एक्स्प्लोर

महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यानंतर राजू शेट्टींची 20 एप्रिलला शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात सभा

महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यानंतर राजू शेट्टी पहिल्यांदाच शरद पवार यांच्या बालेकिल्ल्यात येऊन सभा घेणार आहेत. 20 एप्रिल रोजी राजू शेट्टी यांची जाहीर सभा होणार आहे.

इंदापूर : महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बालेकिल्ल्यात अर्थात पुण्यात येणार आहेत. इंदापूर तालुक्यातील भवानीनगर इथल्या छत्रपती सहकारी साखर कारखाना परिसरात 20 एप्रिल रोजी राजू शेट्टी यांची जाहीर सभा होणार आहे. एकरकमी एफआरपी मिळावी, भूमी अधिग्रहण कायद्यात बदल करावा, अशा अन्य मागण्यांसाठी राजू शेट्टी इंदापूरला येणार आहेत.

चार वर्षांनी राजू शेट्टी इंदापुरात
शरद पवारांचे एकेकाळचे समर्थक पृथ्वीराज जाचक यांनी ही सभा आयोजित केली आहे. महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यानंतर राजू शेट्टी पहिल्यांदाच शरद पवार यांच्या बालेकिल्ल्यात येऊन सभा घेणार आहेत. याआधी साधारण चार वर्षांपूर्वी दूध आंदोलनासाठी राजू शेट्टी भवानीनगर इथे आले. परंतु त्यावेळी त्यांनी सभा घेतली नव्हती. त्यामुळे 20 एप्रिल रोजी होणाऱ्या जाहीर सभेत एफआरपीच्या मुद्द्यासह आणखी कोणत्या विषयावर राजू शेट्टी भाष्य करणार याकडे शेतकऱ्यांसह सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. 

महाविकास आघाडीतून बाहेर पडत स्वाभिमानीचा 'एकला चलो'चा नारा
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर न्याय मिळत नसल्याची भावना व्यक्त करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. महाविकास आघाडी सरकारने ठरविलेल्या किमान समान कार्यक्रमाच्या संदर्भात काम केलेलं नाही. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडेही दुर्लक्ष केलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर नाराज असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी व्यक्त केले होतं. कोल्हापुरात 5 एप्रिल रोजी झालेल्या पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांनी याची घोषणा केली होती. महाविकास आघाडीतून बाहेर पडताना त्यांनी 'एकला चलो'चा नारा दिला. तसंच आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर लढणार असल्याचंही त्यांनी  सांगितलं.  

संबंधित बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray on Kalyan Loksabha : कल्याणमध्ये उद्धव ठाकरे कोणता डाव टाकणार? मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांना मातोश्रीवर बोलावलं!
कल्याणमध्ये उद्धव ठाकरे कोणता डाव टाकणार? मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांना मातोश्रीवर बोलावलं!
Jyoti Mete : ज्योती मेटे शरद पवार गटातील प्रवेशावर काय म्हणाल्या, उमेदवारीवर काय निर्णय झाला?
ज्योती मेटे शरद पवार गटातील प्रवेशावर काय म्हणाल्या; बीडमधून उमेदवारीवर कोणता निर्णय झाला?
Vasant More meet Prakash Ambedkar :   वसंत मोरे-प्रकाश आंबडेकर यांच्या भेटीत काय घडलं? दोघांनी मिळून सविस्तर सांगितलं!
Vasant More meet Prakash Ambedkar : वसंत मोरे-प्रकाश आंबडेकर यांच्या भेटीत काय घडलं? दोघांनी मिळून सविस्तर सांगितलं!
RCB vs KKR : आरसीबीला सूचक इशारा देत रिंकू सिंगनं वातावरण तापवलं, फोटो पोस्ट करत दिलं चॅलेंज
कोहली आणि फाफ डु प्लेसिसच्या आरसीबीला रिंकूचा इशारा, मॅचपूर्वी न बोलताच सगळं सांगितलं
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Shriniwas Patil Loksabha : श्रीनिवास पाटलांची लोकसभा निवडणुकीतून माघार!Chhatrapati Sambhajinagar Rada : संभाजीनगरमध्ये बाळू औतांडेंकडून विक्की राजे पाटलांना मारहाणPrakash Ambedkar : वसंत मोरेंनी पुण्यात मागितला आंबेडकरांचा पाठिंबा, दोन ते चार दिवसांत निर्णय-मोरेSharad Pawar Satara Lok Sabha : साताऱ्यात उदयनराजेंविरोधात कोण? शरद पवार म्हणाले ....

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray on Kalyan Loksabha : कल्याणमध्ये उद्धव ठाकरे कोणता डाव टाकणार? मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांना मातोश्रीवर बोलावलं!
कल्याणमध्ये उद्धव ठाकरे कोणता डाव टाकणार? मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांना मातोश्रीवर बोलावलं!
Jyoti Mete : ज्योती मेटे शरद पवार गटातील प्रवेशावर काय म्हणाल्या, उमेदवारीवर काय निर्णय झाला?
ज्योती मेटे शरद पवार गटातील प्रवेशावर काय म्हणाल्या; बीडमधून उमेदवारीवर कोणता निर्णय झाला?
Vasant More meet Prakash Ambedkar :   वसंत मोरे-प्रकाश आंबडेकर यांच्या भेटीत काय घडलं? दोघांनी मिळून सविस्तर सांगितलं!
Vasant More meet Prakash Ambedkar : वसंत मोरे-प्रकाश आंबडेकर यांच्या भेटीत काय घडलं? दोघांनी मिळून सविस्तर सांगितलं!
RCB vs KKR : आरसीबीला सूचक इशारा देत रिंकू सिंगनं वातावरण तापवलं, फोटो पोस्ट करत दिलं चॅलेंज
कोहली आणि फाफ डु प्लेसिसच्या आरसीबीला रिंकूचा इशारा, मॅचपूर्वी न बोलताच सगळं सांगितलं
Mirzapur 3 Release Date : कालीन भैय्या-गुड्डू पंडित भिडणार! 'मिर्जापुर 3'च्या रिलीज डेटवर निर्मात्यांनी दिली अपडेट
कालीन भैय्या-गुड्डू पंडित भिडणार! 'मिर्जापुर 3'च्या रिलीज डेटवर निर्मात्यांनी दिली अपडेट
दिंडोरी लोकसभेत भाजपचं वर्चस्व; भारती पवारांना पुन्हा उमेदवारी, महाविकास आघाडीकडून रिंगणात कोण?
दिंडोरी लोकसभेत भाजपचं वर्चस्व; भारती पवारांना पुन्हा उमेदवारी, महाविकास आघाडीकडून रिंगणात कोण?
Video : संभाजीनगरात मराठा समाजाच्या बैठकीत राडा; घोषणाबाजी, हाणामारीमुळे तणावाची स्थिती!
Video : संभाजीनगरात मराठा समाजाच्या बैठकीत राडा; घोषणाबाजी, हाणामारीमुळे तणावाची स्थिती!
MP Srinivas Patil Withdraws Candidacy: मोठी बातमी : खासदार श्रीनिवास पाटील यांची सातारा लोकसभेतून माघार
मोठी बातमी : खासदार श्रीनिवास पाटील यांची सातारा लोकसभेतून माघार
Embed widget