Supriya Sule: 'बदला पुरा' मुंबईत देवेंद्र फडणवीसांचं हातात रिव्हॉल्व्हर घेतल्याचं पोस्टर, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल म्हणाल्या, 'मिर्झापूर टिव्ही सिरिजमध्येच...'
Supriya Sule: वांद्रेसह अनेक भागात बदलापूर नावाची पोस्टर्स लावण्यात आली आहेत, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो असलेले अनेक बॅनर मुंबईत लावण्यात आले असून, त्यावर 'बदला पुरा' असं लिहण्यात आलेलं आहे.
पुणे: महाराष्ट्रातील बदलापूर शाळेतील लैंगिक छळ प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस चकमकीत मृत्यू झाल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापल्याचं दिसून येत आहे, अशातच मुंबईत पोस्टर वॉरही सुरू झाले आहे. मुंबईतील कलानगरी असलेल्या वांद्रेसह अनेक भागात बदलापूर नावाची पोस्टर्स लावण्यात आली आहेत, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो असलेले अनेक बॅनर मुंबईत लावण्यात आले असून, त्यावर 'बदला पुरा' असं लिहण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर या पोस्टरवरती देवेंद्र फडणवीस यांच्या हातात रिव्हॉल्व्हर (बंदूक) दाखवण्यात आली आहे. त्यावर आज पुण्यात माध्यमांशी बोलताना खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी हल्लाबोल केला आहे. देवेंद्रजी असे बॅनर लहान मूल बघतील काय म्हणतील, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
मला सगळ्यात जास्त दु:ख एका गोष्टीचं झालं. देवेंद्रजी बंदूक दाखवत आहेत. हा बंदुकांचा देश नाही. हा शाहू, फुले, आंबेडकरांचा देश आहे, आणि राज्य आहे. त्यामुळेत देवेंद्रजींनी तिथून आम्हाला बंदुका दाखवल्या तर आम्ही अथून देवेंद्रजींना संविधान दाखवू. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसजी असे बंदूक घेतलेल बॅनर लहान मूल बघतील तेव्हा काय म्हणतील, अक्षय शिंदे एन्काऊंटर वरून देवेंद्र फडणवीस यांचे बंदूक धरलेले पोस्टर वायरल होत आहेत. त्यावर आज सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गृहमंत्र्याच्या हातात बंदूक असणं आणि त्याची पोस्टरबाजी करणं हे माझ्यासारख्या महिलेसाठी हे फार धक्कादायक आहे. कराण जी लहान मुलं ते पोस्टर बघतील, त्यांच्यावर काय संस्कार होतील. या राज्याचाच गृहमंत्री बंदूक घेऊन फिरतोय. बस ते मिर्झापूर टिव्ही सिरिज मध्येच या गोष्टी चालतात. बॉस हे वास्तव आहे. हा शाहू, फुले, आंबेडकरांचा देश आहे, असंही सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) पुढे म्हटलं आहे.
नेमकं काय घडलं?
बदलापूरमधील शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याला काल(सोमवारी) सायंकाळी सव्वा सहा वाजता तळोजा कारागृहातून ट्रान्झिट रिमांडच्या आधारे ताबा घेऊन पोलीस त्याला ठाण्याकडे आणत होते. त्यावेळी अचानक त्याने वाहनात शेजारी बसलेल्या सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांचे रिव्हॉल्वर हिसकावून घेतली आणि पोलिसांवर गोळीबार केला. यात निलेश मोरे गंभीर जखमी झाले. अक्षय शिंदे पळून जाण्याची भीती असल्याने सीआययूचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी त्यांच्या रिव्हॉल्वरमधून अक्षय शिंदेच्या दिशेने 3 गोळ्या झाडल्या. त्यात अक्षय शिंदे गंभीर जखमी झाला. यानंतर अक्षय शिंदेला कळवा महापालिका रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले. डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
दरम्यान या घटनेत अनेक खुलासे समोर येत आहेत. सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन नुसार आरोपी अक्षयच्या हातात कस्टडी लावली नव्हती. त्याच्यासोबत एक अधिकारी आणि तीन पोलिस कर्मचारी होते. मुंब्रा बायपास रोडवर सीसीटिव्ही कॅमेरे नाहीत. असते तर तोही ठोस पुरावा झाला असता. लवकरच ठाण्यात आम्ही 600 कोटींचा सीसीटिव्ही कॅमेरा प्रकल्प राबवत आहोत. या प्रकल्पांतर्गत 6 हजार सीसीटिव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत. गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे दिला गेला आहे, अशी माहिती आहे.