एक्स्प्लोर
Doctors On Strike: 'आम्हाला न्याय हवा', Phaltan डॉक्टर प्रकरणानंतर MARD आक्रमक
साताऱ्याच्या फलटणमधील एका महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर डॉक्टरांच्या संघटना आक्रमक झाल्या असून, राज्यभरात काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनादरम्यान ‘या सगळ्या प्रकाराची योग्य चौकशी व्हावी आणि डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न हा राज्य सरकारनं गांभीर्यानं घ्यावा,’ अशी मुख्य मागणी करण्यात आली आहे. मुंबईतील नायर रुग्णालयासह अनेक सरकारी रुग्णालयांतील डॉक्टरांनी या संपात सहभाग घेतला आहे. महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (MARD) आणि इतर संघटनांनी अत्यावश्यक सेवा वगळता बाह्यरुग्ण विभागासारख्या (OPD) इतर सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणामुळे डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, जोपर्यंत सरकारकडून ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
सांगली
राजकारण
Advertisement
Advertisement

















