Pune Building Collapse : पुण्यातील बालेवाडी परिसरात निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळला, 12 जण जखमी
Pune Slab Collapes : पुण्यातील बालेवाडी परिसरात मोठी दुर्घटना घडली आहे. बालेवाडीतील पाटील नगर येथे निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळला. या दुर्घटनेत 12 जण जखमी झालेत.
Pune Slab Collapes : पुण्यातील बालेवाडी परिसरात मोठी दुर्घटना घडली आहे. बालेवाडीतील पाटील नगर येथे निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब (Pune Building Collapse) कोसळला. या दुर्घटनेत 12 जण जखमी झालेत. ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची प्राथमिक माहिती आहे.. दुर्घटनेची माहिती मिळताच पुणे, पिंपरी चिंचवड आणि पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
पुण्यातील बालेवाडी, पाटील नगर येथे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी स्लॅब कोसळल्याची ही घटना घडली. ग्निशमन दल पोहोचण्यापूर्वी 12 जणांना जखमी अवस्थेत दवाखान्यात नेले असल्याचे स्थानिक लोकांनी सांगितलं. या बिल्डिंगचा रात्री स्लॅब ( काँक्रीट भरण्याचं) काम सुरु होतं, त्यावेळी अचानक स्लॅब कोसळला. रात्री बाराच्या सुमारास ही घटना घडली. त्यावेळी या बिल्डिंगचं काम सुरू होतं आणि बारा कामगार काम करत होते.
या दुर्घटनेत 12 कामगार जखमी झाले आहेत. तातडीने त्यांना रात्री जवळच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेण्यात आलं. रात्री पोलिसांना देखील घ्या संदर्भात माहिती देण्यात आली होती. जखमी झालेल्या 12 जणांपैकी 6 जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती कळताच पुणे, पिंपरी चिंचवड, पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या 6 फायरगाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. रात्री उशीरापर्यंत अग्निशमन दलाचे जवान स्लॅबखाली कोणी अडकले आहे का, याचा शोध घेत होते. परंतु स्लॅबखाली आणखी कोणीही अडकले नसल्याचे एका अधिकाऱ्यानं सांगितलं. शनिवारी रात्री पाटीलनगरमधील बांधकाम साईटवर नवीन स्लॅब भरण्याचे काम सुरू होते.
स्लॅब भरण्याचे काम सुरू असताना अचानक स्लॅब कोसळला. त्यात काही जण जखमी झाले आहे, अशी प्राथमिक माहिती मिळाली. बालेवाडी येथील पाटीलनगरमधील कामाच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या अभियंत्याने सर्व जखमींना नजिकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.