एक्स्प्लोर

Pune Car Accident: पोर्शेने दोघांना चिरडणाऱ्या लाडोबाला निबंध लिहिण्याची 'कठोर' शिक्षा देणारे चौकशीच्या कचाट्यात, 100 पानी अहवालात चुकांचा पाढा?

Pune Crime news: पुण्यातील कल्याणीनगर परिसरात 19 मे रोजी विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने पोर्शे कारने दोघांना चिरडले होते. या धनिकपुत्राला वाचवण्यासाठी ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी रक्ताचे सॅम्पल्स बदलले होते.

पुणे: पुण्यातील कल्याणी नगरमधील अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाला जामीन मंजूर करताना बाल हक्क न्याय मंडळाच्या सदस्यांकडून (juvenile justice board) पुष्कळ चुका करण्यात आल्याचा अहवाल महिला अणि बाल विकास विभागाने नेमलेल्या चौकशी समितीने दिला आहे. त्यानंतर या सदस्यांना नोटीस बजावण्यात आली असून चार ते पाच दिवसांत स्पष्टीकरण देण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर या सदस्यांवर काय कारवाई करायची हे ठरविण्यात येईल असे महिला अणि बालकल्याण विभागाचे (Women and child Welfare) आयुक्त प्रशांत नारनवरे यांनी स्पष्ट केले होते. 

कल्याणी नगरमधील पोर्शे  अपघाताला (Pune Car Accident) कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाला ज्या दिवशी अपघात झाला त्याच दिवशी बाल हक्क न्याय मंडळाचे सदस्य एल. एन. धनवडे ( L.N. Dhanavde) यांनी जामीन मंजूर केला होता. जामीन मंजूर करताना एल.एन. धनवडे यांनी या अल्पवयीन मुलाला निबंध लिहिणे, वाहतूक व्यवस्थापन करणे, समुपदेशकांची मदत घेणे अशी किरकोळ शिक्षा सुनावली होती. त्यानंतर मोठ्या प्रमाणात टीकेचा सुर उलटल्यानंतर महिला अणि बालकल्याण विभागाच्या वतीने या निर्णयाची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने तयार केलेल्या 100 पानी अहवालात चुका झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. हा अहवाल महिला व बालविकास आयुक्तांना प्राप्त झाला आहे. 

पोर्शे अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाला आधी जामीन देणारे बाल हक्क न्याय मंडळाचे सदस्य एल एन धनवडे यांना महिला आणि बालकल्याण विभागाचे सचिव प्रशांत नारनवरे यांनी नोटीस बजावली होती . त्यावर धनवडे यांनी दिलेल्या उत्तरानंतर प्रशांत नारनवरे यांच्याकडून काय निर्णय घेतला जाणार हे आता स्पष्ट होईल . 

कोणत्या कारणांमुळे बालहक्क न्यायमंडळाचे सदस्य वादात

पोर्शे कार अपघातानंतर धनिकपुत्राला बालहक्क न्यायमंडळासमोर सादर करण्यात आले तेव्हा त्याच्या शिक्षेबाबातचा निर्णय हा सर्व सदस्यांच्या उपस्थितीत झाला पाहिजे होता. मात्र, केवळ एकाच सदस्याने हा निर्णय दिला. या सगळ्याबाबत आता बालहक्क न्यायमंडळाच्या सदस्यांना जाब विचारण्यात येईल. 

बालहक्क न्यायमंडळाने लाडोबाला कोणत्या 'कठोर' शिक्षा सुनावल्या?

धनिकपुत्राला बालहक्क न्यायालयात सादर करण्यात आल्यानंतर त्याला सुनावण्यात आलेल्या अजब शिक्षेची चांगलीच चर्चा झाली होती. यावरुन प्रचंड टीकेची झोड उठल्यानंतर कारवाईला वेग आला होता. बाल हक्क न्याय मंडळाचे सदस्य एल. एन. धनवडे यांनी आरोपीने 15 दिवस येरवडा विभागात ट्राफिक कॉन्स्टेबलसोबत वाहतुकीचं नियोजन करावं. अपघातावर त्यानं 300 शब्दाचा निबंध लिहावा आणि मद्य सोडायला मदत होईल अशा डॉक्टरकडून उपचार घ्यावेत, असे निर्देश दिले होते. तसेच मानसोपचार तज्ज्ञांचे समुपदेशन घेऊन त्यासंदर्भात अहवाल न्यायालयात सादर करण्यास सांगितले होते.

आणखी वाचा

पुणे पोर्शे केसमध्ये ब्लड सॅम्पल अफरातफरी करणारा मास्टरमाईंड कोण? पुणे पोलिस त्याला कसं शोधणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ambadas Danve Vs Sandeepan Bhumre | अंबादास दानवेंची भुमरेंसोबत जवळीक? Special ReportABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 26 January 2025ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 26 January 2024Shaurya Purskar ABP Majha | इतरांचे प्राण वाचवणाऱ्या शूरवीरांचा एबीपी माझाकडून गौरव ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार
Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला
Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला
GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला
GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला
Embed widget