एक्स्प्लोर

Pune Varandha ghat : पुण्यातून कोकणात जाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, वरंधा घाट 'या' तारखेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद

Pune Varandha Ghat : पुण्याहून भोरमार्गे महाडला जाणाऱ्या मार्गावरील वरंधा घाट वाहतुकीकरता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.

पुणे :  पुणे शहरातून (Pune News)  कोकणात (Pune Konkan Route)  जाणाऱ्या लोकांसाठी महत्वाची बातमी आहे.  वरंधा घाट (Varandh Ghat)   आजपासून (26 जून)  बंद करण्यात आला आहे. भोरमार्गे महाडला (Pune - Bhor- Mahad)  जाणाऱ्या वरंध घाट मार्गावरील सर्व वाहतूक पुन्हा बंद करण्यात आली आहे. पावसाळ्यातील संभाव्य अनुचित घटना टाळण्यासाठी आणि त्या अनुषंगाने आवश्यक उपाय योजना करण्यासाठी प्रशासनाने  वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 

पुण्याहून भोरमार्गे महाडला जाणाऱ्या मार्गावरील वरंधा घाट वाहतुकीकरता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. दुसरीकडे  हवामान खात्याचा रेड आणि ऑरेंज अलर्ट असताना  हलक्या वाहनांसह घाटातील सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली आहे.  पावसाळ्यात घाटामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन अनेकवेळा अचानक दरडी कोसळणे, झाडे पडणे, रस्ता खचणे, माती वाहून जाणे अशा स्वरुपाच्या घटना घडतात. या  पार्श्वभूमीवर संभाव्य अनुचित घटना टाळण्यासाठी आणि त्या अनुषंगाने आवश्यक उपाय योजना करण्यासाठी प्रशासनाने निर्णय घेतला आहे. 

किती तारखेपर्यंत बंद असणार घाट?

वरंध घाट 26 जून ते 31 ऑगस्ट 2024 पर्यंत बंद राहणार आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी  आदेश काढले आहेत.  आठवड्यापूर्वी वरंध घाटातील वाघजाई मंदिराजवळ दरड कोसळल्यानं घाटातील संरक्षक कठडा तुटून रस्ता खचल्याची घटना घडली होती . या घाटातील पुणे जिल्ह्याच्या हद्दीतील रस्ता हा नागमोडी वळणाचा असून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन अनेकवेळा अचानक दरडी कोसळणे, झाडे पडणे, रस्ता खचणे, माती वाहून जाणे अशा स्वरुपाच्या घटना घडतात. त्यामुळे संभाव्य जीवित व वित्त हानी टाळण्याच्या उद्देशाने हा घाट रस्ता अवजड वाहनांसाठी पावसाळा कालावधीत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोणत्या पर्यायी मार्गाचा वापर करावा?

पुण्यावरुन कोकणात जाण्यासाठी वरंध घाट हा शार्टकट मार्ग  आहे. परंतु आता पर्यायी मार्ग वाहनधारकांना वापरावा लागणार आहे. वाहनधारकांनी पुण्याकडे जाण्यासाठी राजेवाडी फाटा-माणगाव-निजामपूर रोड-ताम्हाणी घाट-मुळशी पिरंगुट पुणे  आणि पोलादपूर आंबेनळी घाट वाई मार्गे पुणे असा मार्ग वापरावा. तसेच कोल्हापूरकडे जाण्यासाठी राजेवाडी फाटा-पोलादपूर-खेड-चिपळुण-पाटण-कराड- कोल्हापूर” असा मार्ग वापरावा.

पावसाळ्यासाठी खबरदारी

पुण्यासह राज्यभरात अनेक ठिकाणी पावसामुळे आपत्ती होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे. त्यातच दरडी कोसळल्याच्या घटना सातत्याने घडताना दिसतात. त्यात अनेकदा जीवितहानी होते. पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय होऊ नये आणि नागरिकांचं नुकसान होऊ नये, यासाठी सगळ्या स्तरावरुन दरवर्षी प्रयत्न केले जातात. वरंध घाटाबरोबरच पुण्याजवळील काही भीतीदायक किंवा आपत्तीजनक पर्यटन स्थळेही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात येईल.  

हे ही वाचा :

तिलारी घाट अवजड वाहतुकीसाठी बंद, अपघाताची भीती असल्यानं 31 ऑक्टोबरपर्यंत वाहतूक बंद

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget