Pune Traffic Police : आता तरी पुणेकर हेल्मेट घालणार का? ‘वेड लागलंय’ गाण्याच्या चालीवर जनजागृती करणारं गाणं व्हायरल
आतिश खराडे या वाहतूक पोलिसाने जनजागृतीच्या निमित्ताने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
Pune Traffic Police : पुणेकर आणि वाहतुकीचे नियम यांचा छत्तीसचा आकडा असल्याचं कायम निदर्शनास येतं. त्यामुळे अनेकदा पुण्यात वाहतूक नियम पाळण्याकरिता नवनवीन उपाययोजना राबवल्या जातात. यातच आता पुण्यातील एका वाहतूक पोलिसाने सोशल मीडियावर गाजत असलेल्या रिल्सचा वापर केला आहे आणि या रिल्सच्या माध्यामातून हेल्मेट बाबत जनजागृती केली आहे. रितेश खराडे असं या पोलीसांचं नाव आहे, यापुर्वीदेखील त्यांनी अनेक विषयांवर जगजागृती करण्यासाठी व्हिडीओ बनवले आहे.
नेमकं कशी केली जनजागृती?
खराडे यांनी रितेश देशमुखच्या 'वेड' चित्रपटातील 'वेड लागलं' या लोकप्रिय गाण्याच्या ट्यूनवर 'दादा हेल्मेट घाल दादा हेल्मेट घाल' हे गाणे तयार केले आहे. हे गाणे झपाट्याने व्हायरल झाले आहे. 'वेड' चित्रपटातील मूळ गाण्यातील रितेश देशमुख, सलमान खान आणि जेनेलिया या गाण्यात आहेत. हेल्मेट घालण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी खराडे यांनी गाण्याची चाल वापरुन हेल्मेट वापरा या आशयाचं गाणं लिहिलं आहे. हे गाणं सध्या सोशल मीडियावर चांगलंच धुमाकूळ घातल आहे.
या गाण्यामागील कहाणी सांगताना खराडे म्हणतात की, हेल्मेटच्या महत्त्वाविषयी जनजागृती करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर गाण्याच्या माध्यामातून हेल्मेटचं महत्व पटवून देण्याचंं ठरवलं हेल्मेट वापरणं अत्यंत गरजेचं आहे. त्यात पुणे शहरात अपघाताचं प्रमाण वाढत आहे. तरीही लोक हेल्मेट वापरण्याकडे दुर्लक्ष करत असतात. त्यामुळे त्यांना आवडणाऱ्या गाण्याच्या माध्यमातून हेल्मेचं महत्व पटवून देत आहो, असं ते म्हणाले. यापूर्वी देखील हे पोलीस त्यांनी केलेल्या एका रिलमुळे चर्चेत आले होते. त्यांनी कुत्र्याला हेल्मेट घालून आपल्या गाडीवर बसवून रिल केलं होतं. त्यावेळीदेखील शहरात त्याच्या या रिलची चर्चा झाली होती.
काय आहेत या गाण्याचे बोल?
“ए दादा थांब तुझं हेल्मेट कुठेय, हेल्मेट कुठेय सांग?
पडशील म्हणून म्हटलं दादा, स्पीडमध्ये चाललाय आता थांब
रुल्स नाही पाळलंय, म्हणून तुला पोलीस धरलंय, घरामध्ये जपून ठेवलंय, तुला कसं नाही कळलंय?
मन माझं लय आतून लय, तुला तळमळून सांगतंय रे..
धडपडशील, मरुन जाशील, यम घेऊन गेला तर काय करशील?
दादा हेल्मेट घाल, काकू हेल्मेट घाल, मित्रा हेल्मेट घाल, ताई हेल्मेट घाल..” असं हे गाणं आहे. सोशल मीडियावर हे गाणं चांगलंच चर्चेत आहे.
संबंधित बातमी-