Pune Water Crisis : पुण्याची वाटचाल वाळवंट होण्याच्या दिशेने सुरु; रोज हजारो टँकरने पाणीपुरवठा!
पुणे कधीकाळी ओळखलं जायचं ते मुबलक पाणी, हिरव्यागार (Pune Water Supply Crisis) टेकड्या, प्रसन्न हवा आणि आरामदायी जीवनशैलीसाठी. पण याच पुण्याची वाटचाल वाळवंट होण्याच्या दिशेने सुरु आहे.
पुणे : पुणे कधीकाळी ओळखलं जायचं ते मुबलक पाणी, हिरव्यागार (Pune Water Supply Crisis) टेकड्या, प्रसन्न हवा आणि आरामदायी जीवनशैलीसाठी. पण याच पुण्याची वाटचाल वाळवंट होण्याच्या दिशेने सुरु आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा अपुरा ठरू लागल्याने शहरातील मोठ्या लोकसंख्येला वर्षाचे बाराही महिने टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे.
उन्हाच्या झळा वाढू लागल्यानंतर तर पाण्याची टंचाई आणखी वाढत चालली आहे. सध्या पुण्यात दररोज हजारो टँकर्सच्या साहाय्याने पाणीपुरवठा केला जातो. पुणे महापालिकाकडून दररोज साडे अकराशे टँकर्स वेगवगेळ्या भागात पुरवले जात असले तरी ते अपुरे ठरत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे
हजारो खाजगी टँकर्स सोसायट्यांना पाणीपुरवठा करताना दिसत आहेत. पाण्याची ही गरज भागवण्यासाठी बोअरवेलच्या साहाय्याने जमिनीतून पाणी उपसून ते शेततळ्यात ओतलं जातं आहे आणि तिथून ते टँकर्समध्ये भरून शहराच्या विविध भागात पाठवलं जातं आहे. त्यामुळं कधीकाळी मुबलक पाण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या पुण्याची वाटचाल वाळवंट होण्याच्या दिशेने सुरूय का असा प्रश्न विचारला जात आहे?
यातच आता निवडणुकींचे दिवस सुरु आहेत. उमेदवार प्रचारासाठी शहरात फिरत आहेत. त्यांनादेखील नागरिक पाण्याचा प्रश्न बोलून दाखवत आहेत. शिवाय काही परिसरात नो वॉटर, नो वोट, अशा आशयाचे पोस्टर्स पुण्यातील विविध भागात लावण्यात आले आहेत. हे पोस्टर लावून पाण्यासाठी नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.
फक्त टॅक्स भरतो पण पाणी नाही!
पुण्यातील अनेक सोसायट्यांमध्ये महापालिकेचं पाणी येत नाही. त्यामुळे ज्या दिवसांपासून पुण्यातील नागरिकांनी घर घेतलं आहे. त्या दिवसापासून पुण्यातील अनेक नागरिकांनाच्या घरात महापालिकेचं पाणी येत नाही. त्यामुळे नागरिकांना पहिल्या दिवसापासून पाणी विकत घ्यावं लागत आहे. याच कारणामुळे आम्ही फक्त टॅक्स भरतो पण महापालिकेचं पाणी येत नसल्याची खंत नागरिकांनी बोलून दाखवली आहे.
महापालिकेने पाण्याचं कनेक्शन दिलं मात्र...
पुण्यातील नागरिकांवर पाण्यासाठी पाण्यासारखा पैसा ओतण्याची वेळ आली आहे. त्यातच प्रत्येक सोसायटीला साधारण 4 ते साडे चार लाख लाख रुपयांचं पाणी विकत घ्यावं लागत आहे. रोज 20 टॅंकर पाणी विकत घ्यावं लागत आहे. महापालिकेने पाण्याचं कनेक्शन दिलं मात्र आतापर्यंत दोनवेळाच पाणी आलं आहे, असंही नागरिकांनी सांगितलं आहे.
इतर महत्वाची बातमी-