एक्स्प्लोर

Santosh Deshmukh Case: 'एक कोटी घरी नेल्याशिवाय वाल्मिक कराड झोपत नव्हता...', उत्तमराव जानकरांचं संतोष देशमुख प्रकरणावर परखड भाष्य, म्हणाले, 'राजकीय वरदहस्त...'

Uttamrao Jankar on Santosh Deshmukh Case: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार उत्तमराव जानकर यांनी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप असलेला वाल्मिक कराड हा अद्याप फरार आहे. वाल्मिक कराड हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांचा निकवर्तीय असल्याने राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप मोठ्या प्रमाणावर होत आहेत, जवळपास वीस दिवस उलटून देखील या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक झाली नसल्याने सर्वपक्षीय नेते, संघटना, सामाजिक कार्यकर्ते यांनी संताप व्यक्त केला आहे. काल बीडमध्ये सर्वपक्षीय मुक मोर्चा काढण्यात आला, यावेळी सत्ताधारी, विरोधी पक्षाचे आमदार, खासदार, नेते उपस्थित होते, दरम्यान या प्रकरणात धनंजय मुंडे यांना देखील लक्ष केलं जात आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार उत्तमराव जानकर यांनी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 

नेमकं काय म्हणालेत जानकर?

माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांनी आज शरद पवारांची भेट घेतली, त्यानंतर माध्यमांशी बोलताना बीडच्या घटनेवर आणि गुन्हेगारीवरती परखडपणे भाष्य केलं आहे. उत्तम जानकर म्हणाले, 'तो प्रसंग अतिशय हृदयद्रावक आहे, अतिशय भयानक अशी ती घटना घडली आहे. मी त्या ठिकाणी गेलो होतो, कुटुंबासोबत भेट घेतली आहे. तिथे असणाऱ्या दोनशे तीनशे लोकांसोबत मी बोललो. त्या ठिकाणच्या परिस्थितीची मी माहिती घेतली. बीडमध्ये अतिशय भयानक गुंडाराज आहे. जवळपास दोन ते अडीच हजार रिव्हॉल्वरचं लायसन्स आहे, कोणी एखादा टिप्पर वाला असेल त्याचा उद्घाटन करायचा असेल तर हवेत गोळीबार केले जातात. चौकामध्ये एखाद्याचा वाढदिवस असेल तर तरी गोळ्या झाडल्या जातात, अशी परिस्थिती बीडमध्ये आहे.

 तर या राज्यांमध्ये जिल्ह्या जिल्ह्यामध्ये मोर्चे निघतील

या प्रकरणात दोषी आहेत, त्यांना शिक्षा झाली पाहिजे. यामध्ये वाल्मीक कराड ज्यांच्यासाठी खून करत होता, वाल्मीक कराड यांच्यासाठी खंडणी गोळा करत होता, त्याच्यासाठी हा मलिदा गोळा करत होता, तो कोण आहे त्याला देखील शिक्षा झाली पाहिजे. इतकं सगळं करण्यामागे कारणच इतकं होतं कोणालातरी नेवून द्यायचं, या प्रकरणात न्याय मिळाला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी काल सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला, त्याला माझाही पाठिंबा आहे. त्याच्या पुढच्या लढाईमध्ये देखील मी त्यांच्यासोबत असेल. वाल्मीक कराड याला अटक करावी, त्याला तात्काळ अटक झाली नाही, तर या राज्यांमध्ये जिल्ह्या जिल्ह्यामध्ये मोर्चे निघतील असंही पुढे उत्तमराव जानकर म्हणालेत.

कोट रुपये घरी घेऊन गेल्याशिवाय वाल्मिक कराड झोपत नव्हता

तर धनंजय मुंडे त्यांचा करता करविता आहे, या सर्व प्रकरणामागे त्यांनी ताकद दिली. तो सुद्धा तेवढाच गुन्हेगार आहे. कोणताही राजकीय वरदहस्त असल्याशिवाय इतके खून, इतक्या मारामाऱ्या, इतकी खंडणी, करू शकत नाही, दररोज एक कोट रुपये घरी घेऊन गेल्याशिवाय वाल्मिक कराड झोपत नव्हता अशी चर्चा बीड जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांना मध्ये आहे, 1000 रुपये जरी कमी असले तरी कोणाच्यातरी हात पाय मोडून त्याचे पैसे घेऊन ये किंवा एखाद्याचा खून करून ये इतका चिल्लर काम करायचा. एक हजार रुपये कमी असले तरी त्याला झोप नाही यायची, हा प्रकार या राज्यामध्ये घडत होता, हे एका दिवसांमध्ये घडलेलं नाही याच्यामध्ये राजकीय ताकद आणि वरदहस्त असल्याशिवाय असा घडू शकत नाही असेही पुढे उत्तमराव जानकर म्हणालेत. तर राज्य सरकारने याकडे कानाडोळा केला नाही, तर राज्य सरकारने हे तयार केलेले गुंड आहेत. आज त्यांच्यावर कारवाई करायची उद्या गडबड होईल, सत्ता जाईल आणि फक्त ईव्हीएमच्या माध्यमातून त्यांनाही सत्ता मिळालेली आहे. लोकशाहीची सत्ता नाही त्यामुळे राज्य सरकारच्या ताकदीशिवाय हे घडू शकत नाही असे पुढे ते म्हणालेत.

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
Raj Thackeray: इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
Embed widget