Who Is Vishal Agrawal : पोराच्या हाती 17 व्या वर्षी पोर्शे कारचं स्टिअरिंग, पुण्यात मोठे गृहप्रकल्प, अलिशान गाड्यांचा शौक, कोण आहे विशाल अग्रवाल?
सतराव्या वर्षी मुलाच्या हाती कोट्यावधी रुपयांची गाडी दिली. या गाडीने दोन निष्पापांचा जीव घेतला. पोराच्या हाती 17 व्या वर्षी पोर्शे कारचं स्टिअरिंग, पुण्यात मोठे गृहप्रकल्प, अलिशान गाड्यांचा शौक, विशाल अग्रवाल आहेत तरी कोण पाहुयात...
![Who Is Vishal Agrawal : पोराच्या हाती 17 व्या वर्षी पोर्शे कारचं स्टिअरिंग, पुण्यात मोठे गृहप्रकल्प, अलिशान गाड्यांचा शौक, कोण आहे विशाल अग्रवाल? Pune Porsche crash car accident kalyani nagar who is porse car owner and bramha corp builder vishal agrawal pune news marathi news Who Is Vishal Agrawal : पोराच्या हाती 17 व्या वर्षी पोर्शे कारचं स्टिअरिंग, पुण्यात मोठे गृहप्रकल्प, अलिशान गाड्यांचा शौक, कोण आहे विशाल अग्रवाल?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/21/73c67d8fe1c9b5c5f5be56a1d1f1e0c81716280479440442_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : पुण्यात भरधाव असलेल्या पोर्शे कारने दोन इंजिनिअरला ((Pune Porsche Car Accident) धडक दिली. यात दोन्ही इंजिनियरचा जागीच मृत्यू झाला. महत्वाचं म्हणजे ही पोर्शे महागडी आलिशान कार मद्यप्राशन करुन सताव वर्षांचा मुलगा चालवत होता. या अपघातानंतर जमावाने सतरा वर्षाच्या मुलाला चांगलाच चोप देऊन पोलिसांकडे दाखल केलं. हा मुलगा पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर असलेल्या विशाल अग्रवालचा (Vishal Agraval) मुलगा होता. सतराव्या वर्षी मुलाच्या हाती कोट्यावधी रुपयांची गाडी दिली. या गाडीने दोन निष्पापांचा जीव घेतला. पोराच्या हाती 17 व्या वर्षी पोर्शे कारचं स्टिअरिंग, पुण्यात मोठे गृहप्रकल्प, अलिशान गाड्यांचा शौक, विशाल अग्रवाल आहेत तरी कोण पाहुयात...
विशाल अग्रवाल नेमके कोण?
-ब्रम्हा कॉर्प या बांधकाम उद्योग समूहाचे विशाल अग्रवाल प्रमुख आहेत.
- ब्रम्हा कॉर्प हे नाव पुण्यातील बांधकाम व्यवसायात मागील चाळीस वर्षांपासून आघाडीवर राहिलंय.
- ब्रम्हदत्त अग्रवाल यांनी स्थापन केलेल्या या उद्योगसमूहांमध्ये अनेक कंपन्या आहेत.
- पुण्यातील वडगाव शेरी, खराडी, विमान नगर या भागात अनेक मोठे गृहप्रकल्प या कंपनीने उभारले आहेत.
- त्याचबरोबर पुण्यातील ली मेरिडियन हॉटेल , रेसिडेन्सी क्लब यासारखी मोठी बांधकामे देखील या कंपनीने केली आहेत.
-यातील ब्रम्हा मल्टीस्पेस , ब्रम्हा मल्टीकॉन या कंपन्यांची जबाबदारी ब्रह्मदत्त अग्रवाल यांचा मुलगा सुरेंद्र अग्रवाल आणि त्यानंतर सुरेंद्र अग्रवाल यांचा मुलगा विशाल अग्रवाल यांच्याकडे आली.
- विशाल अग्रवाल यांच्या मालकीच्या विविध कंपन्यांची मालमत्ता 60,120,000 इतकी आहे .
- विशाल अग्रवाल यांना आलिशान गाड्यांचा शॉक असून कल्याणी नगरमध्ये अल्पवयीन असलेल्या त्यांच्या लहान मुलाने वेगाने कार चालवून दोघांना बळी घेतला.
- मात्र विशाल अग्रवाल यांचा मोठ्या मुलाने देखील काही महिन्यांपूर्वी वडगाव शेरी भागात ब्रम्हा मल्टी स्पेस या इमारतीसमोर आलिशान कार वेगाने चालवून रस्त्यावरील इतर वाहनांचं आणि विजेच्या खांबाचं नुकसान केलं होतं. मात्र त्या प्रकरणाचा गवगवा होणार नाही याची काळजी घेण्यात आली.
- पन्नास वर्षांचे विशाल अग्रवाल हे ब्रम्हा उद्योग समूहात महत्वाच्या पदांवर असून त्यांच्या अटकेने काही हजार कोटी रुपयांमध्ये उलाढाल असलेल्या कंपनीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
इतर महत्वाची बातमी-
बिल्डर पुत्राने सुसाट पोर्शेने दोघांना चिरडलं, CM-DCM अॅक्शनमध्ये, आतापर्यंत काय काय घडलं?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)