एक्स्प्लोर

Pravin Mane Join Ajit Pawar Group : फडणवीसांनी चहापानावर जबरदस्त डाव साधला; सुप्रिया सुळेंचा प्रचार करणारे सोनाईचे प्रवीण माने अजित पवार गटात जाण्याची शक्यता

सोनाई डेअरीचे चेअरमन प्रवीण माने आणि शरद पवारांचे निकटवर्तीय  शरद पवारांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. प्रवीण माने शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांसोबत जाण्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

बारामती,  पुणे : सोनाई डेअरीचे चेअरमन प्रवीण माने आणि शरद पवारांचे निकटवर्तीय  शरद पवारांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. प्रवीण माने शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांसोबत जाण्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. साधारण 11 वाजता ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. इंदापूरच्या मेळाव्यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रवीण माने यांच्याकडे चहापान केलं होतं. त्यानंतर त्यांनी आपली भूमिका बदलल्याचं दिसत आहे. 

बारातमी लोकसभा मतदार संघात असलेला आणि महत्वाचा मानला जाणारा इंदापूर मतदार संघात बारामती लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये समेट घडवण्यासाठी आणि महायुतीमधील एकोपा वाढवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची शुक्रवारी इंदापूरमध्ये (Indapur) सभा घेतली. या सभेपूर्वी फडणवीसांनी सोनाईच्या प्रवीण मानेंच्या घरी भेट दिली आणि चहापानाचा कार्यक्रम केला. अचानक प्रवीण मानेंच्या घरी फडणवीस दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. 

बारामती लोकसभा मतदारसंघातील सगळ्यात महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ म्हणून इंदापूरमध्ये आमदार दत्तात्रय भरणे अजित पवारांच्या बाजूला गेल्यानंतर शरद पवारांच्या बाजूने कमी परंतु प्रवीण माने हे शरद पवारांच्या बाजूला असल्याने पुढील विधानसभेचा चेहरा म्हणून प्रवीण माने यांच्याकडेदेखील पाहिले जायचं परंतु उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत इंदापूरमध्ये भाजपचा मेळावा पार पडणार होता. ज्यावेळी देवेंद्र फडणवीस इंदापूरला आले. त्यावेळी स्वागताला प्रवीण माने त्यांना अनेकांच्या भुवया उंचावल्या आणि नंतर देवेंद्र फडणवीस हर्षवर्धन पाटलांच्या घरी येणार होते हर्षवर्धन पाटलांच्या घरी येण्याआधी देवेंद्र फडणवीस प्रवीण माने यांच्या घरी पोहोचले आणि त्यामुळे चर्चा सुरू झाली की अजित पवारांची प्रवीण माने हे अजित पवारांसोबत गेलेत का?  त्यानंतर  भूमिका जाहीर करू असं प्रवीण माने यांनी सांगितलं होतं.परंतु आता प्रवीण माने हे आता पवारांसोबत जाणार आहेत. पुणे जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रवीण गारटकर यांच्या उपस्थितीत प्रवीण माने यांचा पक्षप्रवेश होईल.

सुप्रिया सुळेंंसाठी मैदानात उतरले पण...

सुप्रिया सुळे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रवीण माने हे सुप्रिया सुळेंचा प्रचार करत होते. इंदापूरच्या प्रचाराची आखणी त्यांनी केली होती. सुप्रिया सुळेंचा प्रचार करुन इंदापूरात सुप्रिया सुळेंना विजयी करण्यासाठी कंबर कसली होती. मात्र आता त्यांनी निर्णय बदलला आणि ते अजित पवार गटात जाणार असल्यानं शरद पवार गटाला ऐन निवडणुकीत मोठा धक्का मानला जात आहे. 

इतर महत्वाची बातमी-

Mahayuti Seat Sharing Dispute : आमच्या उठावामुळेच भाजप सत्तेत, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शिंदेसेनेची हाय व्होल्टेज बैठक

 

 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Pune Jamavbandi: पुण्यात आज मध्यरात्रीपासून 14 दिवसांसाठी जमावबंदी लागू; पुणे पोलिसांनी घेतला मोठा निर्णय, कारणही आलं समोर
पुण्यात आज मध्यरात्रीपासून 14 दिवसांसाठी जमावबंदी लागू; पुणे पोलिसांनी घेतला मोठा निर्णय, कारणही आलं समोर
Pune Crime News: नात्यातील महिलेच्या मोबाईलवर मेसेज पाठवला; पुण्यातून अपहरण, सांगलीत संपवले, तपासानंतर पोलिसही चक्रावले!
नात्यातील महिलेच्या मोबाईलवर मेसेज पाठवला; पुण्यातून अपहरण, सांगलीत संपवले, तपासानंतर पोलिसही चक्रावले!
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget