एक्स्प्लोर

Ravindra Dhangekar: 'मुरलीधर मोहोळांनी गोखलेंसोबत जैन हॉस्टेलमध्ये भगवान महावीरांचं दर्शन घेतलं अन्...'; रवींद्र धंगेकरांचा नवा आरोप

Ravindra Dhangekar: पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन विक्रीच्या व्यवहाराशी माझा कोणताही संबंध नाही, असं मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं त्यावरती पुन्हा धंगेकरांनी भाष्य केलं आहे.

Pune Jain Boarding house & Murlidhar Mohol: पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन विक्रीच्या व्यवहाराशी माझा कोणताही संबंध नाही. ज्या गोखले बिल्डर्सशी माझी भागीदारी असल्याचा आरोप होत आहे, त्यांच्या दोन्ही कंपन्यांमधून मी वर्षभरापूर्वीच बाहेर पडलो होतो. त्यामुळे जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन व्यवहाराशी (Jain Boarding house land) माझा कोणताही संबंध नाही, असे स्पष्टीकरण भाजप खासदार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी दिले. एका गोष्टीचं वाईट वाटतं की, एका चुकीच्या बातमीने राजकीय कार्यकर्त्याचे मनोबल खच्ची होऊ शकते किंवा एखाद्याचं करिअर उद्ध्वस्त होऊ शकते, असे मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले. ते रविवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्यावर जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन विक्रीसंबंधी झालेल्या आरोपांवर सविस्तरपणे स्पष्टीकरण दिले. (Pune news) त्यावरती पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी भाष्य केलं आहे.

Ravindra Dhangekar: विशाल गोखले आणि मुरलीधर मोहोळ आधी हॉस्टेलमध्ये गेले होते

रवींद्र धंगेकर यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं की, मी त्या मोर्चामध्ये सहभागी झालो होतो. सगळे व्यवहार संशयास्पद आहे. सगळ्या व्यवहारात काळं आहे. मुरलीधर मोहोळ यांना राग येणं साहजिक आहे. केविलवाणी त्यांची प्रेस होती त्यात दम नव्हता. ते हतबल होते. कारण ते चुकीच वागले. २०२३ मध्ये ही सगळी सुरुवात झाली होती. ही प्रॉपर्टीचे २३० कोटी येणार असल्याची त्यावेळी संचालकांनी सांगितलं होतं, १९५८ साली ही प्रॉपर्टी जैन मुलांसाठी घेतली होती आणि ही संस्था सुरू झाली. जागा विक्री करणे असं नियमावलीमध्ये नव्हतं. महावीर जयंतीला विशाल गोखले आणि मुरलीधर मोहोळ आधी हॉस्टेलमध्ये गेले होते. महावीर भगवान यांच्या दर्शनाला गेल्यानंतर ही जागा त्यांना दिसली, देव राहिला बाजुला देवासहित जमीन कशी हडपता येईल असं त्यांच्या डोक्यात आलं, तेव्हापासून हा सगळा प्रकार समोर आला.

Ravindra Dhangekar: कधी आणि कुठं राजीनामा दिला?

या कंपनीमध्ये मोहोळ होते. राजीनामा दिला असं म्हणत आहेत, कधी आणि कुठं राजीनामा दिला. अजूनही ते त्या कंपनीमध्ये आहेत. विषय अंगावर येईल म्हणून पलटी खात आहेत. टेंडर प्रक्रिया मोहोळ यांना नवीन नाही. महापालिकेत त्यांनी तेच केलं आहे. बडेकर आणि गोखले यांनी व्यवस्थित ही जागा हडपली आहे. एकूण ३ कंपन्या यात होत्या. सगळे फॉर्म समोर आहेत. हे टेंडर मॅनेज होतं, हा सगळा व्यवहार गोलमेल करून केला आहे. बडेकर कंपनीमध्ये मोहोळ अजून आहेत. सगळ्यांची दिशाभूल यात केली आहे, हे मोहोळ यांचं पाप आहे. जमीन खाण्याचं काम यांनी केलं आहे. पुणेकर म्हणून मी बाजू मांडत आहे, असंही पुढे धंगेकर म्हणालेत. 

Ravindra Dhangekar: या प्रकरणी मुरलीधर मोहोळ यांचा हात

मोदींनी मोहोळ यांची चौकशी करावी, याची ED मार्फत चौकशी करावी. मित्राला पाठीशी घालायचं काम मोहोळ यांनी केलं. जर चुकीच असेल तर गोखले आणि बडेकर यांना शिक्षा द्यावी असं त्यांनी म्हणायला हवं होतं. बडेकरमध्ये आजही ते आहेत. यात सगळे कोथरूडचे बिल्डरच कसे आले. मी भाजपवर बोलत नाही पण जे चुकलं ते चुकलं. यांची सगळ्यांची पार्टनरशिप आहे. धर्मदाय आयुक्तांनी काय केलं हे पहावं लागेल हा विषय त्यांच्यासमोर जायला हवा होता. तो गेला की नाही पाहावं लागेल. या प्रकरणी मुरलीधर मोहोळ यांचा हात आहे, जैन समाजाची जागा परत द्यावी, चौकशी करावी चुकीच्या पद्धतीने हा व्यवहार झाला आहे, याची चौकशी यंत्रणेने करावी, तुम्ही आता मंदिरा देखील खायला लागले आहेत, मी देवेंद्र फडणवीस, अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती करणार आहे की याची चौकशी करावी. मी भाजपवर एकही शब्दाने बोलत नाही इथं युती धर्माचा विषय येत नाही, असंही पुढे धंगेकरांनी म्हटलं आहे. 

Ravindra Dhangekar: समीर पाटील प्रकरणावर धंगेकर म्हणाले...

रवींद्र धंगेकर यांनी सातत्याने आपल्यावर केलेल्या आरोपांविरोधात समीर पाटील यांनी थेट न्यायालयात धाव घेतली आहे. समीर पाटील यांनी रवींद्र धंगेकरांविरोधात क्रिमिनल केस आणि दिवाणी दावा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.  समीर पाटील यांनी रवींद्र धंगेकर यांना 50 कोटी रुपयांची कायदेशीर नोटीस पाठवली होती, पण आता प्रकरण थेट न्यायालयात पोहोचले आहे. त्यावर बोलताना धंगेकर म्हणाले, याला उत्तर माझे वकील देतील. दोन दिवसांत उत्तर देवू. मी न्यायालयीन नोटीस देईल. वकिलांमार्फत उत्तर देईल.

Muralidhar Mohol मुरलीधर मोहोळ यांचं स्पष्टीकरण

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन विक्रीच्या व्यवहाराशी माझा कोणताही संबंध नाही. ज्या गोखले बिल्डर्सशी माझी भागीदारी असल्याचा आरोप होत आहे, त्यांच्या दोन्ही कंपन्यांमधून मी वर्षभरापूर्वीच बाहेर पडलो होतो. त्यामुळे जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन व्यवहाराशी (Jain Boarding house land) माझा कोणताही संबंध नाही, असे स्पष्टीकरण भाजप खासदार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी दिले. 

मी गेले चार-पाच दिवस पुण्याबाहेर होते. मी आता केवळ मला निवडून दिलेल्या पुणेकरांच्या मनात कोणतीही शंका उत्पन्न होऊ नये, यासाठी बोलत आहे. राजू शेट्टी यांनी माझ्यावर जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन विक्रीच्या व्यवहाराबाबत आरोप केले. राजू शेट्टी हे पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी नेते आहेत. मला त्यांच्याबद्दल आदर आहे. एरवी ते दिल्लीत माझ्याकडे कामासाठी येतात. त्यांनी माझ्यावर इतका मोठा आरोप करताना मला विचारायला हवे होते. मी त्यांना सत्य परिस्थिती समजावून सांगितली असती. मात्र, राजू शेट्टींचा मी आदर करतो. त्यांना जी माहिती देण्यात आली त्याआधारे त्यांनी माझ्यावर आरोप केले, असे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report
NCP Alliance : मित्रांनी ठेवलं दूर, काकांशी एकीचा सूर; कुणाला डोकेदुखी? Special Report
Thackeray Brother Alliance : बिगुल वाजलं तरी ठाकरे बंधूंच्या युतीचं नाही ठरलं? Special Report
Chandrapur Farmer :कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी? शेतकऱ्याचा धक्कादायक दावा Special Report
Navneet Rana : पक्ष की पती? नवनीत राणांची कुणाशी सहमती? भाजप राणांना झापणार की जपणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi : मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
Prithviraj Chavan VIDEO: राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
Embed widget