एक्स्प्लोर

Guru Gochar 2024 : आज होणार गुरु ग्रहाचं सर्वात मोठं संक्रमण! पुढच्या वर्षापर्यंत 'या' राशींवर असणार गुरुची कृपा; धन-संपत्तीत होईल प्रचंड वाढ

Guru Gochar 2024 : गुरु ग्रहाचं हे संक्रमण जरी वृषभ राशीत होणार असलं तरी सर्व 12 राशींवर याचा प्रभाव पडणार आहे.

Guru Gochar 2024 : आज 1 मे महाराष्ट्र दिनाचा (Maharashtra Day) उत्साह सगळीकडे साजरा केला जातोय. आज आणखी एक गोष्ट खास आहे ते म्हणजे आज सर्वात मोठा ग्रह गुरुचं संक्रमण होणार आहे. ज्योतिषशास्त्रात, गुरु ग्रहाचं संक्रमण म्हणजे सर्वात मोठी घटना मानली जाते. पंचांगानुसार, आज दुपारी 12 वाजून 59 मिनिटांनी हे संक्रमण होणार आहे. गुरु ग्रह आज मेष राशीतून वृषभ राशीत (Taurus Horoscope) परिवर्तन करणार आहे. गुरु ग्रहाचं हे संक्रमण जरी वृषभ राशीत होणार असलं तरी सर्व 12 राशींवर याचा प्रभाव पडणार आहे. तर, चार राशींसाठी हे संक्रमण फार शुभ मानलं जाणार आहे. 

गुरु ग्रह पुढच्या एक वर्षापर्यंत वृषभ राशीत स्थित असणार आहे. याच दरम्यान 12 जून रोजी गुरु ग्रह रोहिणी नक्षत्रात संक्रमण करणार आहे. त्यानंतर 9 ऑक्टोबर रोजी गुरु आपली वक्री चाल करणार आहे. आणि 4 फेब्रुवारी 2025 रोजी गुरु ग्रह मार्गक्रमण करतील. त्यानंतर पुढच्या वर्षी 14 मे 2025 रोजी गुरु ग्रह मिथुन राशीत परिवर्तन करणार आहेत. तोपर्यंत कोणत्या राशींवर गुरुची कृपा असणार आहे ते जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Horoscope) 

मेष राशीतून गुरु वृषभ राशीत परिवर्तन करणार आहे. मात्र, हे परिवर्तन होत असताना गुरु मेष राशीच्या लोकांनाही लाभ देणार आहे. या दरम्यान मेष राशीच्या लोकांना फक्त यशच मिळणार नाही तर चांगला धनलाभही प्राप्त होईल. धनप्राप्तीसाठी अनेक नवीन मार्ग सापडतील. नशीबाची देखील साथ तुमच्याबरोबर असणार आहे. 

कर्क रास (Cancer Horoscope)

गुरुच्या राशी परिवर्तनाचा लाभ कर्क राशीवर देखील होणार आहे. कर्क राशीवर गुरुची नेहमीच कृपा असते.त्यामुळेच पुढच्या एक वर्षापर्यंत देखील गुरु कर्क राशीच्या लोकांच्या पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. पैसे मिळवण्याचे नवीन मार्ग तुमच्यासमोर खुले होतील. प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला प्रगतीच्या अनेक संधी निर्माण होतील. 

सिंह रास (Leo Horoscope)

गुरु ग्रहाचं वृषभ राशीत होणार हे संक्रमण सिंह राशीला देखील लाभदायी ठरणार आहे. याचा तुमच्या करिअरवर विशेष प्रभाव पडणार आहे. ज्या कामाची तुम्ही गेले अनेक महिने वाट पाहात होतात ते काम देखील मार्गी लागेल. तुम्हाला प्रमोशन, तसेच तुमच्या इच्छेनुसार नोकरीत बदली मिळण्याची शक्यता आहे. जे बेरोजगार आहेत त्यांना रोजगार मिळेल. 

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीसाठी गुरु ग्रहाचं संक्रमण अत्यंत शुभ आणि फलदायक ठरणार आहे. कन्या राशीच्या लोकांना प्रत्येक पावलावर गुरुची कृपा असणार आहे. तुमची जी काही बिघडलेली कामे आहेत ती सुरळीत पार पडताना दिसतील. मात्र या दरम्यान तुमच्या खर्चात देखील वाढ होणार आहे.तुमच्या करिअरसाठी ही वेळ फार अनुकूल असणार आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

आज महाराष्ट्र दिन, तर गुरु ग्रहाचं वृषभ राशीत परिवर्तन; मेष, कर्कसह 'या' राशींना मिळणार कर्माचं फळ, वाचा 12 राशींचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Surya Nakshatra Parivartan 2026 : अवघ्या काही तासांतच केतूच्या नक्षत्रात सूर्याचा प्रवेश; 31 ऑगस्टपर्यंत 3 राशींच्या पदरात पडणार फक्त पुण्य, मालामाल होतील राशी
अवघ्या काही तासांतच केतूच्या नक्षत्रात सूर्याचा प्रवेश; 31 ऑगस्टपर्यंत 3 राशींच्या पदरात पडणार फक्त पुण्य, मालामाल होतील राशी
Weekly Horoscope: कुंभ, मीन राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा प्रगतीचा, आर्थिक लाभाचे योग, साप्ताहिक राशीभविष्य
कुंभ, मीन राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा प्रगतीचा, आर्थिक लाभाचे योग, साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope : धनु, मकर राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा धनलाभाचा, नोकरीत बदलीचे संकेत; आर्थिक स्थिती सुधारणा, साप्ताहिक राशीभविष्य
धनु, मकर राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा धनलाभाचा, नोकरीत बदलीचे संकेत; आर्थिक स्थिती सुधारणा, साप्ताहिक राशीभविष्य
Budhaditya Yog 2026 : बुधादित्य योगामुळे सुरु होणार सुवर्णकाळ, 22 ऑगस्टपासून 4 राशींचं नशीब पालटणार, धनलाभाचे सुवर्णयोग
बुधादित्य योगामुळे सुरु होणार सुवर्णकाळ, 22 ऑगस्टपासून 4 राशींचं नशीब पालटणार, धनलाभाचे सुवर्णयोग

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget