एक्स्प्लोर

Rohit Pawar Yuva Sangharsha Yatra : छत्रपती संभाजी महाराजांचे समाधी स्थळापासून रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेला सुरुवात; रोजचं नियोजन कसं असेल?

Yuva Sangharsh Yatra : युवा वर्गाच्या विविध प्रश्नांसाठी कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रा सुरू केली आहे.

पुणे युवा वर्गाच्या विविध प्रश्नांसाठी कर्जत जामखेडचे (Karjat-Jamkhed) राष्ट्रवादीचे (NCP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी युवा संघर्ष यात्रा (Yuva Sangharsha Yatra) सुरू केली आहे. यात्रेची सुरुवात छत्रपती संभाजी महाराजांचे समाधी स्थळ (Chatrapati Sambhaji Maharaj Samadhi Sthal) असलेल्या श्री क्षेत्र तुळापूर येथून करण्यात आली. आज पहाटे साडेपाच वाजता संगमेश्वराच्या महादेवाला अभिषेक घालून साकडे घालून रोहित पवार (Rohit Pawar Yatra) यांनी या यात्रेला सुरुवात केली. यावेळी आमदार अशोक पवार (Ashok Pawar), रोहित पाटील (Rohit Patil), देवदत्त निकम (Devdatta Nikam) यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा

ही यात्रा तुळापूर मार्गे फुलगाववरून वढू बंधाऱ्यावरून पुढे आली. दरम्यान, पदयात्रेच्या मार्गावरील सैनिकी शाळेतील शंभर मुलांनी रोहित पवार यांचे चित्र काढून रोहित पवार यांच्या युवा यात्रेला युवा संघर्ष यात्रेला पाठिंबा दिला. या मुलांनी काढलेल्या चित्राने रोहित पवारही भारावले. दरम्यान युवा संघर्ष यात्रेचा हा शिरूर हवेली तालुक्यातील पहिला प्रवासाचा टप्पा आहे. आज यात्रेचा पहिला दिवस आहे. दररोज 17 ते 22 किलोमीटर अंतर ही पदयात्रा कापणार आहे. 45 दिवस ही पदयात्रा असून, ही यात्रा नागपूर येथे विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान पोहोचणार आहे.

यात्रेचं नियोजन कसं असेल?

आमदार रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा ही 800 किलोमीटरची असणार आहे. त्यात रोज दिवसाला 17 ते 18 किलोमीटरचा प्रवास असेल. पहिला टप्पा 11 किलोमीटरचा असेल. हा टप्पा पूर्ण झाला की, कोरोगावला थांबा असेल. त्यानंतर संध्याकाळी शेवटचा सात किलोमीटरचा टप्पा पार करणार आहेत. प्रत्येक दिवसाची यात्रा ही दोन टप्प्यात असणार आहे. एकूण 45 दिवसांचा प्रवास असून पुण्यातील तुळापूर येथून या यात्रेला सुरुवात होऊन काष्टी, कर्जत, पाटोदा, बीड, जातेगाव, पिंपळगाव, कुंभार, परतुर, जिंतूर, सेनगाव, वनोजा, वाशिम, कारंजा, पापळ, पुलगाव, सेवाग्राम, बाजार गाव, नागपूर येथे या युवा संघर्ष यात्रेचा समारोप 7 डिसेंबर रोजी होणार आहे.

प्रत्येक गावातील प्रश्न कळणार

रोहित पवार म्हणाले की, 'या यात्रेदरम्यान अनेक गावांमध्ये थांबा असणार आहे. त्यामुळे प्रत्येक गावातील प्रश्न आणि नागरिकांच्या समस्यादेखील यातून पुढे येणार आहे. त्यामुळे त्यावरदेखील भविष्यात काम करण्याचं नियोजन करणार आहे. सगळ्या महाराष्ट्रात अनेक गावं आहेत आणि या प्रत्येक गावातील नागरिकांच्या वेगळ्या समस्या आहे. त्या समस्या जाणून घेणारं कोणी नाही. त्यांच्यासाठी मी असणार आहे. त्याचे प्रश्न जाणून घेणार आहे. '

महत्वाच्या इतर बातम्या -

Rohit Pawar : तरुणांच्या प्रश्नासाठी रोहित पवार सरसावले; युवा संघर्ष यात्रेला सुरुवात; प्रमुख मागण्या कोणत्या?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : 5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
CIDCO डोमेसाईल अट रद्द करण्याच्या विचारात, शिरसाटांची भावना चांगली, पण फटका मराठी माणसालाच!
CIDCO डोमेसाईल अट रद्द करण्याच्या विचारात, शिरसाटांची भावना चांगली, पण फटका मराठी माणसालाच!
चार मुलांना जन्म दिल्यास एक लाखाचे बक्षीस, इंदूरमध्ये परशुराम कल्याण बोर्डची घोषणा; वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा 
चार मुलांना जन्म दिल्यास एक लाखाचे बक्षीस, इंदूरमध्ये परशुराम कल्याण बोर्डाची घोषणा; वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा 
सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळणार? फडणवीसांचा केंद्रीय कृषीमंत्र्यांना फोन, सोयाबीन खरेदीची मुदत वाढवण्याची मागणी
सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळणार? फडणवीसांचा केंद्रीय कृषीमंत्र्यांना फोन, सोयाबीन खरेदीची मुदत वाढवण्याची मागणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

100 Headlines |  महाराष्ट्र सुपरफास्ट शंभर बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP majhaABP Majha Marathi News Headlines 430PM TOP Headlines 430PM 13 January 2025Santosh Deshmukh Wife Reaction | एक महिन्याआधी धमकी आली होती, संतोष देशमुखांच्या पत्नीचा खुलासाPriyanka Ingale : महाराष्ट्राची प्रियंका, Kho Kho World Cup 2025 गाजवणार, भारताचं नेतृत्त्व करणार!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : 5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
CIDCO डोमेसाईल अट रद्द करण्याच्या विचारात, शिरसाटांची भावना चांगली, पण फटका मराठी माणसालाच!
CIDCO डोमेसाईल अट रद्द करण्याच्या विचारात, शिरसाटांची भावना चांगली, पण फटका मराठी माणसालाच!
चार मुलांना जन्म दिल्यास एक लाखाचे बक्षीस, इंदूरमध्ये परशुराम कल्याण बोर्डची घोषणा; वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा 
चार मुलांना जन्म दिल्यास एक लाखाचे बक्षीस, इंदूरमध्ये परशुराम कल्याण बोर्डाची घोषणा; वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा 
सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळणार? फडणवीसांचा केंद्रीय कृषीमंत्र्यांना फोन, सोयाबीन खरेदीची मुदत वाढवण्याची मागणी
सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळणार? फडणवीसांचा केंद्रीय कृषीमंत्र्यांना फोन, सोयाबीन खरेदीची मुदत वाढवण्याची मागणी
कुणालाही दयामाया दाखवू नका, एकही आरोपी सुटता कामा नये; मुख्यमंत्र्यांचा बीड SP, CID अधिकाऱ्यांना फोन
कुणालाही दयामाया दाखवू नका, एकही आरोपी सुटता कामा नये; मुख्यमंत्र्यांचा बीड SP, CID अधिकाऱ्यांना फोन
Santosh Deshmukh Case : तसं तुम्ही पुढे येऊन सांगा, वाल्मिक कराड खुनात सहभागी नाही; आव्हाडांनी सगळंच काढलं, खळबळजनक आरोप
तसं तुम्ही पुढे येऊन सांगा, वाल्मिक कराड खुनात सहभागी नाही; आव्हाडांनी सगळंच काढलं, खळबळजनक आरोप
धक्कादायक! 5 वर्षात 834 बेस्टच्या अपघातात 88 नागरिक मृत्युमुखी; अपघातग्रस्तांना 42. 40 कोटींची आर्थिक नुकसानभरपाई
धक्कादायक! 5 वर्षात 834 बेस्टच्या अपघातात 88 नागरिक मृत्युमुखी; अपघातग्रस्तांना 42. 40 कोटींची आर्थिक नुकसानभरपाई
Gold Reserves city of Attock : मराठ्यांनी जिथं अटकेपार झेंडा फडकवला तिथंच पाकिस्तानला सोन्याची खाण सापडली!
मराठ्यांनी जिथं अटकेपार झेंडा फडकवला तिथंच पाकिस्तानला सोन्याची खाण सापडली!
Embed widget