एक्स्प्लोर

पुण्यासाठी पुढचे काही तास महत्त्वाचे, जिल्ह्याला रेड अलर्ट, शाळा-कार्यालयांना सुट्टी, हवामानाचा ताजा अंदाज काय?

Pune Weather Update: पुणे शहर परिसरात पावसामुळे हाहाकार उडाला आहे. अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने आज पुणे शहराला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पुणे: पुणे शहर (Pune Rain) परिसरात पावसामुळे हाहाकार उडाला आहे. अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने आज पुणे शहराला (Pune Rain) रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज मुसळदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार येत्या काही तासांमध्ये पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला, पिंपरी चिंचवड परिसरात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुण्यात मुसळधार पावसानं थैमान घातलं असून जनजीवन विस्कळीत झालं आहे.अनेक भागात रस्ते जलमय झाले आहेत. शहराच्या सखल भागात पाणी साचून ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं आहे. एनडीआरएफकडून मदत आणि बचावकार्य सुरु आहे. प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सर्तकतेचे आवाहन करण्यात आले आहे. गरज नसल्यास घराबाहेर पडू नका असंही प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

अशात खबरदारी म्हणून पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांना सुट्टी जाहीर केली होती. आता शहरातील परिस्थिती लक्षात घेता पुणे शहर, पिंपरी चिंचवड भागातील कार्यालये व इतर अस्थापनांना सुटी देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिले आहेत. शासकीय कार्यालये वगळता इतरांनी कामकाज बंद ठेवण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांचे आवाहन करण्यात आले आहे.

मध्य महाराष्ट्रासह घाट भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा (Heavy Rain) हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. पुढील 24 तासांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात देखील हवामान विभागाकडून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, पुढील 24 तासांसाठी हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

 अजित पवार पुण्याकडे रवाना 

 मुंबई, पुणे, ठाण्यासह राज्यात होत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातून राज्यातील अतिवृष्टी आणि मदतकार्याचा आढावा घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार पुण्याकडे रवाना झाले आहेत. पुणे शहर आणि जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि त्यामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर ते स्वत: जिल्ह्यात उपस्थित राहून बचाव आणि मदतकार्याचे नेतृत्वं करणार आहेत. 

खडकवासला धरणातून करण्यात येणारा पाण्याचा विसर्ग कमी; पाणी ओसरायला सुरुवात

खडकवासला धरणातून करण्यात येणारा पाण्याचा विसर्ग कमी करुन पंधरा हजार क्युसेक्स करण्यात आला आहे. त्यामुळे पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे. मात्र हे पाणी कमी होणं तात्पुरतं ठरु शकतं. कारण पावसाचा (Heavy Rain) जोर पाहता पुन्हा पाण्याचा विसर्ग वाढवला जाऊ शकतो. त्यामुळे या संधीचा उपयोग करून सखल भागातील लोकांनी घरातून बाहेर पडून सुरक्षित ठिकाणी येण्याची गरज आहे.

मावळ मधील कुंडमळा येथे पर्यटकांना बंदी, पावसामुळे पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ

मावळ तालुक्यात काल पासून तुफान पाऊस सुरू आहे. त्यामुळे सर्वच नदी नाले ओसंडून वाहत आहेत. तळेगाव दाभाडे येथील कुंडमळा येथे असणारी इंद्रायणी नदी देखील दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे पर्यटन स्थळ असलेल्या कुंडमळा येथे पाणी साकव पुलापर्यंत आले आहे. कुंडमळा परिसरात असणाऱ्या कुंडदेवी मातेचे मंदिर देखील पाण्याखाली गेले आहे. कुंडमळा परीसरात वर्षाविहार करण्यासाठी अनेक पर्यटक येतात. मात्र कुंडमळा येथे पाण्याने रौद्ररूप धारण केल्याने पर्यटकांना येथे बंदी घालण्यात आली आहे.

संबंधित बातम्या 

Pune Rain: पुण्यात मुसळधार पावसाने मावळ आणि मुळशीतील सर्व पर्यटनस्थळे पुढील 5 दिवसांसाठी बंद, प्रशासनाचे आदेश

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 सप्टेंबर 2024 | शनिवार
beer : दारूचा नियम बिअरला लागू होत नाही! एक्स्पायर झालेली बिअर पोटात गेल्यास काय होतं माहीत आहे का?
दारूचा नियम बिअरला लागू होत नाही! एक्स्पायर झालेली बिअर पोटात गेल्यास काय होतं माहीत आहे का?
Indian Railway : चालत्या ट्रेनमधील टॉयलेटमधून आवाज आला, दरवाजा उघडल्यावर धक्कादायक घटना समोर, दिव्यांग महिलेसोबत...
चालत्या ट्रेनमधील टॉयलेटमधून आवाज आला, दरवाजा उघडल्यावर धक्कादायक घटना समोर, दिव्यांग महिलेसोबत...
Panama Deports Indians : शाहरुखचा 'डंकी' आठवतो का? तो 'डंकी' मार्ग काय आहे तरी काय? 130 भारतीय हद्दपार, अमेरिका ठरली कारणीभूत!
शाहरुखचा 'डंकी' आठवतो का? तो 'डंकी' मार्ग काय आहे तरी काय? 130 भारतीय हद्दपार, अमेरिका ठरली कारणीभूत!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Celebrity Bappa : कलाकारांच्या घरी लाडका बाप्पा विराजमानEknath Khadse On Mahayuti : महायुतीचं सरकार जावं; मविआचं सरकार यावं;खडसेंचं मोठं वक्तव्यCelebrity Bappa : कलेच्या अधिपतीची कलाकारांकडून आराधना; सेलिब्रिटींच्या घरचा बाप्पाAmol Mitkari Akola : मिटकरींच्या बाप्पाच्या देखाव्याची चर्चा;मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर अजित पवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 सप्टेंबर 2024 | शनिवार
beer : दारूचा नियम बिअरला लागू होत नाही! एक्स्पायर झालेली बिअर पोटात गेल्यास काय होतं माहीत आहे का?
दारूचा नियम बिअरला लागू होत नाही! एक्स्पायर झालेली बिअर पोटात गेल्यास काय होतं माहीत आहे का?
Indian Railway : चालत्या ट्रेनमधील टॉयलेटमधून आवाज आला, दरवाजा उघडल्यावर धक्कादायक घटना समोर, दिव्यांग महिलेसोबत...
चालत्या ट्रेनमधील टॉयलेटमधून आवाज आला, दरवाजा उघडल्यावर धक्कादायक घटना समोर, दिव्यांग महिलेसोबत...
Panama Deports Indians : शाहरुखचा 'डंकी' आठवतो का? तो 'डंकी' मार्ग काय आहे तरी काय? 130 भारतीय हद्दपार, अमेरिका ठरली कारणीभूत!
शाहरुखचा 'डंकी' आठवतो का? तो 'डंकी' मार्ग काय आहे तरी काय? 130 भारतीय हद्दपार, अमेरिका ठरली कारणीभूत!
Ajit Pawar : 'अजितदादांकडून मविआच्या काळातही निधीवाटपात दुजाभाव', काँग्रेस नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
'अजितदादांकडून मविआच्या काळातही निधीवाटपात दुजाभाव', काँग्रेस नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
Bangladesh Violence :  बांगलादेश हिंसाचारानंतर गेल्या 30 दिवसात काय बदलले; BSF आणि BGB ने अचानक सीमेवर बैठक का बोलावली?
बांगलादेश हिंसाचारानंतर गेल्या 30 दिवसात काय बदलले; BSF आणि BGB ने अचानक सीमेवर बैठक का बोलावली?
Marathwada Dam Water:गणेशपुजनाला जायकवाडी 100%, मराठवाड्यातील विष्णूपुरी, सिद्धेश्वरसह उर्वरित धरणांची काय स्थिती?
गणेशपुजनाला जायकवाडी 100%, मराठवाड्यातील विष्णूपुरी, सिद्धेश्वरसह उर्वरित धरणांची काय स्थिती?
नाशिकमध्ये कुंटणखाना प्रकरणात राजकीय नेत्याला अटक केल्यानं खळबळ; हायप्रोफाईल सोसायटीमधील रॅकेटचा पर्दाफाश
नाशिकमध्ये कुंटणखाना प्रकरणात राजकीय नेत्याला अटक केल्यानं खळबळ; हायप्रोफाईल सोसायटीमधील रॅकेटचा पर्दाफाश
Embed widget