एक्स्प्लोर

Sharad Pawar : दिलीप वळसे पाटील पाय घसरुन पडल्यानं रुग्णालयात, शरद पवारांकडून फोनवरुन विचारपूस

Sharad Pawar Phone Call to Dilip Walse Patil : दिलीप वळसे पाटील पाय घसरुन पडल्यानं दुखापतग्रस्त झाले आहेत. शरद पवार यांनी दिलीप वळसे पाटील यांना फोन करुन संवाद साधत विचारपूस केली.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांना फोन करुन प्रकृतीची विचारपूस केली आहे. दिलीप वळसे पाटील हे त्यांच्या घरी पाय घसरुन पडले होते. यानंतर दिलीप वळसे पाटील यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभाताई पवार यांनी देखील दिलीप वळसे पाटील यांच्याशी संवाद साधत प्रकृतीची विचारणा केली. 

दिलीप वळसे पाटील हे त्यांच्या घरात पाय घसरून पडले होते. त्यामुळं वळसे पाटील यांच्या खुब्याला मार आणि हाथ फ्रॅक्चर झाला होता. यानंतर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दिलीप वळसे पाटील यांना दाखल करण्यात आलं होतं. 

महाराष्ट्र राज्याचे सहकार दिलीपराव वळसे पाटील हे काल  27 मार्च 2024 रोजी रात्री 11.45 वाजता घरात पाय घसरून पडल्याने त्यांच्या डाव्या मांडीचे हाड व डाव्या हाताच्या मनगटाला फ्रॅक्चर झाले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यांच्यावर लवकरच शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे, अशी माहिती अस्थिरोग तज्ञ डॉ.निरज आडकर व हृदयरोग तज्ञ डॉ. सदानंद राऊत यांनी काल दिली.

शरद पवार यांनी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. शरद पवारांनी दिलीप वळसे पाटील यांच्याशी फोनवरुन संवाद साधला अशी माहिती आहे. शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभाताई पवार यांनी देखील दिलीप वळसे पाटील यांच्याशी संवाद साधत फोनवरुन प्रकृतीची विचारपूस केली आहे. दिलीप वळसे पाटील यांच्याशी संवाद साधत शरद पवारांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राची राजकीय संस्कृती कशी जपायची हे दाखवून दिलं आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट तरीही संवाद सुरु

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 जुलै 2023 रोजी फूट पडली त्यावेळी शरद पवार यांचे मानसपूत्र म्हटले जाणारे दिलीप वळसे पाटील अजित पवारांसोबत गेले होते. अजित पवारांसोबत गेलेलेअनेक नेते शरद पवारांना भेटणं टाळतात. मात्र, दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकांच्या निमित्तानं आमने सामने येत असतं. राष्ट्रवादीतील फुटीनंतरही दिलीप वळसे पाटील शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्तानं पुण्यात मोदीबागेत गेले होते. 

संबंधित बातम्या :

Devendra Fadnavis on Archana Patil Chakurkar : डॉ. अर्चना पाटलांमुळे लातुरात भाजपला नेतृत्व मिळालं; देवेंद्र फडणवीसांची पक्षप्रवेशावर प्रतिक्रिया

Arunachal Pradesh Assembly Elections 2024 : ना मतदान, ना मतमोजणी तरीही अरुणाचल प्रदेशात भाजपचे आठ उमेदवार विजयी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP MajhaPankaja Munde : पंकजाताईंना पाहताच कुटुंबियांनी फोडला टाहो; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटलाCm Eknath Shinde Meeting : मुख्यमंत्री शिंदेंच्या मुंबईतील नंदनवन बंगल्यावरील बैठक संपन्नABP Majha Headlines : 05 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
Embed widget