एक्स्प्लोर

बिहार निवडणक एक्झिट पोल 2025

(Source:  Poll of Polls)

Devendra Fadnavis on Phaltan Doctor death: फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत मित्र म्हटलं, म्हणाले, 'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'

Devendra Fadnavis in Phaltan: आज ज्याप्रकारे आमचे रणजितदादा आणि सचिनदादांच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणात विकासाकामं होतायत हे बघून समाधान वाटत आहे. फलटणची भूमी ऐतिहासिक आहे.

Devendra Fadnavis & Ranjitsingh Naik Nimbalkar: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येमुळे राज्यभरात खळबळ माजली असताना रविवारी फलटणच्या मधुदीप हॉटेलसमोरील मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विकासकामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsingh Naik Nimbalkar) यांनी हा कृतज्ञता सोहळा आयोजित केला होता. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपल्या भाषणात फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या मृत्यूवरुन सुरु असलेल्या राजकारणावरुन विरोधकांना फटकारले. तसचे, 'रणजितसिंह चिंता करु नका, आम्ही पुर्ण ताकतीने तुमच्या पाठीशी आहोत‌', असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. (Phaltan Doctor Suicide)

आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच देवेंद्र फडणवीस यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा उल्लेख केला. आज ज्या प्रचंड आणि अतिविशाल कार्यक्रमाचे नियोजन ज्यांनी केले आहे, फलटणच्या विकासासाठी सातत्याने संघर्ष केला ते आमचे मित्र रणजितसिंह नाईक निंबाळकरजी, असा उल्लेख फडणवीसांनी केला. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणावर भाष्य केले. त्यांनी म्हटले की, आज मी इथे येऊ नये, यासाठी प्रयत्न झाल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

परवा आमची एका लहान बहीण डॉ. संपदा मुंडे यांचा अतिश्य दुर्दैवी मृत्यू झाला, त्या भगिनीने आत्महत्या केली. आत्महत्येचं कारणही आपल्या हातावर लिहून ठेवलं होतं. पोलिसांनी तात्काळ जे आरोपी आहेत, त्यांना अटक केली आहे. त्यामधील जवळपास सगळं सत्य बाहेर येत आहे. कुठल्याही परिस्थितीत आमच्या या भगिनीला न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, हा निर्णय आम्ही घेतला. अलीकडच्या काळात प्रत्येक गोष्टी राजकारण घुसवलं जातं, तशाचप्रकारचा निंदनीय प्रयत्न झाला. काहीही कारण नसताना रणजितसिंह निबाळकर आणि सचिन पाटील यांचे नाव या प्रकरणात घुसवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण या महाराष्ट्राला देवाभाऊ माहिती आहे. मला थोडी जरी शंका आली असती तरी मी कार्यक्रमाला आलो नसतो. अशा बाबतीत मी कधीच पक्ष, जात, व्यक्ती आणि राजकारण पाहत नाही. जिथे लहान भगिनीचा विषय असतो तिकडे मी कोणतीही तडजोड करत नाही. मात्र, मढ्याच्या टाळुवरचे लोणी खाण्याचे प्रकार सुरु आहेत. चुकीच्या गोष्टीला मी कधीही पाठीशी घातलेले नाही आणि जर चुकीचे राजकारण करत असतील तर ते देखील सहन करणार नाही. त्याला उत्तर देणारा मी आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले.

आणखी वाचा

महिलांना संरक्षण देण्याची वेळ येते तेव्हा मुख्यमंत्री हात वर करतात, त्यांनी राजीनामा द्यावा; प्रणिती शिंदे कडाडल्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bihar Exit Poll : तेजस्वी यादवांसाठी अजूनही आशेचा किरण, 'या' एक्झिट पोलने दिले महागठबंधनला बिहारमध्ये बंपर बहुमत
तेजस्वी यादवांसाठी अजूनही आशेचा किरण, 'या' एक्झिट पोलने दिले महागठबंधनला बिहारमध्ये बंपर बहुमत
Bihar Exit Poll : बिहारमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळणार, महागठबंधन पिछाडीवर; रुद्र रिसर्च एक्झिट पोलचा अंदाज
बिहारमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळणार, महागठबंधन पिछाडीवर; रुद्र रिसर्च एक्झिट पोलचा अंदाज
Girija Oak: निळी साडी, मोकळे केस, साजरं रुप; मराठमोळ्या अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून नेटीझन्सचा ग्रोकवर प्रश्नांचा भडीमार
Girija Oak: निळी साडी, मोकळे केस, साजरं रुप; मराठमोळ्या अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून नेटीझन्सचा ग्रोकवर प्रश्नांचा भडीमार
मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर विजय कुमार यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन; कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा
मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर विजय कुमार यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन; कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Jarange Murder Plot: 'Dada Garud शी संबंध नाही, दलितांचा बळी देऊ नका', Kanchan Salve आक्रमक
Bihar Polls 2025 : Chiraiya चे BJP उमेदवार Lalbabu Prasad Gupta पैसे वाटताना कॅमेऱ्यात कैद? FIR दाखल.
Kolhapur Leopard : कोल्हापूरच्या वस्तीत बिबट्याचा थरार, ३ तास श्वास रोखले! Special Report
Delhi Blast Doctor : डॉक्टर, पण बनले दहशतवादी; दिल्ली स्फोटाचं धक्कादायक कनेक्शन Special Report
Delhi Blast victim : दिल्ली स्फोटात निष्पापांचा बळी, कुटुंबीयांचा आक्रोश Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Exit Poll : तेजस्वी यादवांसाठी अजूनही आशेचा किरण, 'या' एक्झिट पोलने दिले महागठबंधनला बिहारमध्ये बंपर बहुमत
तेजस्वी यादवांसाठी अजूनही आशेचा किरण, 'या' एक्झिट पोलने दिले महागठबंधनला बिहारमध्ये बंपर बहुमत
Bihar Exit Poll : बिहारमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळणार, महागठबंधन पिछाडीवर; रुद्र रिसर्च एक्झिट पोलचा अंदाज
बिहारमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळणार, महागठबंधन पिछाडीवर; रुद्र रिसर्च एक्झिट पोलचा अंदाज
Girija Oak: निळी साडी, मोकळे केस, साजरं रुप; मराठमोळ्या अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून नेटीझन्सचा ग्रोकवर प्रश्नांचा भडीमार
Girija Oak: निळी साडी, मोकळे केस, साजरं रुप; मराठमोळ्या अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून नेटीझन्सचा ग्रोकवर प्रश्नांचा भडीमार
मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर विजय कुमार यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन; कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा
मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर विजय कुमार यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन; कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा
Arshdeep Singh : अर्शदीप सिंहने घेतली ब्रँड न्यू Mercedes Benz G Class, लग्जरी कारची किंमत किती कोटी?
अर्शदीप सिंहने घेतली ब्रँड न्यू Mercedes Benz G Class, लग्जरी कारची किंमत किती कोटी?
Bihar Exit Poll : बिहारमध्ये नितीश कुमारांची हवा, गत निवडणुकीच्या तुलनेत यंदा मोठं यश; एक्झिट पोलची आकडेवारी काय सांगते?
Bihar Exit Poll : बिहारमध्ये नितीश कुमारांची हवा, गत निवडणुकीच्या तुलनेत यंदा मोठं यश; एक्झिट पोलची आकडेवारी काय सांगते?
Bihar Exit Poll : बिहार विधानसभेचा एक्झिट पोल, प्रशांत किशोर यांच्या जन-सुराज पक्षाला जनतेनं नाकारलं; किती जागा जिंकणार?
Bihar Exit Poll : बिहार विधानसभेचा एक्झिट पोल, प्रशांत किशोर यांच्या जन-सुराज पक्षाला जनतेनं नाकारलं; किती जागा जिंकणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
Embed widget