एक्स्प्लोर

Amol Kolhe Vs Adhalrao Patil : ट्रेलर बघताच आढळराव पाटलांची बोलती बंद; जो माणूस आव्हान देऊन शब्द फिरतो त्याच्यावर विश्वास कसा ठेवायचा; अमोल कोल्हेंनी घेतला आढळराव पाटलांचा समाचार

ट्रेलर बघताच आढळराव पाटलांची बोलती बंद झाल्याचं सांगत, अमोल कोल्हेंनी  आढळराव पाटलांचा शेलक्या शब्दात समाचार घेतलाय.

शिरुर, पुणे : लोकसभेच्या शिरुर मतदारसंघात (Shirur Loksabha Election 2024) महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांमध्ये चांगल्याच शाब्दिक चकमकी रंगल्या आहेत. महायुतीचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Adhalrao Patil) यांना अमोल कोल्हे (Amol kolhe) यांनी केलेल्या आरोपांचे पुरावे सादर करण्याचं आव्हान दिलं होतं. त्यावर पुराव्यांचा ट्रेलर दाखवल्यावर आढळराव पाटलांनी हा आपल्याला घेरण्याचा प्रयत्न असल्याचं सांगत,  कोणत्याच आरोपांना उत्तर देणार नसल्याचं सांगितलं. त्यावर कोल्हे यांनी ट्रेलर बघताच आढळराव पाटलांची बोलती बंद झाल्याचं सांगत,  आढळराव पाटलांचा शेलक्या शब्दात समाचार घेतलाय.

महाविकास आघाडीतील शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार अमोल कोल्हे यांनी ओतूर मध्ये झालेल्या शरद पवारांच्या जाहीर सभेत आढळराव पाटील यांच्यावर थेट निशाणा साधला होता. काही लोक फक्त व्यापार करण्यासाठी संसदेत गेले. संसदेत 60-70 प्रश्न फक्त संरक्षण खात्याविषयी विचारले गेले. हे प्रश्न विचारून कोणाच्या कंपनीच भल होतंय हे कळतय, असं म्हणत काही प्रश्न उपस्थित केले.

यानंतर दोन दिवसांनी आढळराव पाटलांनी कोल्हे यांनी केलेले आरोप फेटाळत, पुरावे द्या, राजकारणातून बाजूला होतो, असं आव्हान दिले. हे आव्हान स्वीकारत कोल्हे यांनी आजच्या शिरुर तालुक्याच्या दौऱ्यात, पाणबुडीवरून क्षेपणास्त्र डागण्याचा प्रश्न एकदा नव्हे तर दोनदा विचारल्याच, पुराव्यानिशी कोल्हे यांनी दाखवून दिलं. यानंतर लगेच आढळराव पाटील यांनी, हा सगळा आपल्याला डॉ. कोल्हे यांच्या कोणत्याच आरोपांना उत्तर द्यायच नाही, असं सांगितलं. यावर कोल्हेंनी आढळराव पाटलांना चांगलचं धारेवर धरलं. 

कोल्हे म्हणाले की, सुरवातीलाच सांगितलं होतं, आव्हान दिल्यानंतर शब्द फिरवू नका. पण ट्रेलर बघितल्यावरच त्यांची बोलती बंद झाली. पानुबुडीवरून क्षेपणास्त्र डागण्याचा शिरूर लोकसभा मतदार संघाशी आणि विकासासाठी काय संबंध याच उत्तर त्यांनी द्यावं. तीन टर्म विश्वास ठेवून संसदेत पाठवलं होत, मग कोणत्या कंपनीच भलं करण्यासाठी हे प्रश्न विचारले, याच उत्तर आढळरावांनी द्यायला हवं. 

आज सगळ्या सरड्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला असेल इतक्या पटकन त्यांनी रंग बदलेत, असा टोला लगावत आढळराव पाटलांनी संरक्षण खात्याला आवश्यक असणाऱ्या सांधनांच्या खरेदी संदर्भातच प्रश्न का विचारलेत, याच उत्तर देणे ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळं उत्तर देणार नाही, अस म्हणून चालणार नाही, अशा शब्दात आढळराव पाटलांना जाहीरपणे सुनावलं आहे.

इतर महत्वाची बातमी-

Sharad Pawar : तेच शरद पवार, तेच बारामती, पण चिन्ह अन् मैदान मात्र वेगळं असणार; अजित पवारांनी हक्काचे मैदान घेतले!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Aditya Thackeray On EVM : ईव्हीएम नसतं तर भाजपला 40 जागा देखील मिळाल्या नसत्या, आदित्य ठाकरेंचा टोलाMaharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024Amol Mitkari On Hindu Rastra : 500 पार झाला तरी हिंदूराष्ट्र शक्य नाही, अमोल मिटकरींचे वक्तव्यABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Embed widget