Sharad Pawar on Nilesh Lanke : शपथ घ्यायला उभा राहिला धाड धाड धाड धाड इंग्रजी, गाडी जी सुटली ती ...,शरद पवारांकडून लंकेंचं कौतुक विखेंवर निशाणा
Sharad Pawar on Nilesh Lanke, अहमदनगर : "आम्ही ठरवलंय, माणसं साधी द्यायची. आता बघा निलेश लंके (Nilesh Lanke) निवडणुकीला उभे राहिले त्यांच्याविरुद्ध एक मोठे नेते होते आणि त्या मोठ्या नेत्यांनी जाहीर केलं की हा गृहस्थ पार्लमेंटमध्ये जाणार, याला इंग्रजी येत नाही आणि हा तिथे जाऊन काय करणार?"
Sharad Pawar on Nilesh Lanke, अहमदनगर : "आम्ही ठरवलंय, माणसं साधी द्यायची. आता बघा निलेश लंके (Nilesh Lanke) निवडणुकीला उभे राहिले त्यांच्याविरुद्ध एक मोठे नेते होते आणि त्या मोठ्या नेत्यांनी जाहीर केलं की हा गृहस्थ पार्लमेंटमध्ये जाणार, याला इंग्रजी येत नाही आणि हा तिथे जाऊन काय करणार? पार्लमेंटमध्ये इंग्रजी यावे लागतं असं नाही. पार्लमेंटमध्ये हिंदीत बोलता येतं, मराठीत बोलता येतं, तुमच्या मातृभाषेत बोलता येतं. ते गेले पार्लमेंटमध्ये, मलाही काळजी होती. म्हणलं आमचा गडी पार्लमेंटमध्ये जातोय, काय बोलतोय माहित नाही. शपथ घ्यायला उभा राहिला धाड धाड धाड धाड इंग्रजी..!! गाडी जी सुटली ती गाडी मधीआधी नाहीच, सगळं पार्लमेंट बघायला लागलं कोण ह्यो गडी आला?", असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले. अहमदनगरमधील (Ahmednagar) अकोले (Akole) येथे स्व. अशोक भांगरे यांचा जयंती सोहळा व शेतकरी मेळाव्यात सहभागी शरद पवार (Sharad Pawar) सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी भाष्य केलं.
शेतकऱ्याच्या हिताची जपवणूक इथं होत नसेल, तर इथलं मी काम चालूनच देणार नाही
शरद पवार म्हणाले, माझ्या शेतकऱ्याच्या हिताची जपवणूक इथं होत नसेल, तर इथलं मी काम चालूनच देणार नाही. तिथं मांडणी जी केली, ती कष्टकऱ्याची, शेतकऱ्याची मांडणी त्याठिकाणी केली आणि असा एक नाही. आज असे 31 खासदार त्या ठिकाणी जाऊन बसले. मी त्या सगळ्यांच्या वतीने तुम्हाला खात्री देतो की, 31 खासदार महाराष्ट्राच्या कष्टकऱ्यांची भूमिका मांडण्याच्यासाठी प्रयत्नांची पराकष्टा त्या ठिकाणी करतील आणि एक प्रकारचं देशामध्ये राजकारण बदलण्याची आज जी आवश्यकता आहे. त्याच्यामध्ये यश संपादन करतील, याचा सार्थ अभिमान तुम्हा सगळ्यांना वाटेल एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला.
अकोला तालुका हा महाराष्ट्राचा आदिवासीबहुल तालुका, अतिवृष्टी असलेला तालुका
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, अकोला तालुका हा महाराष्ट्राचा आदिवासीबहुल तालुका, अतिवृष्टी असलेला तालुका, भंडारदऱ्या सारखं प्रचंड धरण असणारा हा तालुका आणि महाराष्ट्राच्या एकेकाळच्या दुष्काळी नगर जिल्ह्याला पाणी देण्यासंबंधीची भूमिका घेणारा हा तालुका आहे. या तालुक्यामध्ये लोकांच्या हिताची जपवणूक करणार नेतृत्व हे जन्माला आलं, ज्याच्यामध्ये यशवंतराव बांगरेंच नाव घ्यावं लागेल. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मी ज्यावेळेस पहिल्यांदा गेलो त्यावेळेला लोकांचे आणि आदिवासींचे प्रश्न प्रामाणिकपणाने मांडणारे जे विधानसभेचे सभासद होते त्याच्यामध्ये यशवंतरावांचा उल्लेख हा आम्हा सगळ्यांना करावा लागेल. नंतरच्या काळामध्ये ती जबाबदारी अशोकरावांनी घेतली. दुर्दैवाने नियतीच सांगणं काही वेगळं होतं आणि ते तुम्हा-आम्हा सगळ्यांच्यातून लवकर निघून गेले. पण त्यांचा विचार हा होता की, नवीन पिढी तयार करायची आणि त्या पिढीच्या मार्फत अकोला तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेचे प्रश्न कसे सुटतील? याची खबरदारी घ्यायची आणि त्यासंबंधीची आस्था त्यांच्या मनात होती, असंही शरद पवारांनी सांगितलं.
इतर महत्वाच्या बातम्या