एक्स्प्लोर

Shirish Maharaj More Suicide Case : शिरीष महाराज मोरे यांनी आयु्ष्य का संपवलं? 32 लाखांचं कर्ज नेमकं कशासाठी घेतलं? चार धक्कादायक कारणं समोर

Shirish Maharaj More Suicide Case : चिठ्ठीत पैशांचा सगळा हिशोब दिला अन् मृत्यूला कवटाळलं; शिरीष महाराजांनी 32 लाखाचं कर्ज का घेतलं? सुन्न करणारी माहिती समोर!

Shirish Maharaj More Suicide Case : संत तुकाराम महाराजांचे 11 वंशज शिरीष महाराज मोरे यांनी आज (दि.5) देहूतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी रात्री (दि.5) ते जेवण केल्यानंतर झोपायला गेले. मात्र, सकाळी खोलीचे दार उघडलेले दिसेना. त्यामुळं दार तोडले असता त्यांनी उपरण्याच्या साह्यानं गळफास घेतल्याचं समोर आलं. आर्थिक विवंचनेतून हे पाऊल उचलल्याचं सुसाईड नोटमध्ये शिरीष महाराज मोरे यांनी नमूद केलं होतं. वीस दिवसांपूर्वी त्यांचा साखरपुडा झाला होता तर एप्रिल महिन्यात त्यांचा विवाह होणार होता. मात्र, त्यांच्या टोकाच्या निर्णयामुळे त्याच्या कुटुंबियास आत्पस्वकियांना मोठा धक्का बसलाय. दरम्यान, शिरीष महाराज मोरे यांनी कर्ज कशासाठी घेतलं होतं याची माहिती देखील समोर आलीये. 

शिरीष महाराज मोरेंनी कर्ज कशासाठी घेतलं?

1. कोरोनाच्या आधी शिरीष महाराज मोरे व्यवसाय क्षेत्रात उतरले होते. कागदी पिशवी बनवणे अन् त्यावर छपाई करुन देण्याचा व्यवसाय सुरु केला. यासाठी त्यांनी कर्ज उचलले होते. मात्र कोरोनाच्या काळात हा व्यवसाय बंद पडला अन् महाराजांना पहिलं आर्थिक नुकसान झेलावं लागलं.

2. अडीच वर्षांपूर्वी हॉटेल क्षेत्रात उतरण्याचं ठरवलं. नादब्रह्म ईडलीची काही लाख रुपये मोजून फ्रेंचायजी घेतली. पिंपरी चिंचवड परिसरात हा नवा व्यवसाय सुरु केला, जो आज ही सुरु आहे. आधीचं कर्ज असताना पुन्हा या व्यवसायासाठी ही महाराजांनी कर्ज घेतलं.

3. काही महिन्यांपूर्वी एक मजली घर बनवलं, त्यासाठी ही लाखांमध्ये खर्च झाला.

4. अलीकडेच महाराजांनी चार चाकी गाडी ही घेतली, त्यासाठी ही कर्ज घ्यावं लागलं.

वारकरी संप्रदायावर दु:खाचा डोंगर, देहू संस्थानाच्या अध्यक्षांसह सदस्यांनी व्यक्त केल्या भावना 

शिरीष महाराज मोरेंनी जगाचा निरोप घेताना, माझ्या मागे प्रत्येकाने दिलेलं कर्ज फेडावं. असं म्हणून कोणावर अन्याय होणार नाही, याची दक्षता ही घेतली. या मार्फत शिरीष महाराजांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची परंपरा जपली. मात्र त्यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली. असं म्हणत चुकीची चर्चा घडवण्यात येत असल्याचं मोरे कुटुंबियांचे म्हणणे आहे. अनेकजण किर्तनावर मोठे होत आहेत, मात्र शिरीष महाराजांनी आजवर मोफत किर्तनसेवा केलीये. फक्त यावेळी जरा गडबड झाली अन् दुःखाचा डोंगर वारकरी संप्रदायावर कोसळला. शिरीष महाराजांनी एकवेळ आवाज दिला असता तर अख्खा महाराष्ट्र मदतीला नक्कीच धावला असता. अशी खंत ही देहूकर व्यक्त करतायेत. शिरीष महाराजांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठ्यांचा आधार घेत, देहूरोड पोलीस पुढील तपास करत आहेत.

मंत्री नितेश राणेंनी X प्लॅटफॉर्मवरुन व्यक्त केले दु:ख 

नितेश राणे म्हणाले, संत तुकाराम महाराजांचे वंशज,राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे स्वयंसेवक ह.भ.प शिरीष महाराज मोरे यांचे आज आकस्मित निधन झाले. मोरे कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वराने देवो व आत्म्यास सदगती मिळो हिचं परमेश्वरा चरणी प्रार्थना...ॐ शांती..भावपूर्ण श्रद्धांजली..

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Shirdi : शिर्डी संस्थानच्या जेवणासाठी आता कूपन आवश्यक, वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर निर्णय

एबीपी माझा सोबत 7 वर्षांपासून, 13 वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव...
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ravindra Dhangekar : पुण्यात महायुतीच्या पहिल्याच बैठकीत धंगेकरांना ‘नो एंट्री’, भाजपची साथ महत्त्वाची; धंगेकर दुय्यम? शिंदेंच्या सेनेचा स्पष्ट संदेश
महायुतीच्या पहिल्याच बैठकीत धंगेकरांना ‘नो एंट्री’, भाजपची साथ महत्त्वाची; धंगेकर दुय्यम? शिंदेंच्या सेनेचा स्पष्ट संदेश
BJP : भाजप महापालिका निवडणुकीत भाकरी फिरवणार, 20 ते 25 टक्के नगरसेवकांना डच्चू देणार? नव्या चेहऱ्यांना संधी देणार
भाजप महापालिका निवडणुकीत भाकरी फिरवणार, 20 ते 25 टक्के नगरसेवकांना डच्चू देणार? नव्या चेहऱ्यांना संधी देणार
IND vs SA 5th T20 Playing 11: अखेर संजू सॅमसनला संधी मिळणार, जसप्रीत बुमराहचं कमबॅक, पाचव्या टी 20 मध्ये कोणाला संधी कोण बाहेर? संभाव्य प्लेईंग 11
अखेर संजू सॅमसनला संधी मिळणार, जसप्रीत बुमराहचं कमबॅक, पाचव्या टी 20 मध्ये कोणाला संधी कोण बाहेर?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 डिसेंबर 2025 | गुरुवार

व्हिडीओ

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
Ajit Pawar : अजित पवार चक्रव्यूहात, कोकाटे, मुंडे, पार्थ पवार नंचर आता ड्रग्ज प्रकरणाची डोकेदुखी
Maharashtra LIVE Superfast News : बातम्यांचा वेगवान आढावा : 18 DEC 2025 : ABP Majha
Manikrao Kokate Arrest Update : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
Ajit Pawar On Manikrao Kokate : अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ravindra Dhangekar : पुण्यात महायुतीच्या पहिल्याच बैठकीत धंगेकरांना ‘नो एंट्री’, भाजपची साथ महत्त्वाची; धंगेकर दुय्यम? शिंदेंच्या सेनेचा स्पष्ट संदेश
महायुतीच्या पहिल्याच बैठकीत धंगेकरांना ‘नो एंट्री’, भाजपची साथ महत्त्वाची; धंगेकर दुय्यम? शिंदेंच्या सेनेचा स्पष्ट संदेश
BJP : भाजप महापालिका निवडणुकीत भाकरी फिरवणार, 20 ते 25 टक्के नगरसेवकांना डच्चू देणार? नव्या चेहऱ्यांना संधी देणार
भाजप महापालिका निवडणुकीत भाकरी फिरवणार, 20 ते 25 टक्के नगरसेवकांना डच्चू देणार? नव्या चेहऱ्यांना संधी देणार
IND vs SA 5th T20 Playing 11: अखेर संजू सॅमसनला संधी मिळणार, जसप्रीत बुमराहचं कमबॅक, पाचव्या टी 20 मध्ये कोणाला संधी कोण बाहेर? संभाव्य प्लेईंग 11
अखेर संजू सॅमसनला संधी मिळणार, जसप्रीत बुमराहचं कमबॅक, पाचव्या टी 20 मध्ये कोणाला संधी कोण बाहेर?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 डिसेंबर 2025 | गुरुवार
VB-G-RAM-G: लोकसभेत गोंधळामध्येच 'व्हीबी जी राम जी' विधेयक मंजूर विरोधकांनी कागदपत्रे भिरकावली
लोकसभेत गोंधळामध्येच 'व्हीबी जी राम जी' विधेयक मंजूर विरोधकांनी कागदपत्रे भिरकावली
Video: नोकरी लागत नाही, लगीन होत नाही, गाय दूध देत नाही, नवरा बायकोची भांडण होत आहेत? मग श्री राम जय जय राम म्हणा; भाजप खासदाराचा थेट संसदेतून 'सल्ला'
Video: नोकरी लागत नाही, लगीन होत नाही, गाय दूध देत नाही, नवरा बायकोची भांडण होत आहेत? मग श्री राम जय जय राम म्हणा; भाजप खासदाराचा थेट संसदेतून 'सल्ला'
BMC Electin: मुंबईत भाजप शिवसेनेत 150 जागांवर एकमत, उर्वरित जागांवर निर्णय शिंदे-फडणवीस घेणार; अमित साटम म्हणाले, 'धनुष्यबाण, कमळ दोन्ही एकच आहेत, कोणत्याही कारणाने युती तुटणार नाही'
मुंबईत भाजप शिवसेनेत 150 जागांवर एकमत, उर्वरित जागांवर निर्णय शिंदे-फडणवीस घेणार; अमित साटम म्हणाले, 'धनुष्यबाण, कमळ दोन्ही एकच आहेत, कोणत्याही कारणाने युती तुटणार नाही'
Savari Drugs Case : मुलुंडच्या फूटपाथवरील ड्रग्जकांड साताऱ्यातील सावरीपर्यंत कसं पोहोचलं, शिंदेंच्या भावाचं नाव कसं आलं? हादरवणारी कहाणी
मुलुंडच्या फूटपाथवरील ड्रग्जकांड साताऱ्यातील सावरीपर्यंत व्हाया पुणे कसं पोहोचलं, शिंदेंच्या भावाचं नाव कसं आलं? हादरवणारी कहाणी
Embed widget