एक्स्प्लोर

Raigad Suspected Boat: मुंबईसह पुण्यातही हायअलर्ट जारी; पोलिस आयुक्तांनी दिले बंदोबस्ताचे आदेश

पुण्यात देखील सुरक्षेची पुर्ण काळजी घेतली जात आहे. पुण्यात हाय अलर्ट जारी करुन पुण्यातील महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात येत आहे. पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. 

Raigad Suspected Boat: रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर आणि भरडखोल या पर्यटनस्थळी समुद्रात दोन संशयास्पद बोटी आढळून आल्या आहेत. या बोटींमध्ये एके 47 रायफल सापडल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. यामुळे रायगड जिल्ह्यात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यासोबतच पुण्यात देखील सुरक्षेची पुर्ण काळजी घेतली जात आहे. पुण्यात हाय अलर्ट जारी करुन पुण्यातील महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात येत आहे. पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. 

रायगड जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झालं आहे . याच पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये नाकाबंदी करण्यात आली आहे. तसेच रायगड,मुंबईसह पुण्यामध्येही हाय अलर्टजारी करण्यात आला आहे. श्रीवर्धनमधील हरिहरेश्वर आणि भरडखोल येथील समुद्र किनारी दोन बोटी सापडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यापैकी हरिहरेश्वर येथील बोटीत दोन तीन एके-47 आढळल्या. त्याशिवाय 225 राउंड्स गोळ्या आढळून आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तर, भरडखोल येथील किनाऱ्याजवळ आढळलेल्या बोटीत लाइफ जॅकेट आणि इतर साहित्य आढळून आल्यात. या प्रकरणी कोणतीही व्यक्ती आढळली नाही. रत्नागिरीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. रत्नागिरीच्या लँडिंग पॉईंटवर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. 

स्थानिकांना दिसली होती बोट
काही स्थानिकांना सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास बोट समुद्रात अडकल्याचे दिसून आले. काही स्थानिकांनी या बोटीत काय आहे, याची पाहणी केली. स्थानिकांना रायफल आणि बुलेट्स आढळून आल्या. त्यांनी तातडीने  पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर तहसीलदारांनी आणि स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या बोटीवर असलेल्या रायफलच्या बॉक्सवर एका कंपनीचे नाव दिसून आले. ही स्पीड बोट असल्याची माहिती जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी दिली. 

रायगडमध्ये शस्त्र असलेली बोट आढळल्याने खळबळ उडाली आहे. मुंबईत 26/11 च्या हल्ल्यातील दहशतवादी समुद्र मार्गे आले होते. त्याशिवाय, मुंबईत 1993 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात वापरण्यात आलेले आरडीएक्सदेखील श्रीवर्धनच्या किनाऱ्यावर उतरवण्यात आले होते.

शिवानी पांढरे
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सरकारकडे शक्तिपीठ महामार्गासाठी पैसे, पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नाहीत; सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल
सरकारकडे शक्तिपीठ महामार्गासाठी पैसे, पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नाहीत; सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल
शाहरुख, आमिरसोबत एकाच स्टेजवर अन् एक शब्द बोलताच सलमान खान पाकिस्तानकडून थेट दहशतवादी घोषित; नेमकं घडलं तरी काय?
शाहरुख, आमिरसोबत एकाच स्टेजवर अन् एक शब्द बोलताच सलमान खान पाकिस्तानकडून थेट दहशतवादी घोषित; नेमकं घडलं तरी काय?
आणखी एक शांतता.. सतीश शाह यांच्या निधनाने बिग बीही सुन्न, माधुरी, हृतिकसह अनेक दिग्गजांनी भावनांना वाट मोकळी करून दिली
आणखी एक शांतता.. सतीश शाह यांच्या निधनाने बिग बीही सुन्न, माधुरी, हृतिकसह अनेक दिग्गजांनी भावनांना वाट मोकळी करून दिली
ही तर संस्थात्मक हत्या, सत्तेकडून गुन्हेगारांना संरक्षण, भाजप सरकारचा अमानवी आणि निर्दयी स्वभाव उघडकीस; राहुल गांधींचा हल्लाबोल
ही तर संस्थात्मक हत्या, सत्तेकडून गुन्हेगारांना संरक्षण, भाजप सरकारचा अमानवी आणि निर्दयी स्वभाव उघडकीस; राहुल गांधींचा हल्लाबोल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadanvis Phaltan Speech :  निंबाळकरांवरील आरोप देवेंद्र फडणवीसांनी फेटाळले,  FULL SPEECH
Pandharpur Vitthal Darshan : कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठल - रखुमाईचे 24 तास दर्शन सुरू
Nandurbar Rains: 8 दिवसांपूर्वी 8 मृत्यू, तरीही चांदसेली घाट 'जैसे थे', दरड कोसळून वाहतूक ठप्प
Pandharpur : Vitthal मंदिराचे 24 तास दर्शन सुरु, समिती अध्यक्षांची माहिती
Farmer Distress: 'तोंडातला घास निसर्गाने हिरावला', Gondia तील अवकाळी पावसाने नुकसान

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सरकारकडे शक्तिपीठ महामार्गासाठी पैसे, पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नाहीत; सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल
सरकारकडे शक्तिपीठ महामार्गासाठी पैसे, पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नाहीत; सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल
शाहरुख, आमिरसोबत एकाच स्टेजवर अन् एक शब्द बोलताच सलमान खान पाकिस्तानकडून थेट दहशतवादी घोषित; नेमकं घडलं तरी काय?
शाहरुख, आमिरसोबत एकाच स्टेजवर अन् एक शब्द बोलताच सलमान खान पाकिस्तानकडून थेट दहशतवादी घोषित; नेमकं घडलं तरी काय?
आणखी एक शांतता.. सतीश शाह यांच्या निधनाने बिग बीही सुन्न, माधुरी, हृतिकसह अनेक दिग्गजांनी भावनांना वाट मोकळी करून दिली
आणखी एक शांतता.. सतीश शाह यांच्या निधनाने बिग बीही सुन्न, माधुरी, हृतिकसह अनेक दिग्गजांनी भावनांना वाट मोकळी करून दिली
ही तर संस्थात्मक हत्या, सत्तेकडून गुन्हेगारांना संरक्षण, भाजप सरकारचा अमानवी आणि निर्दयी स्वभाव उघडकीस; राहुल गांधींचा हल्लाबोल
ही तर संस्थात्मक हत्या, सत्तेकडून गुन्हेगारांना संरक्षण, भाजप सरकारचा अमानवी आणि निर्दयी स्वभाव उघडकीस; राहुल गांधींचा हल्लाबोल
पुढील आठवड्यात देशभरात मतदारयाद्या सुधारणा कार्यक्रम सुरु होणार? आगामी वर्षात पाच राज्यात निवडणूक रणधुमाळी
पुढील आठवड्यात देशभरात मतदारयाद्या सुधारणा कार्यक्रम सुरु होणार? आगामी वर्षात पाच राज्यात निवडणूक रणधुमाळी
Devendra Fadnavis on Phaltan Doctor death: फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत मित्र म्हटलं, म्हणाले, 'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'
फडणवीसांनी रणजितसिंहांना जाहीर सभेत मित्र म्हटलं, म्हणाले, 'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'
Ravindra Dhangekar Vs Murlidhar Mohol: रवींद्र धंगेकरांचा मुरलीधर मोहोळांवर आणखी एक सनसनाटी आरोप, गोखलेंसाठी केंद्रीय मंत्रि‍पदाचा गैरवापर, नेमकं काय घडलं?
धंगेकरांचा मुरलीधर मोहोळांवर आणखी एक आरोप, गोखलेंसाठी केंद्रीय मंत्रि‍पदाचा गैरवापर, नेमकं काय घडलं?
Bacchu Kadu : आता मुहूर्त काढायला बामणाची वाट पाहता का? आजवर इतका लबाड मुख्यमंत्री देशाने पाहिला नाही; कर्जमाफीच्या मुद्दयावरुन बच्चू कडूंनी ओढले टीकेचे आसूड
आता मुहूर्त काढायला बामणाची वाट पाहता का? आजवर इतका लबाड मुख्यमंत्री देशाने पाहिला नाही; कर्जमाफीच्या मुद्दयावरुन बच्चू कडूंचे टीकेचे आसूड
Embed widget