Rajgurunagar Crime News: राजगुरुनगरमध्ये दोन चिमुरड्या लेकींना नराधमाने संपवलं; रुपाली चाकणकर पोलिसांना म्हणाल्या, "हे प्रकरण..."
Rajgurunagar Crime News: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्याशी बैठक घेतली. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येणार असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिली आहे.
पुणे: पुण्यातील राजगुरुनगर येथे एका परप्रांतीय नराधमाने आपल्या घराच्या शेजारी राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. लैंगिक अत्याचार करण्यापूर्वी त्याच मुलीच्या लहान बहिणीला खोलीतल्या पाणी भरण्याच्या बॅरलमध्ये बुडवून मारलं. त्यानंतर बेडरूममध्ये कोंडून ठेवलेल्या मोठ्या बहिणीवर अत्याचार केला. आपलं सत्य कोणाला समजू नये म्हणून पीडित मुलीला देखील मारून थेट त्याच बॅरलमध्ये टाकून घटनास्थळावरून पळ काढला. हा भयानक प्रकार राजगुरुनगर शहरातील वाडा रस्त्यावरील वस्तीमध्ये काल( गुरुवारी दि. 26) मध्यरात्री समोर आला आहे. या प्रकरणी संतप्त नागरिकांनी आणि नातेवाईकांनी पोलिस स्टेशनच्या बाहेर ठिय्या मांडला. या प्रकरणातील आरोपीला तत्काळ शिक्षा द्या अशी मागणी केली. आज या प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्याशी बैठक घेतली. सर्व घटना जाणून घेतल्यानंतर आता हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येणार असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिली आहे.
राजगुरुनगरमध्ये झालेल्या दोन चिमुकल्यांच्या हत्येप्रकरणी रूपाली चाकणकर यांनी पोलिसांशी चर्चा केली. बुधवारी पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरमध्ये दोन चिमुकल्या बहिणींवर अत्याचार करून त्यांचा जीव घेण्यात आला. या प्रकरणाची सविस्तर माहिती घेण्यासाठी रूपाली चाकणकर आज पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. अटक केल्यानंतर आरोपी वरती गुन्हे देखील त्या पद्धतीचे दाखल केलेले आहे. सर्व घटना जाणून घेतल्यानंतर आता हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येणार असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिली आहे. यामध्ये आरोपीला फाशी मिळेल यासाठी राज्य महिला आयोग पाठपुरावा करणार असल्याची माहिती रूपाली चाकणकर यांनी दिली आहे.
नेमकं काय घडलं?
पीडित व मयत मुली बुधवारी (दि. 25) दुपारी बारा- एक वाजण्याच्या सुमारास खेळताना गायब झाल्यावर शोध घेण्यात आला. मात्र त्यांचा शोध न लागल्याने पालकांनी संध्याकाळी खेड पोलिसात त्या हरवल्याची तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, तपासावेळी जवळच असलेल्या एका बियरबार मधील 54 वर्षीय अजय दास (मूळ रा. पश्चिम बंगाल) नावाच्या वेटरने हे संतापजनक कृत्य केलं आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास करत अवघ्या काही तासांत पुणे क्राइम ब्रँच आणि खेड पोलिसांनी आरोपीला पुणे येथील एका लॉजमधून ताब्यात घेतले. नऊ आणि आठ वर्षांच्या या मुली ज्या ठिकाणी राहायला आहेत, त्या इमारतीत वरच्या मजल्यावर आरोपी राहायला आहे. त्याची चांगली ओळख असल्याने व चॉकलेट, खाऊ देत असल्याने मुलींचा त्याच्या सोबत नेहमी सहवास येत होता. या घटनेची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे यांनी खेड पोलिस ठाण्यात पत्रकार परिषदेत दिली.
एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. लैंगिक अत्याचार करण्यापूर्वी त्याच मुलीच्या लहान बहिणीला खोलीतल्या पाणी भरण्याच्या बॅरलमध्ये बुडवून मारलं. त्यानंतर बेडरूममध्ये कोंडून ठेवलेल्या मोठ्या बहिणीवर अत्याचार केला. आपलं सत्य कोणाला समजू नये म्हणून पीडित मुलीला देखील मारून थेट त्याच बॅरलमध्ये टाकून घटनास्थळावरून पळ काढला.
राजगुरूनगरमध्ये आज बंद
राजगुरूनगरमध्ये सकाळपासून काही व्यापाऱ्यांनी स्वतःहुन दुकान बंद ठेवली आहेत. चिमुरड्या बहिणींवर अत्याचार करून हत्या करण्यात आल्याचे काही प्रमाणात असे पडसाद उमटत आहेत. आरोपीला तातडीनं फाशी द्यावी अशी मागणी केली जात आहे. या मागणीला पाठिंबा देण्यासाठी अनेक व्यापारी दुकानं बंद ठेवत आहेत. इतरांनी ही या आंदोलनात सहभागी होण्यासाठी विविध संघटना आवाहन करत आहेत.
पीडित कुटुंब आणि नातेवाईक आज पोलीस स्टेशन समोर उपोषण
या संतापजनक घटनेनंतर पीडित कुटुंब आणि नातेवाईक आज पोलीस स्टेशन समोर उपोषणासाठी बसले आहेत. प्रशासनाने लेखी आश्वासन दिलं. मात्र, ठोस भूमिका केव्हा पार पाडणार या मागणीसाठी उपोषण सुरू करण्यात आले आहे.