एक्स्प्लोर

UPSC च्या मुलाखतीत प्रश्न, 12th Fail मधून काय शिकलास? एका उत्तराने कोल्हापूरचा फरहान IAS झाला!

UPSC Result : अत्यंत बिकट परिस्थितीतून शिकलेल्या कोल्हापूरच्या फरहान जमादारने यूपीएससीतून 191 वा क्रमांक मिळवत यश संपादन केलंय. या यशानंतर त्याच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव केला जातोय. 

कोल्हापूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल (UPSC Result) लागला असून त्यामध्ये राज्यातील 87 उमेदवारांनी बाजी मारली आहे. त्यामुध्ये कोल्हापूरच्या एका उमेदवाराने जगात भारी असं काम करत यशाचा झेंडा रोवला. फरहान जमादार (Farhan Jamadar) असं त्याचं नाव असून तो 191 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. अगदी सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या फरहानचं हे यश इतरांच्या तुलनेत अधिक झळाळून निघणारं आहे. आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मा (Manoj Kumar Sharma IPS) यांच्यापासून प्रेरणा घेतलेल्या फरहानने समोर आलेल्या परिस्थितीवर तितक्याच झपाटून मात केली आणि हे यश मिळवलंय. यूपीएससीच्या मुलाखतीमध्येही फरहान जमादारला 'ट्वेल्थ फेल' (12th Fail) या चित्रपटावर प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर फरहानने  दिलेलं उत्तर हे मुलाखत घेणाऱ्यांना अधिक भावलं असेल. 

सर्वात अवघड समजल्या जाणाऱ्या यूपीएससी परीक्षेतील यश हे सर्वोच्च असं समजलं जातं. त्यासाठी आपल्या आयुष्यातील महत्त्वाची वर्षे खर्ची करण्याचं धाडस लाखो तरूण दाखवतात. त्यासाठी कोचिंग क्लासेस लावावे लागतात, पैसा खर्च करावा लागतो. एवढं करूनही यश पदरात पडेल की नाही याची शाश्वती नसते. मनोज कुमार शर्मा यांच्या आयु्ष्यावर 'ट्वेल्थ फेल' हा चित्रपट आल्यानंतर त्यांची संघर्षयात्रा अनेकांच्या समोर आली. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत कोल्हापुरातील सर्वसामान्य कुटुंबातील फरहान जमादार (Farhan Jamadar Kolhapur) यानेही हे यश खेचून आणलंय. 

बिकट परिस्थितीत शिक्षण पूर्ण केलं 

कोल्हापुरातील कदमवाडी कारंडे मळा या ठिकाणी फरहान जमादारचं कुटुंब राहतंय. घरची परिस्थिती बेताचीच. वडील इरफान जमादार यांचा प्रिटिंगचा व्यवसाय तर आई गृहीणी. कदमवाडीतील सुसंस्कार विद्यालयातून फरहानने प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर कोल्हापूरच्या विवेकानंद महाविद्यालयात 12 पर्यंत शिक्षण घेतलं. पुढे सांगलीच्या वालचंद कॉलेजमधून कम्प्युटर सायन्सची पदवी घेतली. इंजिनिअरिंगचा अभ्यास करत असतानाच आयएएस व्हायचं निश्चित केलं आणि अभ्यासाला सुरूवात केली. 

अभ्यासात सातत्य आणि IAS पदाला गवसणी

घरची परिस्थिती बेताचीच असल्याने फरहानने कोल्हापुरातच राहुन अभ्यास सुरू केला. त्यासाठी सकाळी 7 वाजता फरहान सायकलने अभ्यासिका गाठायचा आणि रात्री 11 पर्यंत बसायचा. सलग दोन वर्षे अभ्यास केल्यांनतर 2022 साली मुख्य परीक्षेमध्ये अपयश आलं. त्यानंतर फरहान खचला नाही. 

फरहानला यूपीएससीच्या अभ्यासाठी स्कॉलरशिप मिळाली आणि तो पुढच्या तयारीसाठी दिल्लीला गेला. यंदाच्या परीक्षेत फरहान देशातून 191 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलाची यूपीएससीतून निवड झाल्यानंतर त्याच्यावर आणि त्याच्या कुटुंबीयांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

मनोज कुमार शर्मा यांच्यावर प्रश्न

मनोज कुमार शर्मा हे कोल्हापूरच्या अधीक्षकपदी असताना त्यांच्या कामाचा बोलबाला झाला होता. सर्वसामान्यांशी संवाद साधणारा लोकांतीलच एक अधिकारी अशी त्यांची ओळख. कोल्हापूरकरांनीही त्यांच्यावर भरभरून प्रेम केलं. मनोज कुमार शर्मा यांच्या संघर्षावर 'ट्वेल्थ फेल' हा चित्रपट आला होता आणि त्याची चर्चाही झाली. 

फरहान जमादार हा यूपीएससीच्या मुलाखतीसाठी गेला असता त्याला याच चित्रपटाविषयी आणि मनोज कुमार शर्मा यांच्याविषयी प्रश्न विचारण्यात आला. फरहान जमादारचं आयएएस व्हायचं ठरलं तेच मनोज कुमार शर्मा यांच्या प्रेरणेमुळे. फरहानला यूपीएससीच्या मुलाखतीमध्ये विचारण्यात आलं, ट्वेल्थ फेल या चित्रपटातून तू काय शिकलास?

मुलाखत घेणाऱ्यांच्या प्रश्नाला फरहान जमादार याने त्यावर तीनच शब्दात उत्तर दिलं. Perseverance, Persistence and Dedication. म्हणजेच सातत्य, चिकाटी आणि समर्पण. 

फरहान जमादारचं अभ्यासातील सातत्य आणि परिस्थितीवर मात करत मिळवलेलं यश हे महत्वाचं आहेच, पण त्यांनी मुलाखतीमध्ये दिलेलं हे उत्तर कदाचित वेगळं ठरणारं आहे. 

ही बातमी वाचा: 

अभिजीत विलासराव जाधव हे 'एबीपी माझा' डिजिटलमध्ये असोसिएट प्रोड्युसर असून त्यांना पत्रकारितेचा साडेसहा वर्षांहून अधिकचा अनुभव आहे. कुटुंब मूळचे सीमाभागातील निपाणी तालुक्यातील, पण सामाजिक क्रांतीचे जनक असलेल्या शाहू महाराजांच्या कोल्हापुरात जन्म आणि शिक्षण. अभिजीत यांनी शिवाजी विद्यापीठातून पत्रकारितेची पदव्युत्तर पदवी घेतली आहे.

राज्यशास्त्र, इतिहास आणि यूपीएससी अभ्यासाच्या पार्श्वभूमीमुळे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडींवर त्यांचे सखोल विश्लेषण असते. शेतकरी कुटुंबातून असल्याने शेती, ग्रामीण प्रश्न आणि संस्कृतीची त्यांना जाण आहे. अचूकता आणि वेगाचा मेळ घालत ब्रेकिंग न्यूज, राजकीय आणि सामाजिक विषयांवर विशेष लेखन करण्यात त्यांचा हातखंडा आहे.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Gokul milk Rate : म्हैस दूध 6 रुपये, तर गाय दूध 4 रुपयांनी महागले; गोकुळच्या दरवाढीचा निर्णय 21 तारखेपासून लागू, नव्या अध्यक्षांनी सांगितलं कारणं, नेमकं काय म्हणाले?
म्हैस दूध 6 रुपये, तर गाय दूध 4 रुपयांनी महागले; गोकुळच्या दरवाढीचा निर्णय 21 तारखेपासून लागू, नव्या अध्यक्षांनी सांगितलं कारणं, नेमकं काय म्हणाले?
गृहलक्ष्मी योजनेच्या पैशासाठी आजीला संपवलं; 20 वर्षीय नातवाला अटक, लेकाला पाठीशी घालणाऱ्या वडिलांनाही बेड्या
गृहलक्ष्मी योजनेच्या पैशासाठी आजीला संपवलं; 20 वर्षीय नातवाला अटक, लेकाला पाठीशी घालणाऱ्या वडिलांनाही बेड्या
मोठी बातमी ! महायुतीची सत्ता येताच इतिहासातील सर्वात मोठी दूध दरवाढ; गोकुळचं दूध 6 रुपयांनी महागलं
मोठी बातमी ! महायुतीची सत्ता येताच इतिहासातील सर्वात मोठी दूध दरवाढ; गोकुळचं दूध 6 रुपयांनी महागलं
Kolhapur Gokul Milk: गोकुळची निवडणूक संपली, आता समविचारी आघाडी Vs महायुतीमध्ये नवा संघर्ष, दूध दरवाढीला विरोध, समोर आलं कारण
गोकुळची निवडणूक संपली, आता समविचारी आघाडी Vs महायुतीमध्ये नवा संघर्ष, दूध दरवाढीला विरोध, समोर आलं कारण

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde stops Prabhadevi demolition: मोठी बातमी : एकनाथ शिंदेंचा थेट रेल्वेमंत्र्यांना फोन, प्रभादेवीत तोडकामासाठी गेलेले JCB माघारी फिरले, पुनर्वसनाशिवाय हातोडा चालणार नाही!
एकनाथ शिंदेंचा थेट रेल्वेमंत्र्यांना फोन, प्रभादेवीत तोडकामासाठी गेलेले JCB माघारी फिरले, पुनर्वसनाशिवाय हातोडा चालणार नाही!
Bhandara : भंडारा बाजार समितीत मित्रपक्षांचाच भाजपला 'दे धक्का' काँग्रेसच्या साथीनं शिंदे सेनेचा सभापतीपदावर कब्जा; महायुतीतील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर?
भंडारा बाजार समितीत मित्रपक्षांचाच भाजपला 'दे धक्का' काँग्रेसच्या साथीनं शिंदे सेनेचा सभापतीपदावर कब्जा; महायुतीतील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर?
Yash Patil : वय 23 वर्षे अन् AI कंपनीची किंमत 42 हजार कोटी! कोण आहेत यश पाटील? एआय स्टार्टअपचा अमेरिकेत वाजवला डंका, सतेज पाटलांकडूनही कौतुक
वय 23 वर्षे अन् AI कंपनीची किंमत 42 हजार कोटी! कोण आहेत यश पाटील? एआय स्टार्टअपचा अमेरिकेत वाजवला डंका, सतेज पाटलांकडूनही कौतुक
Gold Silver Rate Today: सोने, चांदीचे दर कोसळले, 14 महिन्यांतील सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचल्या किमती, सोने सहा हजारांनी तर चांदी 12000 हजार रुपयांनी घसरली, जाणून घ्या आजचे दर
सोने, चांदीचे दर कोसळले, 14 महिन्यांतील सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचल्या किमती, सोने सहा हजारांनी तर चांदी 12000 हजार रुपयांनी घसरली, जाणून घ्या आजचे दर
Nashik Crime News: 11 वर्षांचा संसार; बिहारमधून नाशिकमध्ये वास्तव्यास आले, रिक्षा चालक आकाशचा पत्नीवर संशय, मोबाईलवरून वाद अन् ओढणीनंच गळा आवळला अन्...
11 वर्षांचा संसार; बिहारमधून नाशिकमध्ये वास्तव्यास आले, रिक्षा चालक आकाशचा पत्नीवर संशय, मोबाईलवरून वाद अन् ओढणीनंच गळा आवळला अन्...
Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचे संकेत; 'अकवान' चक्रीवादळामुळे 8 राज्यांत पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अलर्ट जारी
महाराष्ट्रात पुन्हा पावसाचे संकेत; 'अकवान' चक्रीवादळामुळे 8 राज्यांत पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अलर्ट जारी
Sujay Vikhe Patil : 6 महिन्यांत CBI वर विश्वास कसा वाढला? विखे पाटलांचा रोहित पवारांना टोला; म्हणाले, प्रश्न विचारायचा अधिकार फक्त शरद पवार, सुनेत्राताई अन् 'या' दोघांना, फडणवीसांचीही केली पाठराखण
6 महिन्यांत CBI वर विश्वास कसा वाढला? विखे पाटलांचा रोहित पवारांना टोला; म्हणाले, प्रश्न विचारायचा अधिकार फक्त शरद पवार, सुनेत्राताई अन् 'या' दोघांना, फडणवीसांचीही केली पाठराखण
TMC Standing Committee: एकनाथ शिंदेंचे धक्कातंत्र, सगळ्यांचेच अंदाज चुकवले; ठाणे महापालिकेतील स्थायी समितीची सभासदांची नावे जाहीर, कोणाकोणाला संधी?
एकनाथ शिंदेंचे धक्कातंत्र, सगळ्यांचेच अंदाज चुकवले; ठाणे महापालिकेतील स्थायी समितीची सभासदांची नावे जाहीर, कोणाकोणाला संधी?
Embed widget