एक्स्प्लोर
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची जागा निश्चित, 12-16 डिसेंबर दरम्यान आयोजन
भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी सुरू केलेला हा अभिाजात संगीताचा कार्यक्रम जागतिक पातळीवर वाखाणला गेला आणि रसिकांनी व हितचिंतकांनीही हा महोत्सव आपलाच असल्याचे अनेकदा जाहीरपणे सांगितले.
![सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची जागा निश्चित, 12-16 डिसेंबर दरम्यान आयोजन Sawai Gandharv Bhimsen Mahotsav to held during 12 to 16 December Latest Updates सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची जागा निश्चित, 12-16 डिसेंबर दरम्यान आयोजन](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/10/08192153/sawai-gandharv.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित करण्यात येणारा ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ यंदा 12 ते 16 डिसेंबर या काळात मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात येणार आहे. मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी ही माहिती दिली.
गेली 32 वर्षे हा महोत्सव डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग येथे होत असे. यंदा सोसायटीने शाळेची जागा महोत्सवासाठी देता येणार नाही, असे लेखी पत्र दिल्यामुळे जागेतील हा बदल करण्यात येत आहे. यासंबंधीचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक रसिक, संस्थाचालक आणि हितचिंतक यांनी संस्थेशी संपर्क साधून याबाबत काय करता येईल, याबद्दल विचारणा केली. या सगळ्यांच्या भावनांचा आर्य संगीत प्रसारक मंडळ मनापासून स्वीकार करीत असल्याचे जोशी यांनी म्हटले आहे.
पुण्यातील अनेक शिक्षणसंस्था महोत्सवास मनापासून आणि विनाअट मदत करण्यास तयार असल्याचेही चित्र यामुळे समोर आले. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी सुरू केलेला हा अभिाजात संगीताचा कार्यक्रम जागतिक पातळीवर वाखाणला गेला आणि रसिकांनी व हितचिंतकांनीही हा महोत्सव आपलाच असल्याचे अनेकदा जाहीरपणे सांगितले. जागाबदलाच्या निमित्ताने या सगळ्या भावनांची उजळणी झाली, असेही जोशी यांनी नमूद केले.
महाराष्ट्रीय मंडळाशी भीमसेनजींचा दीर्घकाळ अतिशय निकटचा संबंध होता. मंडळाच्या विविध उपक्रमांत ते सहभागीही होत असत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रीय मंडळाचे सरचिटणीस धनंजय दामले यांनी आर्य संगीत प्रसारक मंडळास मुकुंदनगर येथील क्रीडा संकुलातील मैदान या महोत्सवासाठी देण्याचे अगत्याने मान्य केले, याबद्दल जोशी यांनी आभार व्यक्त केले आहेत.
हा महोत्सव दरवर्षीप्रमाणेच दिमाखात आणि अभिजात संगीतातील अनेक नव्या जाणिवांसह यंदाही साजरा होईल आणि त्यासाठी गेली 65 वर्षे रसिक, हितचिंतक आणि प्रायोजक यांच्याकडून जे सहकार्य मिळत आले, तसेच यापुढेही मिळेल, असा विश्वास श्रीनिवास जोशी यांनी व्यक्त केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
मुंबई
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)