एक्स्प्लोर
Advertisement
मेट्रोच्या कामासाठी शिवाजीनगर बसस्थानकाचे स्थलांतर
शिवाजीनगर बसस्थानक खडकीत हलवल्यानं येथे जाण्यायेण्यासाठी जास्तीचा वेळ खर्ची पडणार आहे. तसेच या स्थानकावर येण्या जाण्याचा खर्चही वाढणार आहे. दरम्यान, प्रवाशांसाठी लवकरच या खडकीतील बसस्थानकापर्यंत पुणे सीटी बससेवा सुरु केली जाणार आहे.
पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एस टी बस स्टँड आजपासून बंद झाले झाले आहेत. शिवाजीनगर बस स्थानक आहे त्या ठिकाणी मेट्रो आणि एस टी बस स्थानक अशी एकत्र भव्य इमारत बांधण्याचे काम चालू असल्यामुळे हा तात्पुरता बदल करण्यात आला आहे. आता हे बसस्थानक खडकी भागातील बजाज उद्यानाजवळ हलवण्यात आले आहेत. आता पुढील 4 ते 5 वर्षे खडकीमध्ये हे बसस्थानक असणार आहे.
दरम्यान, शिवाजीनगर बसस्थानक खडकीत हलवल्यानं येथे जाण्यायेण्यासाठी जास्तीचा वेळ खर्ची पडणार आहे. तसेच या स्थानकावर येण्या जाण्याचा खर्चही वाढणार आहे. दरम्यान, प्रवाशांसाठी लवकरच या खडकीतील बसस्थानकापर्यंत पुणे सीटी बससेवा सुरु केली जाणार आहे.
शिवाजीनगर स्थानकातून उत्तर महाराष्ट्रात अहमदनगर अथवा नाशिक मार्गे जाणार्या व तिकडून येणार्या गाड्यांचा समावेश आहे. त्या शिवाय या ठिकाणाहून येऊन पुढे मुंबईकडे जाणार्या बसेस ही येथूनच सुटतात किंवा येतात. याचप्रमाणे कोकणातील रोहा, पाली, पेण व अलिबाग येथे जाणार्या गाड्याही येथूनच ये जा करतात.
पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गावरून मेट्रो धावणार असल्याने, शिवाजीनगर बस स्थानक येथील जमिनीखालून मेट्रोचे स्थानक होणार आहे. या कारणामुळे हे स्थानक स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मेट्रोचे काम सुरु होण्यापूर्वीच नवीन जागेमध्ये बस स्थानक उभारणीचा निर्णय घेण्यात आला. काही अडचणींमुळे कामास विलंब झाला असला तरी अखेर त्याला मुहूर्त मिळाला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement