एक्स्प्लोर

UPSC Result : मुलाखतीच्या आधी आईचं निधन, खचली नाही अन् डगमगलीही नाही; इंदापूरची शामल भगत 24 व्या वर्षी बनली कलेक्टर

UPSC Success Story : दहावी झाल्यानंतर घरच्यांनी लग्न ठरवलं, पण त्याला विरोध करून शिक्षण पूर्ण केलं आणि आता थेट यूपीएससी उत्तीर्ण होऊन कलेक्टर बनली. 

पुणे : नशिबात जे काही लिहिलं असेल तेच घडतं असं म्हणत आपल्याकडे समोर येईल त्या परिस्थिती तडजोड करून आयुष्याचा प्रवास सुरू ठेवला जातो. पण काहीजण असेही असतात की कितीही खडतर परिस्थिती आली, तरी न डगमगता त्याला तोंड देत नशिबाला झुकवून हवं ते मिळवतात. पुणे जिल्ह्यातील शामल भगत (Shamal Bhagat) ही तरूणी अशाच लढणाऱ्यांपैकी एक. दहावी झाल्यानंतर लग्नासाठी आलेलं स्थळ नाकारत तिने बंडखोरी केली आणि आता ती थेट आयएएस झालीय. नुकतंच यूपीएससीचा निकाल (UPSC Result) लागला असून वयाच्या 24 व्या वर्षी शामल भगत हिने देशात 258 वा क्रमांक पटकावत आयएएस होण्याचं स्वप्न पूर्ण केलं.  

शामल भगत ही तरूणी पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील नीरा नदीच्या काठी वसलेल्या भगतवाडी या गावची. वडील कल्याण भगत हे शेती आणि रंगकाम करण्याचा व्यवसाय करतात. घरची परिस्थिती बेताचीच असल्याने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत चौथीपर्यंतचं शिक्षण घेतलं. 

शाळा ते महाविद्यालयापर्यंत पहिला क्रमांक

त्यानंतर शेजारच्या निरनिमगावात माध्यमिक शिक्षण झालं. लहानपणापासूनच हुशार असलेली शामल दहावीत शाळेत पहिली आली. त्यानंतर बारावीपर्यंतचं शिक्षण सराटी गावातील जिजामाता विद्यालय येथे झालं. तिथेही तिने पहिला नंबर काही सोडला नाही. पुण्यातील महात्मा फुले कृषी महाविद्यालयात बी.एसस्सी अॅग्रीची पदवी पूर्ण केली. त्यावेळी तिने विद्यापीठाचं सुवर्ण पदकही पटकावलं होतं.

विशेष म्हणजे दहावी झाल्यानंतर शामलला तिच्या कुटुंबीयांनी लग्नासाठी स्थळ काढलेलं. पण शामलने त्याला विरोध करत शिक्षण पूर्ण करण्याचा पवित्रा घेतला होता. 

आईचं निधन आणि डोळ्यापुढे काळोख

शिक्षणामध्ये हुशार असलेल्या शामलने पहिल्यापासून कलेक्टर होण्याचं निश्चित केलं होतं. पहिल्या प्रयत्नात तिला पूर्व परीक्षेत यश आलं नाही. मग दुसऱ्यावेळी प्रचंड मेहनत घेतली. पहिल्या वेळी अपयश का आलं याची कारणं शोधून त्यावर काम केलं आणि दुसऱ्या प्रयत्नात मुख्य परीक्षा उत्तीर्ण केली. 

मुलाखतीच्या तारखा समोर असताना शामलच्या आईचं कर्करोगानं निधन झालं. ज्या आईने आपली मुलगी कलेक्टर व्हावी असं स्वप्न पाहिलं होतं, तीच आता अशी अर्ध्यावर सोडून गेल्याने शामलच्या डोळ्यापुढे काळोख निर्माण झाला. पण आलेल्या परिस्थितीला जिद्दीने तोंड देण्याची शामलची लहानपणापासूनची सवय. त्यामुळे शामल या दुःखातूनही सावरली आणि मुलाखतीला गेली. 

कोणताही क्लास न लावता यूपीएससी उत्तीर्ण

अखेर यूपीएससीचा निकाल लागला आणि शामल देशात 258 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली. शामलने आपल्या आईचं स्वप्न पूर्ण केलं, आपल्या गावाचं नाव देशभरात पोहोचवलं. तिच्या या यशात तिच्या कुटुंबीयांचा, भावंडांचा मोठा हातभार आहे. ग्रामीण भागातली मुलगी, कोणताही क्लास न लावता यूपीएससीसारखी परीक्षा यशस्वी झाली. त्यामुळे शामलचं यश हे अधिक झळाळून निघतंय. 

सर्वकाही नशिबावर अवलंबून आहे असं म्हणणाऱ्यांसाठी शामल भगत एक मोठं उदाहरण आहे. आपण ठरवलं तर काहीही करू शकतो, कोणत्याही परिस्थितीवर मात करू शकतो आणि आपलं नशिब बदलवू शकतो हाच संदेश तिने युवक-युवतींना दिला आहे. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Pune Car Accident Rap Song : पैसे मेरे बाप के...दोघांना चिरडल्यानंतर आरोपीचं रॅप साँगPune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅपPune Porsche Car Accident Accused Rap Song :जामीन मिळाल्याचा घमंड,  दोघांना चिरडल्यानंतर आरोपीचा रॅपCM Eknath Shinde Sambhajinagar : चारा, पाणी कमी पडून देणार नाही संभाजीनगरमधून शिंदेंचा शब्द

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बुमराहकडे बर्फाच्या खेळपट्टीवरही भेदक मारा करण्याची क्षमता, ब्रेट लीकडून कौतुकाची थाप
बुमराहकडे बर्फाच्या खेळपट्टीवरही भेदक मारा करण्याची क्षमता, ब्रेट लीकडून कौतुकाची थाप
Laapataa Ladies Animal Movie : किरण रावच्या 'लापता लेडिज'ने संदीप वांगा रेड्डीच्या 'अॅनिमल'ला पछाडले
किरण रावच्या 'लापता लेडिज'ने संदीप वांगा रेड्डीच्या 'अॅनिमल'ला पछाडले
आख्ख्यं गाव उपाशी, दोन दिवसापासून चूल पेटली नाही, उजनी बोट दुर्घटनेनंतर झरे गाव स्तब्ध
आख्ख्यं गाव उपाशी, दोन दिवसापासून चूल पेटली नाही, उजनी बोट दुर्घटनेनंतर झरे गाव स्तब्ध
SDRF बोट दुर्घटनेनंतर स्थानिकांचा आक्रमक पवित्रा, थेट पालकमंत्री विखे पाटलांचा ताफा अडवला
SDRF बोट दुर्घटनेनंतर स्थानिकांचा आक्रमक पवित्रा, थेट पालकमंत्री विखे पाटलांचा ताफा अडवला
Embed widget