Pune Special Train : उन्हाळी प्रवासाची चिंता मिटली; पुण्याहून 'या' शहरासाठी उन्हाळी विशेष ट्रेन
प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे : उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शाळांना सुट्ट्या लागल्या आहे. यामुळे नागरिकांचा प्रवास वाढण्याची शक्यता आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.पुणे ते दानापूर, हजरत निजामुद्दीन आणि नागपूरसाठी उन्हाळी विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत.
1) पुणे-दानापूर-पुणे (8 ट्रिप)
गाडी क्रमांक 01471 पुणे- दानापूर सुपरफास्ट द्वीसाप्ताहिक विशेष दिनांक 11.4.2024, 14.4.2024, 02.5.2024 आणि 05.5.2024 (गुरुवार,रविवार) रोजी पुण्याहून 06.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 12.00 वाजता दानापूरला पोहोचेल.
गाडी क्रमांक 01472 दानापूर - पुणे सुपरफास्ट द्वि साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस दिनांक 12.4.2024, 15.4.2024, 03.5.2024 आणि 06.5.2024 (शुक्रवार,सोमवार) रोजी दानापूर येथून 13.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 19.45 वाजता पुण्याला पोहोचेल.
थांबे कोणते असतील?
हडपसर, दौंड कार्ड लाइन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा
2) पुणे-नागपूर-पुणे (38 ट्रीप)
गाडी क्रमांक 01166 पुणे-नागपूर सुपरफास्ट द्वी साप्ताहिक विशेष दिनांक 14.4.2024 ते 16.6.2024 (19 ट्रिप) दरम्यान प्रति मंगळवार, रविवार पुण्याहून15.50 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 06.30 वाजता नागपूरला पोहोचेल.
गाडी क्रमांक 01165 नागपूर - पुणे सुपरफास्ट द्वि साप्ताहिक विशेष दिनांक 13.4.2024 ते 15.4.2024 दरम्यान (19 ट्रिप) प्रति सोमवार, शनिवार नागपूरहून 19.40 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी11.25 वाजता पुण्याला पोहोचेल.
थांबे कोणते असतील?
उरुळी, दौंड कार्ड लाइन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, मलकापूर, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा
3) पुणे–हज़रत निजामुद्दीन–पुणे (24 ट्रीप)
गाडी क्रमांक 01491 पुणे-हज़रत निज़ामुद्दीन साप्ताहिक सुपरफास्ट विशेष दिनांक 12.4.2024 ते 28 .6.2024 दरम्यान (12ट्रिप)दर शुक्रवारी पुण्याहून17.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 16.45 वाजता हज़रत निज़ामुद्दीनला पोहोचेल.
गाडी क्रमांक 01492 हज़रत निज़ामुद्दीन - पुणे साप्ताहिक सुपर फास्ट विशेष दिनांक13.4.2024 ते 29.6.2024 दरम्यान (12ट्रिप ) दर शनिवारी हज़रत निज़ामुद्दीन येथून 22.10 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 23.55 वाजता पुण्याला पोहोचेल.
थांबे कोणते असतील?
लोणावळा,कल्याण, वसई रोड, सुरत, बडोदा, रतलाम,भवानीमंडी, कोटा, सवाई माधोपुर आणि मथुरा.
गाडी क्रमांक 01471, 01165, 01166 आणि 01491 साठी बुकिंग दिनांक 08 एप्रिलपासून सर्व आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in वेबसाइटवर सुरू होईल. विशेष गाड्यांच्या थांबण्याच्या तपशीलवार वेळेसाठी www.enquiryindianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा. प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आलं आहे.
इतर महत्वाची बातमी-