एक्स्प्लोर

Shrirang Barne : दिल्लीचं पथक मावळात आलं! आधी कळवलं आता बारणे म्हणतात मला कल्पना नाही!

केंद्रीय पथक मावळात आलं आहे. ते बारणेंच्या प्रचारावर नजर ठेवणार असल्याचं बारणेंच्या टीमकडून सांगण्यात आलं होतं. मात्र यासंदर्भातील बारणेंना काहीच कल्पना नसल्याचं बारणे म्हणाले आहेत.

मावळ, पुणे : मावळ लोकसभेत महायुतीमध्ये (Maval Loksabha election) खदखद आहे, ही चर्चा सर्वत्र रंगलेली आहे. अशातच श्रीरंग बारणेंचा (Shrirang Barne) प्रचार नेमका कसा सुरु आहे, हे प्रत्यक्षात पाहण्यासाठी दिल्लीचं एक पथक मावळ लोकसभेत आलं आहे. याबवत प्रसारमाध्यमांना प्रसिद्धी पत्रकाद्वारे बारणेंच्याच टीमने कळवलं होतं. मात्र मला याबाबतची कल्पना नाही, ते पथक माझ्यापर्यंत आलं नाही, असं म्हणत बारणेंनी आता सावध भूमिका घेतली आहे.

महायुतीची प्रत्येक जागा ही महत्वाची आहे. त्यामुळे एनडीए आघाडीकडून सगळ्या बारीकसारीक गोष्टींकडे लक्ष ठेवण्यासाठी काही लोक आले असतील. पण या पथकासंदर्भात मला कोणतीही माहिती नाही. एनडीएची निवडणूक यंत्रणा चांगली काम करते. मी माझ्या वरिष्ठांना प्रचाराची माहिती देतो. शिवाय तेदेखील फोनवरुन प्रचाराची माहिती घेतात. अनेक विषयांवर चर्चा करतात आणि विचारपूसदेखील करतात. मात्र केंद्राचं असं कोणतं पथक आल्याची मला कोणतीही माहिती नसल्याचं बारणेंनी सांगितलं आहे. 

मविआचे उमेदवार संजोग वाघेरेंना( Sanjog Waghere) मतदारसंघात कोणी ओळखत नाहीत, असं बारणे अनेकदा म्हणतात. मग अनोळखी उमेदवाराच्या पराभवासाठी मोदींची गरज का भासली? तसेच संजोग पाटील या अपक्ष उमेदवाराला तुम्हीच रिंगणात उतरवलं का? या प्रश्नांचा खुलासा ही बारणेंनी केला. 


विरोधी उमेदवार असलेल्या संजोग वाघेरेंना पाडण्यासाठी पंतप्रधानांच्या सभेची गरज होती का?, असं विचारल्यास ते म्हणाले की,  देश स्वतंत्र झाल्यानंतर पासून चा इतिहास आहे. केंद्रीय नेतृत्व नेते सभा घेतात.  इंदिरा गांधींची सभा झाली होती. राजीव गांधींची सभा झाली. मनमोहन सिंहची सभा झाली. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील सभेसाठी आले आहेत. पुणे जिल्ह्यातील चार मतदारसंघाच्या उमेदवारांसाठी मोदींनी सभा घेतली. त्यांच्या सभेला मोठी गर्दी झाली होती. या सभेमुळे नक्की मतदानात फरक पडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. 

केंद्रिय पथक नेमकं काय करणार?

बारणे यांचे मताधिक्य वाढवण्यासाठी प्रामाणिकपणे आणि जीव तोडून काम करीत असलेले पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या कामांची नोंद या पथकामार्फत घेतली जाणार आहे. पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या कामगिरीची चार श्रेणीमध्ये विभागणी करण्यात येणार आहे. सर्वोत्कृष्ट श्रेणीमध्ये आपले नाव राहावे यासाठी स्पर्धा लागल्याचे दिसून येत आहे. महायुतीच्या घटकांमध्ये काही कार्यकर्ते वैयक्तिक राजकीय महत्त्वाकांक्षांपोटी प्रचारापासून अलिप्त राहत आहेत किंवा विरोधात काम करत असल्याचे दिसत आहे. प्रत्यक्ष माहिती घेऊन अशा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नावे चौथ्या श्रेणीत अर्थात 'ब्लॅक लिस्ट'मध्ये असणार आहेत. त्या संदर्भातील अहवाल संबंधित घटक पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनाही देण्यात येणार आहे. महायुतीच्या वतीने यापुढे ब्लॅक लिस्ट मधील कोणत्याही व्यक्तीला संधी देण्यात येणार नाही, असा इशारा टीमकडून देण्यात आला आहे.

इतर महत्वाची बातमी-

कुठे ऊन, कुठे पाऊस! ठाणे, मुंबईत उन्हाच्या झळा, IMD कडून यलो अलर्ट; विदर्भ, मराठवाड्यात पाऊस

Shrirang Barne : मोदींच्या सभेनंतरही महायुतीत खदखद कायम; प्रचारावर नजर ठेवण्यासाठी दिल्लीचं पथक मावळात पाठवण्याची 'वेळ'.

Guru Gochar 2024 : आज होणार गुरु ग्रहाचं सर्वात मोठं संक्रमण! पुढच्या वर्षापर्यंत 'या' राशींवर असणार गुरुची कृपा; धन-संपत्तीत होईल प्रचंड वाढ

एबीपी माझा सोबत 7 वर्षांपासून, 13 वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

अपुऱ्या कागदपत्रामुळं दस्त नोंदणी करण्यास नकार, रागातून थेट अधिकाऱ्यावरच हल्ला, पुणे जिल्ह्यात धक्कादायक घटना
अपुऱ्या कागदपत्रामुळं दस्त नोंदणी करण्यास नकार, रागातून थेट अधिकाऱ्यावरच हल्ला, पुणे जिल्ह्यात धक्कादायक घटना
संतापजनक! महाविद्यालयीन तरुणीवर सलग एक वर्ष चौघांकडून लैंगिक अत्याचार, पुण्यात धक्कादायक घटना, चार आरोपींना अटक 
संतापजनक! महाविद्यालयीन तरुणीवर सलग एक वर्ष चौघांकडून लैंगिक अत्याचार, पुण्यात धक्कादायक घटना, चार आरोपींना अटक 
Khalil Shaikh and Ravindra Dhangekar Case : खलील शेख प्रकरणी रवींद्र धंगेकरांच्या अटकपूर्व जामीनावरील सुनावणी पुढे ढकलली, कोर्टात नेमकं काय घडलं? अ‍ॅड. विजयसिंह ठोंबरेंनी दिली माहिती
खलील शेख प्रकरणी रवींद्र धंगेकरांच्या अटकपूर्व जामीनावरील सुनावणी पुढे ढकलली, कोर्टात नेमकं काय घडलं? अ‍ॅड. विजयसिंह ठोंबरेंनी दिली माहिती
Ketan Agrawal Case: केतनमध्ये नेमकं काय आवडलं?. सिया हसत म्हणाली 'He Is Caring and Kind'; साखरपुड्यात 'तो' भावनिक व्हिडिओ आला समोर
केतनमध्ये नेमकं काय आवडलं?. सिया हसत म्हणाली 'He Is Caring and Kind'; साखरपुड्यात 'तो' भावनिक व्हिडिओ आला समोर

व्हिडीओ

Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report
NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
CJP Protest : विद्यार्थी सोडाच... तीन टर्म आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
विद्यार्थी सोडाच... तीन टर्म आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
Share Market : सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
Amit Shah : CJP च्या आंदोलनामुळं नवी दिल्लीत बैठकांचा धडाका, अमित शाहांची धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत बैठक, इतर दोन मंत्र्यांची हजेरी 
अभिजित दिपकेच्या सीजेपीच्या आंदोलनाचा परिणाम, दिल्लीत बैठकांचा धडका, अमित शाहांच्या बैठकीत तीन मंत्र्यांची उपस्थिती  
Delhi Jantar Mantar Protest: 'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
Yogendra Yadav : संसदेकडे जाणारे सर्व रस्ते गर्दीने भरुन गेलेत, लाखोंचा जमाव पाहून योगेंद्र यादव भारावले, म्हणाले, 'हा ऐतिहासिक क्षण...'
50 वर्षांनंतर शिक्षण आणि बेरोजगारीच्या मुद्यावर युवक रस्त्यावर उतरले, योगेंद्र यादव व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
Samruddhi Mahamarg Accident : मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
Embed widget