एक्स्प्लोर

महिला, अल्पवयीन मुलीवरील अत्याचारांनी महाराष्ट्र हादरला! महिला आयोगाच्या रुपाली चाकणकरांची हकालपट्टी करा; पुण्यातील महिला आक्रमक

Rupali Chakankar : राज्यातील महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या आणि बाललैंगिक अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत निषेधार्ह आणि बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून रूपाली चाकणकर यांची हकालपट्टी करावी अशी मागणी केली जात आहे.

पुणे: राज्यात महिला आणि अल्पवयीन मुलीवर होणाऱ्या अत्याचारामध्ये (Crime News) मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचं चित्र दिसून येत आहे. यादरम्यान राज्यातील महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या आणि बाललैंगिक अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत निषेधार्ह आणि बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून रूपाली चाकणकर(Rupali Chakankar) यांची हकालपट्टी करावी अशी मागणी केली जात आहे. पुणे शहरातील कार्यरत असलेल्या महिला संघटनांच्या प्रतिनिधींकडून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे लेखी निवेदनाद्वारे चाकणकर (Rupali Chakankar) यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. शिष्टमंडळाकडून हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना देण्यात आले आहे.

बदलापूर, लातूर, पुणे, मुंबई, दौंड, छत्रपती संभाजीनगर, अकोला आदी शहरांमध्ये झालेल्या महिला आणि बाललैंगिक अत्याचाराच्या घटनांच्या अनुषंगाने अत्यंत संताप व्यक्त केला जात आहे. अशा वेळी पीडित कुटुंबीयांना आधार देत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर (Rupali Chakankar) यांनी मात्र पीडित कुटुंबियांनीच मुलींकडे लक्ष द्यावे, अशी वक्तव्य केलेली आहेत. ही बाब अत्यंत धक्कादायक आणि निंदाजनक असल्याने चाकणकर यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

राज्याच्या मुख्य सचिवपदी, तसेच राज्याच्या पोलीस महासंचालक पदावर महिला अधिकारी कार्यरत असताना या घटनांकडे प्रशासकीय अधिकारी दुर्लक्ष करत आहेत हे अशोभनीय आहे. मुख्य सचिव आणि महासंचालकांनी राज्यातील महिला अत्याचाराच्या प्रश्नावर ठोस भूमिका घेत, याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबन आणि गुन्हे दाखल करण्याची कारवाई करावी, याबाबतची श्वेतपत्रिका तात्काळ जाहीर करावी, अशीही मागणी या वेळी करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये अत्याचारांच्या घटना

बदलापूर - शाळेतील 2 चिमुकल्यांवर अत्याचार - 13 ऑगस्ट
पुण्यातील नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न -20 ऑगस्ट
अकोला - शिक्षकाकडून ६ मुलींचा विनयभंग - 20 ऑगस्टला उघड
ठाणे - गतिमंद मुलीवर अत्याचार - 20 ऑगस्ट
नाशिक - साडेचार वर्षांच्या मुलीचं अपहरण करून अत्याचार - २१ ऑगस्ट
लातूर - साडेचार वर्षाच्या मुलीवर लैंगिक छेडछाडची लातूरतील घटना उघड - 20 ऑगस्ट
कोल्हापूर - दहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या -22 ऑगस्ट
मुंबई- अपंग अल्पवयीन मुलीवर अत्याचार -22 ऑगस्ट
मुंबई- खारमध्ये दोन अल्पवयीन मुलींचा शेजार्‍याकडून विनयभंग -22 ऑगस्ट
नागपूर-कामठी भागात आठ वर्षीय मुलीवर शेजाऱ्यानेच केला अत्याचार - 22 ऑगस्ट 
पुणे - अल्पवयीन तरुणीवर मैत्रिणीच्या मदतीने २ मित्रांनी केला अत्याचार - 21 ऑगस्ट
मुंबई- चांदिवलीमध्ये ३ वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार - 20 ऑगस्ट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Congress on Worship Act : प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव
प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव
Nagpur Crime News : नागपुरातील 'त्या' विकृत मानसोपचार तज्ञाचा आणखी एक काळा कारनामा समोर, चौथा गुन्हा दाखल
नागपुरातील 'त्या' विकृत मानसोपचार तज्ञाचा आणखी एक काळा कारनामा समोर, चौथा गुन्हा दाखल
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी, किती जणांचा पगार अन् पेन्शन वाढणार? अंमलबजावणी कधीपासून?
केंद्र सरकारची आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी, किती जणांचा पगार अन् पेन्शन वाढणार?
Saif Ali Khan Attacker First Footage: हाच 'तो', यानंच सैफ अली खानला भोसकलं; सैफिनाच्या घरात घुसून हल्ला करणाऱ्याचा VIDEO समोर!
हाच 'तो', यानंच सैफ अली खानला भोसकलं; सैफिनाच्या घरात घुसून हल्ला करणाऱ्याचा VIDEO समोर!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 17 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्सKolhapur Crime CCTV : कोल्हापुरात मद्यधुंद तरुणांची दहशत, चालत्या बसवर फेकला मोठा दगडNigerian Arrested: टीप मिळताच पोलिसांनी सापळा रचला, MD ड्रग्जसह नायजेरियनला अटकABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 17 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress on Worship Act : प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव
प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव
Nagpur Crime News : नागपुरातील 'त्या' विकृत मानसोपचार तज्ञाचा आणखी एक काळा कारनामा समोर, चौथा गुन्हा दाखल
नागपुरातील 'त्या' विकृत मानसोपचार तज्ञाचा आणखी एक काळा कारनामा समोर, चौथा गुन्हा दाखल
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी, किती जणांचा पगार अन् पेन्शन वाढणार? अंमलबजावणी कधीपासून?
केंद्र सरकारची आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी, किती जणांचा पगार अन् पेन्शन वाढणार?
Saif Ali Khan Attacker First Footage: हाच 'तो', यानंच सैफ अली खानला भोसकलं; सैफिनाच्या घरात घुसून हल्ला करणाऱ्याचा VIDEO समोर!
हाच 'तो', यानंच सैफ अली खानला भोसकलं; सैफिनाच्या घरात घुसून हल्ला करणाऱ्याचा VIDEO समोर!
RIL Profit : रिलायन्सनं अर्थविषयक संस्थांचे अंदाज चुकवले, तिसऱ्या तिमाहीत नफा 18540 कोटींवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी 
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नफ्यात मोठी वाढ, नफा 18540 कोटींवर, शेअरमध्ये जोरदार तेजी 
Saif Ali Khan Stabbing Incident:
"आपको क्या चाहीये?... 1 करोड... जेहच्या रुममध्ये घुसून त्यानं पैसे मागितले"; सैफवर हल्ला झाला 'त्या' रात्री काय-काय घडलं?
Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
Embed widget