एक्स्प्लोर
आजपासून पुणे अनलॉक ; काय सुरु, काय बंद राहणार?
लॉकडाऊन उठवताना काही निर्बंध आम्ही कायम ठेवणार आहे असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. काही गोष्टींबाबतचे निर्बंध वगळता 14 जुलैच्या आधीसारखीच पुण्यात लोकांना त्यांची कामे आणि व्यवसाय करण्यासाठी परवानगी असेल .
![आजपासून पुणे अनलॉक ; काय सुरु, काय बंद राहणार? pune unlock from tomorrow what open what close pune lockdown update आजपासून पुणे अनलॉक ; काय सुरु, काय बंद राहणार?](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/03/16133804/Pune-Jamav-bandi.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : पुण्यातील लॉकडाऊन आजपासून उठवण्यात आला आहे. शहरात शुक्रवारपासून (24 जुलै) लॉकडाऊन नसेल पण दहा दिवसांपूर्वी सारखी सर्व प्रकारची सूटही नसेल असं पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी स्पष्ट केलं आहे. लॉकडाऊन उठवताना काही निर्बंध आम्ही कायम ठेवणार आहे असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. काही गोष्टींबाबतचे निर्बंध वगळता 14 जुलैच्या आधीसारखीच पुण्यात लोकांना त्यांची कामे आणि व्यवसाय करण्यासाठी परवानगी असेल.
निर्बंध घालण्यात आलेल्या बाबी पुढीलप्रमाणे :
- पुण्यातील दुकानं सकाळी 9 ते रात्री 7 या कालावधीत सुरू राहणार
- रात्री 9 ते पहाटे 5 या कालावधीत अत्यावश्यक सेवेसाठी काम करणारे लोक वगळता इतर कोणालाही बाहेर पडता येणार नाही
- पुण्यात येथून पुढे लग्न समारंभ आणि अंत्यविधीप्रसंगी वीस लोकांनाच उपस्थित राहता येईल
- प्रतिबंधित क्षेत्राबाहेर सार्वजनिक ठिकाणी आणि मैदानांवर व्यायाम करता येईल. धावणे, सायकलींग करता येईल.
- मात्र जीम बंद राहतील.
- सकाळी 5 ते 7 या वेळेत व्यायाम करता येणार
- लहान मुलांसोबत मोठी व्यक्ती हवी , मैदानांवर गर्दी करता येणार नाही
- व्यायामाची सामायिक उपकरण वापरता येणार नाहीत (ओपन जिम)
- दुकाने पी1 पी2 प्रमाणे सुरू राहतील
- खाजगी कार्यालय 10 टक्के किंवा 15 जण यापैकी जे अधिक तितक्या लोकांना बोलवून कामकाज करता येणार आहे.
- हॉटेल्स, मॉल जीम, व्यापारी संकुल, पोहण्याचे तलाव बंदच राहणार
- हॉकर्सना व्यवसाय सुरू करता येणार
- पार्सल, कुरियर सुरू
- घरमालकाची परवानगी असल्यास घरेलू कामगार , ज्येष्ठ रूग्ण मदतनीस (प्रतिबंधित क्षेत्राबाहेर)
- सगळीकडे मास्क वापरणं बंधनकाराक
- ज्येष्ठ नागरिकांना विनाकारण बाहेर पडता येणार नाही
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
बीड
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)