एक्स्प्लोर
पुणे मेट्रोचं भूमिपूजन पंतप्रधान मोदींच्या नव्हे, शरद पवारांच्या हस्ते !
पुणे : पुणे मेट्रोच्या भूमिपूजनावरुन आता राजकीय श्रेयवादाची लढाई पाहायला मिळण्याची शक्यता आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होईल, असे भाजपने जाहीर केले आहे. मात्र, पुणे महापालिकेच्या पक्षनेत्यांच्या बैठकीत बहुमताने प्रस्ताव मंजूर करत शरद पवारांच्या हस्ते भूमिपूजन करण्याचे जाहीर केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पुणे मेट्रोचं भूमिपूजन होणार आहे. पुणे महापालिकेच्या पक्षनेत्यांच्या बैठकीत यासंदर्भातील प्रस्ताव बहुमताने मंजूर करण्यात आला. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदींऐवजी शरद पवार यांच्या हस्ते भूमिपूजन केले जाईल.
दरम्यान, 24 तारखेला नरेंद्र मोदी मुंबई आणि पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यातच पंतप्रधान पुणे मेट्रोचं भूमिपूजन करणार असल्याचे भाजपने आधीच जाहीर केले आहे. मात्र, पुणे महापालिकेच्या पक्षनेत्यांच्या बैठकीत पवारांच्या हस्ते भूमिपूजनाचा प्रस्ताव मंजूर केल्याने आता श्रेयवादाची लढाई पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
संबंधित बातमी : पुणे मेट्रोला मुहूर्त, पंतप्रधानांच्या हस्ते होणार भूमिपूजन
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement