एक्स्प्लोर

झिपलाईनिंग करण्यासाठी 30 फूटावर गेली, दोर अडकवण्यास स्टूलवर चढताच पाय सटकला अन्.... पुण्यात तरुणीचा मृत्यू

कुटुंबाच्या डोळ्यादेखत तरुणीचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर वॉटरपार्कमधील सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप होत आहे.

Pune: पुण्यातील तरुणीला झिपलाईनिंग हा साहसी खेळ खेळणं चांगलंच भोवलं आहे. झिपलायनिंग करताना 30 फूट उंची वरून कोसळून तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात घडली आहे.  तरल अटपाळकर अस मृत्यू झालेल्या 28 वर्षीय तरुणीचं नाव आहे. या प्रकरणातून वॉटरपार्कच्या मालकासह चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली हेाती. (Pune Water Park Zipplining Death)

नक्की घडले काय?

कुटुंबासोबत राजगड वॉटरपार्कमध्ये साहसी खेळ आणि मौज करण्यासाठी गेलेल्या तरुणीला झिप लाईन हा खेळ जीवावर बेतलाय. पुण्यातील भोर तालुक्यात ही घटना घडलीय. झिपलाईन करण्यासाठी तरुणी 30 फूट उंचीवर गेली. यात रोपवरून चालत असताना तिने सुरक्षा दोर वरच्या बाजूला रेलिंगला अडकवण्याचा प्रयत्न केला. पण रेलिंगपर्यंत हात जात नसल्याने जवळ असलेल्या लोखंडी स्टूलवर ती उभी राहिली. मात्र, स्टूल हलला आणि बाजूला असलेल्या रेलिंगवरून तिचा पाय सटकला आणि ती थेट 30 फूट उंचीवरून खाली पडली. यात तरुणीचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी आता वॉटरपार्क चालक आणि मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. सोबतच वॉटरपार्कचा निष्काळजीपणादेखील समोर आला आहे. यानंतर तिला तात्काळ नसरापूर येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. पंरतु, तिथे डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी आकस्मीक मृत्यूची नोंद करण्यात आली  आहे. पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे. कुटुंबाच्या डोळ्यादेखत तरुणीचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर वॉटरपार्कमधील सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप होत आहे.

तनिषा भिसे मृत्यूप्रकरणी डॉ. सुश्रुत घैसासांची चौकशी होणार

पुणे पोलीस डॉ. घैसास यांना नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलवणार असल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आज पुणे पोलीस डॉ. घैसास (Sushrut Ghaisas) यांना नोटीस पाठवणार आहेत. सगळी घटना आता पुणे पोलीस घैसास यांच्याकडून जाणून घेतील. पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर निष्काळजीपणा दाखवल्याचा ठपका ठेवून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 106( 1 ) या अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हेही वाचा:

Mumbai Crime News: भाजप आमदाराच्या नावे मतदारांना कॉलवरुन पैशांची मागणी; फसवणूकीचा प्रकार लक्षात येताच पोलीस स्टेशन गाठलं, अन् पुढे...   

शिवानी पांढरे
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
Embed widget