक्तींना या प्रकरणात अटक केली आहे. यातील पहिली अटक आहे, जीए टेक्नॉलॉजी या कंपनीचा प्रमुख अश्विन कुमार याची. अश्विन कुमारला पुणे पोलीसांनी बंगळुरूमधून अटक केली आहे. तर दुसरी महत्त्वाची अटक आहे महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे आयुक्त सुखदेव डेरे यांची. डेरेंना संगमनेर तालुक्यातील त्यांच्या मुळ गावातून पोलिसांनी अटक केली आहे. अश्विन कुमार हा आधीपासून या प्रकरणात अटकेत असलेल्या प्रितेश देशमुखचा वरिष्ठ आहे. तर सुखदेव डेरे हे 2017 साली जेव्हा जीए टेक्नॉलॉजीला शिक्षण परिषदेकडून परीक्षा घेण्याचे कंत्राट मिळाले होते, तेव्हा शिक्षण परिषदेचे आयुक्त होते. या सगळ्यांनी मिळून 2018 साली झालेल्या टीईटी परीक्षेतही अशाचप्रकारे अपात्र उमेदवारांना पात्र ठरवल्याच समोर आलं आहे. जीए टेक्नॉलॉजी या कंपनीकडे 2017 ते 2020 या काळात शिक्षण परिषदेचं परीक्षा घेण्याचं कंत्राट होतं. मधल्या काळात सुखदेव डेरे हे सेवानिवृत्त झाले आहेत.
महाराष्ट्र परीक्षा मंडळाचे अध्यक्ष तुकाराम तुपेंच्या घरी धाडसत्र
TET परीक्षा पेपरफुटी प्रकरणात पुणे पोलिसांकडून मोठी माहिती मिळाली आहे. शिक्षक पात्रता परीक्षेत महाराष्ट्र परीक्षा मंडळाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांच्या घरातून पहिल्या धाडीत 88 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केल्यानंतर आता दुसऱ्या धाडीत दोन कोटींहून अधिक रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. दुसऱ्या धाडीत तुकाराम सुपे यांच्या घरी आणखी पैशाचं घबाड सापडलं आहे. पोलिसांना तपासात सुपेंच्या घरातून दोन कोटीहून अधिक रक्कम आणि सोने हस्तगत केलं आहे. सुपे यांच्या घरी पोलीस धाड टाकायच्या आधीच पत्नी आणि मेहुण्याने रक्कम दुसरीकडे ठेवली होती. मात्र पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर दोन कोटींहून अधिक रक्कम आणि सोने मिळाले. याआधी 17 डिसेंबर रोजी शिक्षक पात्रता परीक्षेत महाराष्ट्र परीक्षा मंडळाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांच्या घरातून 88 लाख रुपयांची रोख रक्कम पुणे पोलिसांनी जप्त केली होती. पुणे पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा अतिरीक्त कार्यभार असलेले तुकाराम सुपे यांना पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. सुपेंसोबत शिक्षण आयुक्ताचा सल्लागार अभिषेक सावरीकर यालाही पोलिसांनी अटक केली आहे.
पुणे पोलिसांचे आवाहन
आरोग्य पेपर फुटी, महाडा पेपर फुटी (Paper Leak) आणि आता टीईटी परीक्षेत (TET Exam) झालेल्या गैरव्यवहाराचा तपास पुणे सायबर पोलीस ठाण्याचे 70 कर्मचारी करत आहेत. यामध्ये वीस अधिकारी आहेत. त्यामुळे ज्यांची फसवणूक झाली आहे, अशांनी पुढे येऊन पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे. पुणे सायबर पोलिसांसोबत युनिट वन आणि युनिट फोरचे अधिकारी देखील आता या पेपर फुटी प्रकरणी तपास करणार आहेत. यासोबतच आरोपींनी टीईटीच्या परीक्षेचा पेपर देण्याच्या आमिषाने अनेकांकडून पैसे घेतले असल्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्यांची फसवणूक झाली त्यांनी समोर यावे, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- TET परीक्षा घोटाळा प्रकरण : दुसऱ्या धाडीतही तुकाराम सुपेंच्या घरी घबाड, दोन कोटींहून अधिक रक्कम जप्त
- Mhada Paper Leak Scam : पेपरफुटी प्रकरणात भाजयुमोचा नेता संजय सानपला अटक
- Tukaram Supe : तुकाराम सुपे यांना पुणे पोलिसांकडून अटक,'टीईटी'त लाच घेऊन पास केल्याचा ठपका
- MHADA Paper Leak : महाराष्ट्र परीक्षा मंडळाचे अध्यक्ष तुकाराम सुपेच्या घरातून 88 लाखांची रोकड जप्त
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI