एक्स्प्लोर

मोठी बातमी : शरद पवार-अजितदादा आज पुण्यात आमनेसामने, राजकीय घडामोडींना वेग

Pune News : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज पुण्यात आमनेसामने येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. 

पुणे : शरद पवारांनी (Sharad Pawar) स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) सुरुंग लावून अजित पवार भाजपसोबत गेले. यानंतर शरद पवार आणि अजित पवारांमध्ये (Ajit Pawar) अनेकदा कलगीतुरा रंगला आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि शरद पवार यांची भेट झाली होती. आता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज पुण्यात (Pune) आमनेसामने येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुणे दौऱ्यात अजित पवारांच्या उपस्थितीत आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा नियोजन समितीची (Pune DPDC) बैठक आज दुपारी दोन वाजता पार पडणार आहे. 

डीपीडीसीच्या बैठकीत पवार काका-पुतणे समोरासमोर येणार? 

या डीपीडीसीच्या बैठकीचे निमंत्रण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना देण्यात आले आहे. त्यांनी आजच्या बैठकीला हजेरी लावली तर  शरद पवार आणि अजित पवार आज आमनेसामने येतील. यापूर्वी महाविकास आघाडी सरकार असताना शरद पवारांनी अचानकपणे डीपीडीसी बैठकीला हजेरी लावली होती. त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीला शरद पवार हजेरी लावणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 

अजित पवार - शरद पवार एकत्र येणार? 

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे महायुती सरकारमध्ये अस्वस्थ असल्याच्या चर्चा आहेत. लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर अजित पवार आणि शरद पवार हे पुन्हा एकत्र येतील, अशाही चर्चा काही दिवसांपासून रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना मोठं वक्तव्य केले होते.  त्यांनी म्हटले होते की, निवडणुका येतात आणि जातात, कुटुंब कायम राहते. घरामध्ये सगळ्यांना जागा आहे. मात्र, पक्षांमध्ये जागा आहे की नाही? हा व्यक्तिगत निर्णय मी घेणार नाही. माझे सगळे सहकारी संघर्षाच्या काळात मजबुतीने उभे राहिले त्यांना पहिल्यांदा विचारेन आणि ते तयार झाली तर असे म्हणत त्यांनी हा निर्णय एकट्याचा होणार नसल्याचे स्पष्ट केले होते.

आणखी वाचा 

Sharad Pawar on Nilesh Lanke : शपथ घ्यायला उभा राहिला धाड धाड धाड धाड इंग्रजी, गाडी जी सुटली ती ...,शरद पवारांकडून लंकेंचं कौतुक विखेंवर निशाणा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
Maharashtra Vidhan Sabha Exit Poll 2024: महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकालाची शक्यता, राज्यातील या 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकाल? राज्यातील 'या' 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
Horoscope Today 22 November 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget