भाजप समोर 'झुकेगा नही साला', मला अटक करा ते थेट अमित शहांना फोन... संजय राऊतांची UNCUT मुलाखत
Sanjay raut Interview in Pune: आम्ही भाजपसमोर झुकणार नाही, ये संजय राऊत झुकेगा नही साला म्हणत, संजय राऊतांना भाजपला टोला.
Sanjay Raut Uncut Interview: पुष्पाची स्टाईल करत भाजप समोर झुकणार नाही, ईडीच्या कारवाया, सध्याचे राजकारण अशा विविध विषयांवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी तुफान फटकेबाजी केली. शरद पवार तेच आहेत त्यांच्यात कोणताही बदल झालेला नाही. आम्ही तरुण असताना ज्या शरद पवारांच्या प्रेमात पडलो तेच शरद पवार आज आहेत यासह राजकीय विषयावर त्यांनी भाष्य़ केलं.
प्रश्न: भाजपसोबत गेला असतात तर मुख्यमंत्रीपदाची अडीच वर्ष संपली असती. आत्ता तुमची मुख्यमंत्रीपदाची अडीच वर्षे संपलीयत..आता कसं वाटतंय...?
उत्तर: आम्ही भाजपला फसवून सत्तेत आलो नाही. भाजपच्या वृत्तीचा मी अभ्यास केला. त्यांनी शब्द पाळला नाही. महाविकास आघाडीचा हा प्रयोग देशात यशस्वी होईल.
प्रश्न: ईडी च्या धाडी फक्त भाजप विरोधकांवरच का पडतात?
उत्तर: 2024 नंतरत्यांना कळेल. वक्त हमारा भी आएगा.तर याचा त्रास होतो म्हटलं तर नाही. पुष्पा मधला डायलॉग आहे मै झुकेगा नही. कोणतीही नोटीस न देता ईडी चौकशी केली. मात्र ज्यावेळी माझ्या कुटुंबीयांवर आलं त्यावेळी मी अमित शहांना फोन केला आणि म्हटलं त्या गरिबांना त्रास देऊ नका त्यापेक्षा मला अटक करा.
प्रश्न:सत्तेत असलेले शरद पवार आणि त्या आधीचे शरद पवार यांच्यात कोणता फरक जाणवतो?
उत्तर: शरद पवार तेच आहेत त्यांच्यात कोणताही बदल झालेला नाही. आम्ही तरुण असताना ज्या शरद पवारांच्या प्रेमात पडलो तेच शरद पवार आज आहेत. तेच बाळासाहेब ठाकरे मी शेवटपर्यंत पाहिले. पवारांच्या वयाचा उल्लेख केलात त्यावर एकच सांगतो की बाळासाहेब ठाकरेसुद्धा शेवटपर्यंत तरुणांचे नेते होते.