एक्स्प्लोर

Ravindra Dhangekar : रवींद्र धंगेकर शिंदे गटात जाताच काँग्रेस नेत्याने खदखद बोलून दाखवली, म्हणाले, टेंडरमध्ये प्रॉब्लेम आल्याने...

Arvind Shinde on Ravindra Dhangekar : वक्फ बोर्डच्या जागेचा वाद होता. वक्फ बोर्डचा विषय होता, त्यात त्यांच्यावर कारवाई होणार होती म्हणून पक्ष सोडला, असंही अरविंद शिंदे यांनी म्हटलं आहे.

पुणे: पुण्यात काँग्रेस पक्षाला शिवसेना शिंदे गटाने खिंडार पाडलं आहे. काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पक्षाची साथ सोडत काल शिवसेनेत पक्षप्रवेश केला. त्यानंतर आता काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी धंगेकरांबाबतची खदखद बोलून दाखवली आहे. अरविंद शिंदे धंगेकरांच्या पक्षप्रवेशावर बोलताना म्हणाले, ज्याची विचारधारा शुन्य त्यावर बोलणार नाही. पक्ष कुठच कमी पडला नाही. पक्षाने त्यांना चारवेळा संधी दिली तरी पक्षाला सोडून गेले. मी निवडणूक लढताना त्यांनी विरोध केला होता. पक्षाने 3 वर्षात निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून 4 वेळा संधी दिली. ज्यादिवशी ते आमदार झाले त्यानंतर कधीच पक्षाचा झेंडा हातात घेतला नाही. खालच्या थराला जाऊन राजकारण करणाऱ्या लोकांविषयी बोलणार नाही. त्यांच्या व्यक्तीगत दुष्कारणांसाठी गेले. काँग्रेस पक्षाने मान दिला, पक्षाच्या कुठल्याच आंदोलनाला ते आले नाही. आता यांना मतदारांनी नाकारलं आहे. त्यांना लीड घेता आलं नाही,असंही अरविंद शिंदे यांनी म्हटलं आहे.

पक्षाने माझ्यासाठी काम करावं मी पक्षासाठी काम करणार नाही अशी भूमिका ते घेत होते. यापुढे पक्षाला विनंती आहे, अशा लोकांना पक्षात घेऊ नये, यांचा इतिहास असाच आहे. विचारधारा एक नाही काहीच नाही. हे संधीसाधूपणा करत आहेत, आम्ही पक्षाला सांगितलं होतं. अनेकदा पक्षाच्या विरोधात काम करत आहेत, असे सांगितलं होतं. आम्ही कधीच त्यांच्यावर बोललो नाही. रस्त्यावर आम्ही उतरून काम केलं. देश राम मंदिर उत्सव साजरा करताना हे बाबरी मशीदवर बोलत होते, विचारधारा नाही. यांना एका पार्टीची लाइन धरता येत नाही. कुठल्याच बैठकीला, आंदोलनांना येत नाहीत, अशी तक्रार अनेकदा आम्ही पक्षाला दिली होती. त्यांना अनेकदा समज दिली, मात्र बदल झाला नाही. हे स्वतःला स्वयंघोषित नेते समजतात, यांनी काय केलं नाही. एक नगरसेवक केला नाही, आम्हाला दुःख आहे की,अशा नाकर्त्यांवर आम्ही विश्वास ठेवला, यांनी केवळ मतलबी राजकारण केलं, असंही अरविंद शिंदे यांनी म्हटलं आहे.

टेंडरमध्ये प्रॉब्लेम म्हणून पक्ष सोडला 

पुढे बोलताना अरविंद शिंदे म्हणाले, त्यांच्या टेंडरमध्ये प्रॉब्लेम म्हणून पक्ष सोडला. वक्फ बोर्डच्या जागेचा वाद होता. वक्फ बोर्डचा विषय होता, त्यात त्यांच्यावर कारवाई होणार होती म्हणून पक्ष सोडला. त्यांच्या बायकोचा विषय नाही, वहिनींचं नाव कुठ नाही. स्वतःच्या फायद्यासाठी यांनी राजकारण केलं. त्यांच्यामुळे पक्षाला फायदा कधीच झाला नाही. यांच्यात हिम्मत असती तर समोर येऊन पत्र देऊन पक्ष सोडून गेले असते. तीन नगरसेवक असताना त्या पक्षातील लोकांनी अनेक विषय बाहेर काढले, आता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणार आहेत. येणाऱ्या निवडणुकीत त्यांच्या विरोधात उमेदवार देऊन त्यांना हरवू त्यांना कायमचं माजी ठेवू. ससूनमधले विषय, ड्रॅग्सचे विषय पुढे का गेले नाहीत, स्वतःच्या फायद्यासाठी आंदोलन केली. पुढं या आंदोलनाचं काय झालं. आता पक्ष सोडणाऱ्या लोकांना विनंती आहे की, समोर येऊन सांगून मर्दासारखं जावा. कुठलीही गटबाजी नाही. आम्ही काही बंधन आणि संस्कार पळतो. काहीही बोलू नका, नाहीतर योग्य उत्तर देऊ असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

शिवानी पांढरे
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray : पुन्हा शिवाजीराजे भोसले चित्रपटाचा ट्रेलर लाँच; या सिनेमाला महाराष्ट्र उचलून धरेल,  हा सिनेमा महाराष्ट्राचा : राज ठाकरे
पुन्हा शिवाजीराजे भोसले चित्रपटाचा ट्रेलर लाँच; या सिनेमाला महाराष्ट्र उचलून धरेल, हा सिनेमा महाराष्ट्राचा : राज ठाकरे
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2025 | शनिवार
Bihar Election 2025 : मी लढलो तर राघोपूरमध्ये अमेठी सारखी स्थिती होईल, तेजस्वी यादव यांना राहुल गांधींप्रमाणं दोन जागांवर लढावं लागेल : प्रशांत किशोर
राहुल गांधींचा अमेठीत जसा पराभव झाला तसाच तेजस्वी यादव यांचा राघोपूरमध्ये होईल: प्रशांत किशोर
एक मुलगा डॉक्टर, दुसरा शिक्षक; हवाई दलाच्या माजी अधिकारी बापानं जिवंतपणीच स्वत: तिरडीवर झोपून 'राम नाम सत्य है' म्हणत बँड बाजा वाजवत अंत्ययात्रा काढली अन्...
एक मुलगा डॉक्टर, दुसरा शिक्षक; हवाई दलाच्या माजी अधिकारी बापानं जिवंतपणीच स्वत: तिरडीवर झोपून 'राम नाम सत्य है' म्हणत बँड बाजा वाजवत अंत्ययात्रा काढली अन्...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Politics: 'गद्दाराला मी उत्तर देत नाही', Uddhav Thackeray यांची Eknath Shinde यांच्यावर सडकून टीका
Pigeon Politics: 'कबूतरांमुळे महायुतीचं सरकार जाईल', जैन मुनी निलेश मुनींचा थेट इशारा!
Jain Monk Row: '...तर कोरोनाच्या विषाणूची पूजा करायची का?', Manisha Kayande यांचा मुनींना सवाल
Jain Muni Row: 'एखाद दुसरी व्यक्ति मेला ना काय होतं?', Jain Muni महाराजांचं वादग्रस्त वक्तव्य
Trailer Launch: 'हिंदीतले Yash Chopra म्हणजे मराठीतले Mahesh Manjrekar'- राज ठाकरे

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : पुन्हा शिवाजीराजे भोसले चित्रपटाचा ट्रेलर लाँच; या सिनेमाला महाराष्ट्र उचलून धरेल,  हा सिनेमा महाराष्ट्राचा : राज ठाकरे
पुन्हा शिवाजीराजे भोसले चित्रपटाचा ट्रेलर लाँच; या सिनेमाला महाराष्ट्र उचलून धरेल, हा सिनेमा महाराष्ट्राचा : राज ठाकरे
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2025 | शनिवार
Bihar Election 2025 : मी लढलो तर राघोपूरमध्ये अमेठी सारखी स्थिती होईल, तेजस्वी यादव यांना राहुल गांधींप्रमाणं दोन जागांवर लढावं लागेल : प्रशांत किशोर
राहुल गांधींचा अमेठीत जसा पराभव झाला तसाच तेजस्वी यादव यांचा राघोपूरमध्ये होईल: प्रशांत किशोर
एक मुलगा डॉक्टर, दुसरा शिक्षक; हवाई दलाच्या माजी अधिकारी बापानं जिवंतपणीच स्वत: तिरडीवर झोपून 'राम नाम सत्य है' म्हणत बँड बाजा वाजवत अंत्ययात्रा काढली अन्...
एक मुलगा डॉक्टर, दुसरा शिक्षक; हवाई दलाच्या माजी अधिकारी बापानं जिवंतपणीच स्वत: तिरडीवर झोपून 'राम नाम सत्य है' म्हणत बँड बाजा वाजवत अंत्ययात्रा काढली अन्...
Nobel Prize : डायनामाइटचा विध्वंसक शोध, नंतर 'मृत्यूचा व्यापारी'च बनला मानवतेचा तारणहार; नोबेल पुरस्काराचा इतिहास काय?
डायनामाइटचा विध्वंसक शोध, नंतर 'मृत्यूचा व्यापारी'च बनला मानवतेचा तारणहार; नोबेल पुरस्काराचा इतिहास काय?
Kolhapur Fake Currency Gang: खाकी वर्दीतील सराईतांची लाचखोरी संपता संपेना, आता बनावट नोटा छापणारा 'म्होरक्या' सुद्धा कोल्हापूर पोलिस दलातील हवालदार निघाला!
खाकी वर्दीतील सराईतांची लाचखोरी संपता संपेना, आता बनावट नोटा छापणारा 'म्होरक्या' सुद्धा कोल्हापूर पोलिस दलातील हवालदार निघाला!
एक दोन जण मेले तरी चालतील पण कबुतर जगली पाहिजेत म्हणणारे जैन मुनी अहिंसावादी आहेत ना? आता लोढा कुठे आहेत? यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते; मनसेचा हल्लाबोल
एक दोन जण मेले तरी चालतील पण कबुतर जगली पाहिजेत म्हणणारे जैन मुनी अहिंसावादी आहेत ना? आता लोढा कुठे आहेत? यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते; मनसेचा हल्लाबोल
Aarti Sehwag Mithun Manhas Affair:: बीसीसीआय अध्यक्ष मिथुन मन्हासमुळे सेहवागच्या खासगी आयुष्यात वादळ? पत्नीसोबतचा तो फोटो व्हायरल झाल्याने पुन्हा चर्चा रंगली!
बीसीसीआय अध्यक्ष मिथुन मन्हासमुळे सेहवागच्या खासगी आयुष्यात वादळ? पत्नीसोबतचा तो फोटो व्हायरल झाल्याने पुन्हा चर्चा रंगली!
Embed widget