Pune Car Accident timeline : बिल्डर पुत्राने सुसाट पोर्शेने दोघांना चिरडलं, CM-DCM अॅक्शनमध्ये, आतापर्यंत काय काय घडलं?
बिल्डर पुत्राने सुसाट पोर्शेने दोघांना चिरडलं, CM-DCM अॅक्शनमध्ये आले आहेत कोणालाही पाठिशी घालू नका, असे आदेश दिले आहे. या अपघात प्रकरणात आतापर्यंत नक्की काय काय घडलं पाहूयात...
पुणे : पुण्यातील कल्याणीनगर परिसरात पोर्शे गाडीने (Pune Car Accident timeline ) दोन तरुणांना (Pune Accident) चिरडल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा असे मृतांचे नावे आहेत. महत्वाचं म्हणजे पोर्शे सारख्या भरधाव गाडीने आणि पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवाल यांच्या सतरा वर्षांच्या मुलाने या दोघांना चिरडलं. हा अपघात झाल्यानंतर अग्रवालच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचं बोललं गेलं. अपघात झाल्यावर अग्रवालच्या मुलाला अवघ्या 15 तासांत जामीन मंजूर करण्यात आला. त्याला मिळालेल्या जामीनानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आणि या प्रकरणावर उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री आणि विरोधी नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. बिल्डर पुत्रावर कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणात आतापर्यंत नेमकं काय काय घडलं पाहूयात....
आतापर्यंत नेमकं काय काय घडलं?
- 18 मे रोजी पहाटे अडीच वाजता पुण्यातील उच्चभ्रू परिसर असलेल्या कल्याणी नगरमध्ये विचित्र अपघात झाला.
- पोर्शे गाडीने दोन इंजिनिअरला चिरडलं. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला.
- अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा अशी दोघांची नावं आहेत.
- दोघेही पुण्यातील जॉन्सन कंपनीत कामाला होते. मित्र असल्याने पार्टी करुन परताना हा अपघात झाला.
- पुण्यात पोर्शे गाडीने या दोघांना उडवलं आणि त्यांना उडवणारा सतरा वर्षीय मुलगा होता.
- हा अपघात झाल्यानंतर तिथे जमलेल्या जमावाने मुलाला चांगलाच चोप दिला आणि पोलिसांकडे सोपवलं.
- पोलिसांकडे सोपवल्यावर तो पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवाल यांचा मुलगा असल्याचं समोर आलं.
- विशाल अग्रवालचा मुलगा असल्याचं समजल्याने सगळी यंत्रणा कामाला लागली.
-पोर्शे सारख्या गाडीला नंबर प्लेट नसताना पुण्याच्या रस्त्यांवर ही गाडी कशी धावत होती, असा प्रश्न उपस्थित केला गेला.
- त्यानंतर गाडीची नोंदच नसल्याचं समोर आलं.
-मद्यधुंद नशेत असलेल्या आरोपी वेदांत अग्रवाल चालवत असलेल्या भरधाव कारने धडक दिल्याने एका तरुण व तरुणीचा मृत्यू झाला. मात्र, 15 तासांतच वेंदातना न्यायालयाने (Court) जामीन मंजूर केला आहे.
- काही प्रमुख अटी व शर्तींसह न्यायालयाने हा जामीन मंजूर केला आहे. त्यानुसार, वेंदातला 15 दिवस ट्रॅफिक पोलिसांसोबत (Police) चौकात काम करावे लागणार असल्याचं सांगण्यात आलं.
- वेदांत अग्रवालला पंधरा दिवस ट्रॅफिक कॉन्स्टेबलसोबत चौकात उभे राहून वाहतुकीचे नियोजन करावे लागणार, अग्रवालला मानसोपचार तज्ञांकडून उपचार घ्यावे लागणार, भविष्यात अपघात झाल्याचे दिसल्यास त्याला अपघातग्रस्तांना मदत करावी लागेल, या तीन अटी घालून देण्यात आल्या.
- वेदांत अग्रवालवर IPC 304 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता, अर्थात निष्काळजीपणाने इतरांच्या मृत्यूला कारणीभूत होणे या अनुषंगाने 304 दाखल करण्यात आले.
- आरोपी हा दारु पिल्याचा पोलिसांना संशय होता. त्यासाठी त्याच्या रक्ताची चाचणी करण्यात आली. मात्र, या चाचणीचा रिपोर्ट येण्याआधीच न्यायालयाने वेदांतला जामीन मंजूर केला.
- वेदांतला जामीन मिळाल्याचं पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला.
- यानंतर या प्रकरणाचे धक्कादायक सीसीटीव्ही समोर आले.
- मी दारु पितो आणि पप्पांनीच मला गाडी चालवायला दिली होती, असं विशाल अग्रवालच्या मुलाने कबुल केलं.
- या प्रकरणाला आता राजकीय वळण आलं आहे.
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीदेखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. पोलिसांकडून विशाल अग्रवाल यांच्या मुलाला विशेष वागणूक देण्यात आल्याचा आरोप करत आहे. या प्रकरणात आरोपीला कोणती विशेष वागणूक दिली असल्यास, त्यावेळचे पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही तपासून ते खरे असेल तर तत्काळ संबंधितांवर निलंबनाची कारवाई करा, अशाही सूचना देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.
- या प्रकरणात अजित पवार गटाचे आमदार सुनिल टिंगरे यांनी या प्रकरणात पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला. मात्र विशाल अग्रवाल हे परिचित असल्याने त्यांचा रात्री फोन आला. पहाटे 3 वाजता पोलीस स्टेशनमध्ये गेलो, पण पोलिसांवर दबाव टाकला नाही असं आमदार सुनील टिंगरे यांनी सांगितलं.
- यात विशाल अग्रवालवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर विशाल पसार झाले. मात्र पुणे पोलीस आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत विशाल अग्रवालसह ड्रायव्हर आणि एकाला ताब्यात घेतलं.
- या प्रकरणी अल्पवयीन मुलाला मद्य देणारे हॉटेल काझीचे मालक प्रल्हाद भुतडा आणि मॅनेजर सचिन काटकर त्याचबरोबर हॉटेल ब्लॅकचे संदीप सांगळे आणि बार काऊंटर जयेश बोनकर यांना अटक देखील आली आहे.
-पुण्यात झालेल्या भीषण अपघातात पुणे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. त्यामुळे या प्रकरणी न्यायिक चौकशी व्हावी अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
- संजय राऊतांनीदेखील या प्रकरणी योग्य कारवाईची मागणी केली आहे. अपघातप्रकरणी पुण्याचे पोलिस आयुक्त नेमकी कुणाला मदत करतायत? असा सवाल संजय राऊतांनी केला.
-राजकीय दबावाला बळी पडू नका, कुणालाही पाठीशी घालू नका, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले आहे.
- या प्रकरणावरुन पुन्हा एकदा पुणे पोलिसांच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
- पुण्यातील बार आणि पबचा मुद्दादेखील पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.
इतर महत्वाची बातमी-